एप्रिलची सुरुवात सुखमय: १० राशींवर वरदहस्त, नवीन ओखळीतून लाभ; थकबाकी मिळेल, शुभ काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 09:28 IST
1 / 15या सप्ताहात शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. ग्रहस्थिती अशी- बुध, गुरू आणि हर्षल मेषेत, केतू कन्येत, प्लूटो मकरेत, मंगळ, शनी आणि शुक्र कुंभेत असून, शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. तेथे त्याची युती रवि, राहू आणि नेपच्यून यांच्याशी होईल. 2 / 15चंद्राचे भ्रमण वृश्चिक, धनु, मकर आणि कुंभ राशीतून होईल. मंगळवारी कालाष्टमी, शुक्रवारी पापमोचनी एकादशी, संत बाळूमामा उत्सव, तर शनिवारी प्रदोष आहे. एप्रिल महिन्यात गुढीपाडवा, राम नवरात्र, श्रीरामनवमी असे बरेच सण साजरे गेले जाणार आहेत. एप्रिल महिना सांस्कृतिक धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिने विशेष असल्याचे सांगितले जात आहे. 3 / 15एप्रिल महिन्याला सुरुवात झाली असून, आगामी काळ तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या...4 / 15मेष: व्यापाऱ्यांना नवीन कंत्राट मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणाऱ्यांना त्यांची कामे पूर्ण करावी लागतील. नवीन नोकरीची ऑफर येईल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. एखाद्या धार्मिक यात्रेस जाल. भावंडांच्या उच्च शिक्षणासाठी परिचितांशी बोलणी कराल. अभ्यासात मदत करू शकतील असे मित्र बनवावे लागतील. प्रकृतीत हळूहळू सुधारणा होईल. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. कामात मदत कराल. एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याचे आयोजन कराल. प्राप्तीची नवीन साधने उपलब्ध होतील. भावंडांचे सहकार्य मिळेल. मातेचे सानिध्य लाभेल. परदेशातून शिक्षण प्राप्त करण्याची संधी मिळेल.5 / 15वृषभ: कुटुंबाचे सहकार्य मिळेल. विवाहेच्छुकांच्या विवाहाची बोलणी संभवतात. वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण व्यतीत करतील. उच्च शिक्षण घ्यावयाचे आहे त्यांना चांगली संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांना मन लावून अध्ययन करावे लागेल. अन्यथा अपेक्षित परिणाम मिळू शकणार नाहीत. आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यापारी व्यापार वृद्धीत यशस्वी होतील. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. पैतृक संपत्तीचा लाभ होऊ शकतो. सरकारी क्षेत्रातून लाभ संभवतो. वैवाहिक जोडीदारास एखादे नवीन काम सुरु करून देऊ शकाल. माता - पित्याचे सानिध्य व सहकार्य मिळेल.6 / 15मिथुन: नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. व्यापारी व्यापाराचा विस्तार करण्यात यशस्वी होतील. शैक्षणिक जीवनात यश प्राप्ती होईल. विद्यार्थी रोजच्या दिनचर्येप्रमाणे अध्ययन करत असल्याचे दिसून येईल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कुटुंबियांकडून धनलाभ संभवतो. प्रवासाची संधी मिळू शकते. हे प्रवास सुखावह होतील. विवाहेच्छुकांच्या विवाहाची बोलणी संभवतात. भावंडांच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतील. एखाद्या दूरस्थ नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळेल. पालकांना मुलांचा अभिमान वाटेल, असे काही घडू शकेल.7 / 15कर्क: आर्थिक बाबतीत चिंता करण्याची आवश्यकता नाही. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कौटुंबिक व घरगुती खर्च होतच राहतील. रोजची प्राप्ती उत्तम असेल. विवाहित व्यक्तींना त्यांच्या जीवनात चांगले नाते असल्याची जाणीव होईल. प्रणयी जीवन सुखावह होईल. प्रेमिकेसह दूरवर फिरावयास जाल. एकमेकांना भेटवस्तू द्याल. कारकिर्दीत एखादी समस्या निर्माण झाली तरी सहजपणे सामोरे जाऊ शकाल. नोकरी करणाऱ्यांना कार्यकौशल्यामुळे लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा खूप प्रयत्न करतील. उच्च शिक्षणासाठी काळ अनुकूल आहे. घरात पूजा-पाठाचे आयोजन होईल. सर्वजण एकजुटीने कार्य करत असल्याचे दिसून येईल.8 / 15सिंह: मित्रांच्या सहवासात थोडा वेळ व्यतीत कराल. सुख-दुःखाची देवाण-घेवाण करत असल्याचे दिसून येईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जोडीदारासह आनंदाचे क्षण व्यतीत कराल. विवाहेच्छुकांच्या विवाह प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल. प्रणयी जीवन सुखावह होईल. नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. वरिष्ठ कामाचे कौतुक करतील. व्यापारात यश प्राप्त होईल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्ती होईल. विद्यार्थी मेहनत करत असल्याचे दिसेल. अपेक्षित परिणाम मिळेल. वडीलधाऱ्यांचा वरदहस्त राहील. घरात पूजा-पाठाचे आयोजन होईल. अशा प्रसंगी घरी लोकांची ये-जा होईल. 9 / 15कन्या: विवाहित व्यक्ती जोडीदारासह दूरच्या प्रवासास जातील. एकमेकांच्या सहवासात वेळ घालविण्याची संधी मिळेल. प्रणयी जीवन उत्तमच असेल. कुटुंबीय एकत्रितपणे एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचे आयोजन करतील. जे घरापासून दूर राहून नोकरी करत आहेत ते घराच्या आठवणीने त्रस्त होतील. विद्यार्थी अभ्यासाच्या जोडीने एखाद्या इतर प्रवृत्तीत सहभागी होतील. उच्च शिक्षणासाठी कालावधी उत्तम आहे. व्यावसायिकांच्या व्यवसाय पुढे नेताना नवीन ओळखी होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरी करणाऱ्यांची वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल. पालकांचे सहकार्य मिळेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. मुलांच्या भवितव्यासाठी पालक आर्थिक गुंतवणूक करतील.10 / 15तूळ: व्यापाऱ्यांना व्यापारवृद्धीची संधी मिळेल. नवीन ओळखी होतील. नोकरी करणाऱ्यांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. थकबाकी मिळेल. खोळंबलेली सर्व कामे पूर्ण करू शकाल. कालावधी कर्ज घेण्यासाठी अनुकूल आहे. जमीन-जुमल्यात गुंतवणूक करू शकता. पैतृक संपत्तीतून धनलाभ संभवतो. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. पालकांना मनातील विचार बोलून दाखवाल. घरात पूजा-पाठाचे आयोजन होईल. नोकरीच्या बरोबरीने एखादा जोड व्यवसाय करण्याचा निर्णय घ्याल.11 / 15वृश्चिक: वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. सहकार्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण कराल. विवाह प्रस्तावावर शिक्कामोर्तब होईल. एखाद्या नातेवाईकाशी भांडण संभवते. वैवाहिक जोडीदाराचे सहकार्य मिळेल. विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकतात. प्रकृती चांगली राहील. दिनचर्येत सकाळचे फिरणे, योगासन व ध्यान-धारणेस समाविष्ट करणे हितावह होईल. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर येईल. व्यावसायिक व्यवसायात काही बदल करतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. एखादी गुंतवणूक केली असेल तर त्यातून चांगला लाभ होईल. मनःशांतीसाठी एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हावे.12 / 15धनु: प्रेमीजनांसाठी कालावधी उत्तम आहे. कोणत्याही मोठ्या बदलाची अपेक्षा बाळगू नये. वैवाहिक जोडीदाराशी मनातील व्यथांवर चर्चा जरूर करा. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. कुटुंबाची अतिरिक्त जवाबदारी सोपविण्यात येईल. ती जबाबदारी जरूर पूर्ण करू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. दैनिक प्राप्तीत वाढ होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती नोकरीच्या ठिकाणी त्यांना देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करतील. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. व्यापारी व्यापारवृद्धी करण्यात यशस्वी होतील. विद्यार्थी स्पर्धेसाठी खूप मेहनत करत असल्याचे दिसेल. मनःशांतीसाठी आपण थोडा वेळ धार्मिक कार्यात सुद्धा व्यतीत कराल.13 / 15मकर: प्रेमिकेचे सहकार्य मिळेल. तिच्यासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाल. जीवनात आनंदाचे वातावरण राहील. एखाद्या मित्राच्या भेटीने खूप आनंदित झाल्याचे दिसून येईल. आर्थिक स्थिती ठीक राहील. खर्चात वाढ होईल. हे खर्च टाळू शकणार नाहीत. प्रिय असलेल्या व्यक्तींसाठी काही वस्तू खरेदी कराल. नोकरीच्या ठिकाणी सावध राहावे लागेल. कोणाशीही वाद घालू नका. व्यापाऱ्यांना व्यवसायाकडे लक्ष द्यावे लागेल. असे केल्यास ते व्यापारवृद्धी करण्यात यशस्वी होऊ शकतील. अभ्यासातील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करावा. असे केल्याने परीक्षेत यशस्वी होऊ शकाल. वेळ वाया दवडतील अशा मित्रांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. बाहेरील पदार्थ खाणे टाळावे.14 / 15कुंभ: कुटुंबियांसह एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचे आयोजन कराल. जास्तीत जास्त वेळ प्रेमिकेच्या सहवासात घालवाल. विवाहित व्यक्ती जोडीदारावर शंका घेण्याची संभावना आहे. अशा वेळी बसून चर्चा करणे हितावह राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. जमीन, मालमत्तेत गुतंवणूक करू शकता. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित कराल. चांगले परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींची नोकरीत प्रगती होईल. व्यापारी व्यवसायवृद्धी करण्यात यशस्वी होतील. घरात पूजा-पाठाचे आयोजन होईल. नवीन वाहनाचे सौख्य लाभेल. पालकांचे सहकार्य लाभेल.15 / 15मीन: संबंधांसाठी उत्तम सुरुवात आहे. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. प्रेमिकेसह दूरवरचा प्रवास करू शकता. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. अध्ययनात काही विघ्न सुद्धा येऊ शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवते. व्यापाऱ्यांच्या हाती एखादा मोठा सौदा लागू शकतो. व्यापारात चांगला लाभ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कामावर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. भागीदारीत एखादा व्यवसाय करत असाल तर आपल्या भागीदाराशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत. आरोग्याची काळजी घ्यावी.