SEE PICS : शुभमंगल सावधान...नव्या वर्षांत या सेलिब्रिटींनी बांधली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 11:07 AM2020-02-14T11:07:17+5:302020-02-14T11:17:41+5:30

नव्या वर्षाचा अर्थात 2020 चा दुसरा महिना सुरु आहे. या दोन महिन्यांत अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. नव्या वर्षांत लग्नगाठ बांधणा-या सेलिब्रिटींचे काही यादगार फोटो...अभिनेत्री काम्या पंजाबीने बॉयफ्रेन्ड शलभ डांगसोबत गत 10 फेबु्रवारीला लग्नगाठ बांधली.

करिना कपूर- करिश्मा कपूरचा चुलत भाऊ अरमान जैनने गत 3 फेबु्रवारीला अनीसा मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. या लग्नात बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली.

‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक व मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे हिने गत 5 जानेवारीला शार्दुल सिंगसोबत लग्न केले.

मराठी चित्रपटसृष्टीतला अभिनेता सुहृद वार्डेकर नुकताच लग्नबेडीत अडकला आहे.

एकता कपूरच्या ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेत निगेटीव्ह भूमिका साकारणारा अभिनेता अनुराग शर्माने गर्लफ्रेन्ड नंदिनी गुप्तासोबत लग्न केले. गत 31 जानेवारीला हा विवाह सोहळा झाला. गत पाच वर्षांपासून अनुराग व नंदिनी एकमेकांना डेट करत होते.

परी तेलंग नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.

नाटक व मालिकांमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने घराघरात पोहचलेली अभिनेत्री दिशा दानडे नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. तिच्या नवºयाचे नाव सुहास लखन असून तोदेखील मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे.