Success Story : १३ कर्मचारी आणि ६० लाखांचं भांडवल, २६ व्या वर्षी दाखवलं धाडस; उभा केला ३.५ लाख कोटींचा व्यवसाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 09:40 IST
1 / 8उदय कोटक यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या एमडी आणि सीईओ पदाचा राजीनामा दिला. यासह त्यांनी आपल्या ३८ वर्षांचा प्रवास थांबवला. उदय कोटक यांनी १९८५ मध्ये वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी करिअरला सुरुवात केली होती.2 / 8केवळ १३ कर्मचार्यांसह, उदय कोटक यांनी ३८ वर्षांपूर्वी ३०० चौरस फुटांच्या कार्यालयात भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या खाजगी क्षेत्रातील बँकेची पायाभरणी केली आणि आज त्यांचा बँकिंग व्यवसायानं उंची गाठली आहे. 3 / 8भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, ते डिसेंबर २०२३ मध्ये कोटक महिंद्रा बँकेचे एमडी पद सोडणार होते, परंतु त्यांनी आधीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईत जन्मलेल्या उदय कोटक यांचं कुटुंब कॉटन ट्रेडिंगचं काम करत होते. त्यामुळे कौटुंबिक व्यवसायातही त्यांनी हात आजमावला. पण या कामात त्यांचं मन लागलं नाही.4 / 8एमबीए करत असतानाच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. अखेर त्यांनी स्मॉल फायनान्स बँक सुरू केली. उदय कोटक यांनी १९८५ मध्ये ६० लाख रुपयांच्या मदतीनं कोटक कॅपिटल मॅनेजमेंट फायनान्स लिमिटेडची सुरुवात केली.5 / 8महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे उदय कोटक यांचे चांगले मित्र होते आणि त्यांनी कोटक कॅपिटल मॅनेजमेंटमध्ये गुंतवणूक केली होती. यानंतर कंपनीचे नाव बदलून कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेड करण्यात आलं. उदय कोटक यांनी हळूहळू स्टॉक ब्रोकिंग, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, विमा, म्युच्युअल फंडांमध्ये पोर्टफोलिओचा विस्तार केला.6 / 8१९९८ मध्ये उदय कोटक यांनी कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली आणि म्युच्युअल फंड बाजारात प्रवेश केला. त्याच वेळी, २००० मध्ये, त्यांनी पॅन-आफ्रिकन इन्व्हेस्टमेंटसोबत करार केला आणि जीवन विमा व्यवसाय सुरू केला.7 / 8त्यानंतर २००३ मध्ये, उदय कोटकच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला जेव्हा कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेड ही भारतीय कॉर्पोरेट जगताच्या इतिहासात रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग परवाना मिळवणारी पहिली कंपनी बनली. अवघ्या ११ वर्षात कोटक महिंद्रा बँक देशातील दुसरी सर्वात मोठी व्यावसायिक बँक बनली. आजमितीस, कोटक महिंद्रा बँकेचे मार्केट कॅप ३.५० लाख कोटी रुपये आहे.8 / 8२०१९ मध्ये उदय कोटक भारतातील सर्वाधिक वेतन घेणारे सीईओ ठरले. त्यांचं महिन्याचं वेतन २७ लाख रुपये होतं. डीएनएच्या रिपोर्टनुसार उदय कोटक यांची नेटवर्थ १,१०,०२० कोटी रुपये आहे आणि ते भारतील सर्वात श्रीमंत बँकर आहेत.