1 / 14या सप्ताहात दि. ३० मे रोजी शुक्र कर्क राशीत जाईल. अन्य कुठलेही ग्रहपालट नाही, ग्रहस्थिती अशी - गुरु, राहू, बुध आणि हर्षल मेषेत रवी वृषभ राशीत, शुक्र ३० तारखेपर्यंत मिथुनेत, तर सायंकाळी ७:३८ ला कर्क राशीत जाईल. तेथे त्याची युती मंगळाशी होईल, केतू तुळेत, प्लूटो मकरेत, शनी कुंभ राशीत, तर नेपच्यून मीन राशीत आहे. 2 / 14चंद्राचे भ्रमण सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक राशीतून राहील. रविवारी दुर्गाष्टमी, सोमवारी महेश नवमी, बुधवारी निर्जला एकादशी, गुरुवारी प्रदोष, तर शनिवारी वटपोर्णिमा आहे. रविवार, दि. २८ मे २०२३ रोजी ज्येष्ठ शुक्ल अष्टमी (सकाळी ९:५७ पर्यंत) आहे. दुसया दिवशी उत्तर रात्री २:२० पर्यंत पूर्वा, तर त्यानंतर उत्तरा नक्षत्र राहील. रास सिंह राहील. 3 / 14मनासारख्या घटना घडतील. सप्ताहाची सुरूवात उत्साहात होईल. ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. अनेक प्रलंबित कामे पूर्ण होतील. त्यामुळे मनावरील ताण निघून जाईल. मौजमजा करण्यासाठी वेळ द्याल. घराच्या सजावटीसाठी पैसे खर्च केले जातील. घरातील सदस्यांबद्दल मनात काही काळजीचे विचार राहतील. मात्र, काळजी करण्याचे कारण नाही. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. तुमच्या सल्ल्याने लोकांना हुरूप येईल.4 / 14प्राप्तीच्या दृष्टीने चांगला काळ आहे. सप्ताहाच्या पूर्वार्धात एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होऊ शकतो. व्यवसायात भरभराट होईल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. भावंडांसाठी वेळ द्याल. घरी पाहुणे मंडळी येतील. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. त्यामुळे तुमच्यावर कामाचा ताण राहील. मुलांची प्रगती होईल. तब्येतीची काळजी घ्या. विरोधकांच्या कारवाया सुरु राहतील. सामाजिक कार्यात आघाडीवर राहाल. 5 / 14महत्त्वाची कामे होतील. या सप्ताहात धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. विविध मार्गांनी धनप्राप्ती होईल. विविध लाभ होतील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. वडिलधाऱ्या मंडळींचे सहकार्य मिळेल. कार्यक्रमात सहभागी व्हाल. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जवळचा प्रवास घडून येईल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. नवीन नोकरीच्या संधी मिळतील. मुलांची काळजी घ्या. त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घ्या. 6 / 14या सप्ताहात आपली अडून राहिलेली अनेक कामे पूर्ण होतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू प्राप्त होतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. भावंडांची चांगली साथ तुम्हाला राहील. नोकरीत काही बदल होऊ शकतात. अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे. त्याऐवजी थोडे बचतीकडे लक्ष द्या. मुलांना योग्य मार्ग मिळेल. त्यांच्याशी संवाद साधा.7 / 14चैनीवर खर्च कराल आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. सतत पैसा मिळत राहील. मात्र, खर्चाचे प्रमाण वाढते राहील. हौसमौज, चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. कुणी तुम्हाला मोहात पाडून आर्थिक बाबतीत अडचणीत आणू शकते. त्या दृष्टीने सावध राहा. भावंडांना मदत करावी लागेल. त्यांच्याशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. वारसाहक्काने मिळणाऱ्या उत्पन्नाचा लाभ होईल. मुलांची प्रगती होईल. त्यांना योग्य संधी मिळेल. नोकरीत नवीन अनुकूल बदल होतील. 8 / 14जवळचा प्रवास होईल. सप्ताहाची सुरुवात थोडी चाचपडत होईल. पण, तुम्ही संयमाने वागल्यास अडचणी दूर होतील. आर्थिक आवक मनासारखी राहील. अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात पैसे मिळतील. मात्र, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात आर्थिक फसवणुकीपासून सावध राहा. मालमत्तेच्या कामात सफलता मिळेल. वडीलधाच्या मंडळींचा मान राखा. भावंडांशी सख्य राहील. विवाहेच्छुनी आलेल्या स्थळांची नीट माहिती घेऊन मगच पुढचे पाऊल टाकले पाहिजे. 9 / 14प्रगतीला पूरक वातावरण. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. हाती घेतलेल्या महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. मौजमजा करण्याच्या निमित्ताने प्रवास घडून येतील. मात्र कार्यक्षेत्रात तुम्हाला मोहात पाडून फसवण्याचा कुणी प्रयत्न करेल. त्या दृष्टीने थोडे सावध राहा. घरात आनंदी वातावरण राहील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. नवीन संधी मिळतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. नवीन ओळखी होतील.10 / 14संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. प्रवासाचे योग येतील. प्रवासात दगदग होईल. नियोजन करून प्रवास करा. जीवनसाथी चांगली साथ देईल. व्यवसायात सुरुवातीला दगदग होईल. मात्र कौशल्यपूर्वक परिस्थिती हाताळली तर नंतर परिस्थिती तुमच्या नियंत्रणात येईल. नोकरीत बदलीची शक्यता आहे. कामे वाढतील. नवीन ओळखी होतील. त्यात तुमचा फायदा होईल. मित्रांच्या मदतीने महत्त्वाची कामे पूर्ण कराल. मुलांची काळजी घ्या. त्यांच्या संगतीकडे लक्ष द्या. 11 / 14कार्यक्षेत्रात बदल होतील एखाद्या उलाढालीत अचानक मोठा फायदा होऊ शकतो. मात्र, आर्थिक देवाणघेवाण करताना खबरदारी घ्या. कुणी तुमची फसवणूक करु शकते. काही अडचणी येतील. शांत चित्ताने विचार करून त्यातून मार्ग काढण्याची गरज आहे. मुलांचे कौतुक होईल. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. समाजात गौरव होईल. नोकरीत काही बदल होऊ शकतात. कार्यक्षेत्रात नवीन करार करताना अटी व शर्ती समजून घ्या. घरी अनाहूत पाहुणे मंडळी येतील.12 / 14नोकरीत बदल होतील. मालमत्तेची कामे सफल होतील. त्यामुळे तुमची मोठी काळजी दूर होईल. व्यवसायात भरभराट होईल. मात्र, मोठी गुंतवणूक करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्या. नोकरीत काही बदल होतील. सेवेतील करार मदार करताना खबरदारी घ्या. घरी पाहुणे येतील. त्यांची सरबराई करण्यात वेळ जाईल. वाहनाची दुरुस्ती वेळीच करून घ्या. रहदारीचे नियम पाळा. मित्र-मैत्रिणींना भेटण्याची संधी मिळेल. 13 / 14मुलांची प्रगती होईल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मात्र खर्चाला अनेक वाटा राहतील. वैद्यकीय कारणासाठी खर्च होऊ शकतो. स्वतःची व कुटुंबातील सदस्यांची काळजी घ्या. खाण्यापिण्याचे पथ्य पाळणे आवश्यक आहे. चांगल्या सवयी नसलेल्या मित्रांच्या संगतीत वाहवत जाऊ नका. मुलांना चांगल्या संधी मिळतील. चांगल्या बातम्या कळतील. जीवनसाथीशी चांगले संबंध राहतील. नोकरीत उच्च अधिकार मिळतील. प्रलंबित प्रश्न सुटतील. 14 / 14काही कटू काही गोड अनुभव येतील. खाचखळग्यांची शर्यत यशस्वीपणे पार पडेल. त्यात दगदग होईल. पण, शेवटी यश मिळाल्याने कष्टाचे काही वाटणार नाही. प्रेम प्रकरणात फसगत होऊ शकते. कुणी तुम्हाला मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल. त्या दृष्टीने सावध राहा. मुलांचे हट्ट पुरवावे लागतील. मात्र, त्यांच्या संगतीकडे लक्ष द्या. नोकरी, व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील.