गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 08:02 IST
1 / 8१ ऑगस्टपासून पाच महत्वाचे बदल होत आहेत. यामध्ये गॅस सिलिंडर, युपीआय बॅलन्स लिमिट आणि विमान प्रवास यांचा समावेश आहे. यामुळे तुमच्या आयुष्यावर फार मोठा नाही परंतू, संबंधित लोकांवर थोडा बहुत परिणाम जाणवणार आहे. 2 / 8आजचा पहिला महत्वाचा बदल म्हणजे व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर ₹34.50 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. ही दर कपात १९ किलोच्या सिलिंडरवर लागू आहे. पूर्वी यासाठी ₹1665 मोजावे लागत होते. 3 / 8दुसरा महत्वाचा बदल म्हणजे विमानात वापरले जाणारे इंधन महागले आहे. एव्हिएशन टर्बाइन फ्युअलची किंमत प्रति किलोलिटर (१००० लिटर) २६७७.८८ रुपये किंवा ३% ने वाढवून ९२,०२१.९३ रुपये प्रति १००० लिटर केली आहे. यामुळे विमान प्रवास महागण्याची शक्यता आहे. 4 / 8तिसरा महत्वाचा बदल म्हणजे युपीआय अॅप्सवर बॅलन्स चेक करण्याची मर्यादा आता दिवसाला ५० वेळा अशी करण्यात आली आहे. यामुळे युपीआय सिस्टीमवर येणार भार कमी होणार आहे. 5 / 8तसेच ऑटो-पे जसे की ईएमआय, सबस्क्रिप्शन किंवा बिल पेमेंट हे आता दिवसाच्या कोणत्याही वेळेऐवजी सकाळी १० ते दुपारी १ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९:३० वगळता निश्चित वेळेच्या स्लॉटमध्येच केले जाणार आहे. 6 / 8जर एखादे पेमेंट अडकले तर तुम्ही त्याची स्थिती फक्त तीन वेळा तपासू शकता, तेही प्रत्येक वेळी ९० सेकंदांच्या अंतराने.7 / 8चौथा महत्वाचा बदल म्हणजे एसबीआयने ११ ऑगस्टपासून काही को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्स (एलिट आणि प्राइम) वरील मोफत हवाई अपघात विमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कव्हर ५० लाख रुपयांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंत उपलब्ध होते. हा विमा यापूर्वी यूको बँक, सेंट्रल बँक, करूर वैश्य बँक आणि अलाहाबाद बँकेच्या भागीदारीत देण्यात आला होता.8 / 8पाचवा बदल हा आज नाही तर काही दिवसांनी म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीची बैठक या महिन्यात ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या बैठकीत गव्हर्नर संजय मल्होत्रा पॅनेलसह व्याजदरात ०.२५% कपात करू शकतात.