शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साप्ताहिक राशीभविष्य: राहु-केतु-शुक्र गोचर, शनि जयंती; ६ राशींना लाभ, ६ राशींना तापदायक काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 09:23 IST

1 / 15
Weekly Horoscope: या सप्ताहात राहु, केतु आणि शुक्र यांचा राशीपालट आहे. ग्रहस्थिती अशी-रवि, बुध आणि हर्षल मेष राशीत आहे. गुरू मिथुन राशीत, तर मंगळ कर्क राशीत आहे. केतु कन्या राशीत आहे. प्लूटो मकर राशीत आहे. शुक्र, शनि, राहु आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. २९ मे २०२५ रोजी रात्री १०.२६ वाजता राहु वक्री कुंभ राशीत, तर केतु वक्री सिंह राशीत प्रवेश करत आहे. ३१ मे रोजी शुक्र मेष राशीत प्रवेश करेल.
2 / 15
चंद्राचे भ्रमण मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क या राशींमधून राहील. दि. २६ मे रोजी दर्श भावुका अमावस्या, सोमवती अमावास्या व शनैश्चर जयंती आहे. २७ रोजी कर आहे. ३० रोजी विनायकी चतुर्थी आहे.
3 / 15
या आगामी आठवड्याचे एकंदरीत ग्रहमान आणि असणारी व्रत-वैकल्ये पाहता कोणत्या राशींना मे महिन्याची सांगता उत्तम ठरू शकेल? जाणून घेऊया...
4 / 15
मेष: हा आठवडा गोंधळ उडवणारा आहे. प्रेमीजनांसाठी आठवडा सामान्य फलदायी आहे. विवाहितांनी प्रयत्न केल्यास त्यांच्या समस्या दूर करण्यात ते यशस्वी होतील, अन्यथा नात्यातील समस्या वाढतच जातील. एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकाल. आर्थिक स्थितीची काळजी करावी लागणार नाही. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती होण्यास आठवडा अनुकूल आहे. नोकरीत बदल करण्यास आठवडा अनुकूल आहे. व्यापारात चांगला लाभ होण्याची संभावना असल्याने ते प्राप्ती वाढविणाऱ्या स्रोतांवर लक्ष केंद्रित करतील. विद्यार्थ्यांना अध्ययनावर लक्ष केंद्रित करावे लागेल. इतर प्रवृत्तीत जरी त्यांचे लक्ष लागले तरी स्पर्धेत ते यशस्वी होऊ शकतील. कामांवर लक्ष केंद्रित करावे.
5 / 15
वृषभ: हा आठवडा चढ-उताराने भरलेला आहे. प्रकृतीस आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. प्रेमीजनांचे नाते प्रेमाने भरलेले असेल. ते त्यांच्या प्रेमिकेस योग्य तितका वेळ देऊ शकतील व त्यामुळे जवळीक वाढेल. विवाहितांनी इतर कोणाच्या प्रेमात पडू नये. जोडीदारावर लक्ष केंद्रित केल्यास त्यांच्या नात्यातील विश्वास वाढेल. हा आठवडा आर्थिक दृष्ट्या चांगला आहे. प्राप्तीचे स्रोत वाढल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. ह्या आठवड्यात एखादा नवीन व्यवसाय करण्याचा विचार कराल. जो उत्तमच असेल. शेअर्स बाजारात चांगली गुंतवणूक कराल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामात व्यस्त राहतील. त्यांना वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी समजून घ्यावी लागेल. विद्यार्थी त्यांच्या अध्ययनावर लक्ष केंद्रित करतील, ज्यात कुटुंबियांचे त्यांना पूर्ण सहकार्य लाभेल.
6 / 15
मिथुन: ह्या आठवड्यात प्रेमीजनांच्या नात्यात समस्या वाढणार असल्याने त्यांना सतर्क राहावे लागेल. विवाहितांसाठी आठवडा आनंददायी असेल. ते जोडीदारासह वेळ घालवतील व त्यामुळे एकमेकांना समजून घेण्याची संधी त्यांना मिळेल. ह्या आठवड्यात खर्चात वाढ झाली तरी प्राप्ती वाढेल. खर्चाची यादी बनवावी. प्राप्तीच्या स्रोतांवर लक्ष केंद्रित कराल. हा आठवडा व्यापारासाठी उत्तम आहे. काही नवीन ओळखी होतील, ज्या व्यवसायास मदतरूप ठरतील. नोकरी करणाऱ्यांची पदोन्नती संभवत असल्याने, आहे त्या नोकरीतच राहणे उत्तम. विद्यार्थ्यांसाठी आठवडा समस्याग्रस्त आहे. ते मित्रांच्या सहवासात व सामाजिक माध्यमांवर वेळ घालवत राहिल्याने त्यांचे लक्ष अभ्यासाकडे राहणार नाही.
7 / 15
कर्क: हा आठवडा आपल्यासाठी चढ-उतारांचा आहे. मानसिक तणावामुळे काहीसे त्रस्त व्हाल. मात्र, शारीरिक दृष्ट्या आपण तंदुरुस्त राहाल. रक्तवाहिन्यांशी संबंधित एखादा त्रास होत असल्यास तो वाढण्याची संभावना आहे. वेळेवर उपचार केल्यास त्यातून सुटका होईल. दिनचर्येत योगासन, ध्यान-धारणा इत्यादींचा समावेश करू शकता. असे केल्याने इतर अनेक समस्यांतून आपणास दिलासा मिळू शकेल.
8 / 15
सिंह: हा आठवडा प्रेमीजनांसाठी काहीसा प्रतिकूल आहे. प्रेमिकेच्या वागणुकीत बदल झाल्याने नात्यात समस्या वाढतील. विवाहितांना त्यांच्या वैवाहिक जीवनात समन्वय साधावा लागेल, अन्यथा एकमेकांना समजून घेण्यात त्रास होईल. शेअर बाजाराशी संबंधित व्यक्तींसाठी आठवडा चांगला असल्याने पैसा कमाविण्याचा विचार करू लागाल. प्राप्तीत जरी वाढ झाली तरी खर्चात वाढ होणार आहे. ह्या आठवड्यात व्यापाऱ्यांना सावध राहावे लागेल. त्यांना त्यांच्या जुन्या योजनांवर लक्ष द्यावे लागेल, अन्यथा त्यांचा बराचसा पैसा बुडू शकतो. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या सहकाऱ्यांची मदत मिळाली तरी वरिष्ठांच्या मदतीची आवश्यकता त्यांना भासेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. त्यांनी जर एखाद्या स्पर्धेत भाग घेतला असेल तर त्यांना चांगले परिणाम मिळतील.
9 / 15
कन्या: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. विवाहितांसाठी आठवडा चांगला आहे. कुटुंबियांशी बसून नात्यातील अंतर सहजपणे कमी करू शकाल. प्रेमीजनांच्या जीवनात तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे समस्या वाढतील, ज्या सामंजस्याने दूर कराव्या लागतील. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. परदेशात व्यवसायाचा विस्तार करण्यात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सावध राहावे लागेल. योग्य ठिकाणी आर्थिक गुंतवणूक केलीत तर ती हिताची होईल. ह्या आठवड्यात खर्च वाढतील. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. ह्या आठवड्यात कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नये.
10 / 15
तूळ: हा आठवडा काहीसा प्रतिकूल असू शकतो. प्रेमीजनांना त्यांचे नाते टिकवून ठेवावे लागेल. भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल. विवाहित व्यक्ती त्यांच्या जोडीदारास एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास घेऊन जाऊ शकतील. आर्थिक दृष्ट्या आठवडा चांगला आहे. खोळंबलेल्या पैशामुळे त्रस्त व्हाल. कामे करण्याचा प्रयत्न कराल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. योजनांवर लक्ष द्याल. प्रॉपर्टीशी संबधित एखाद्या कामासाठी कर्ज घ्यावयाचे असल्यास ते सहजपणे प्राप्त होऊ शकेल. प्रकृतीच्या बाबतीत त्रासून जाल. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवून अभ्यास करावा लागेल.
11 / 15
वृश्चिक: हा आठवडा सामान्य फलदायी असण्याची संभावना आहे. मानसिक तणावाखाली वावराल. हा तणाव घालविण्याचा प्रयत्न करावा. ह्या आठवड्यात एकटेपणा जाणवेल. अशा वेळी जीवनात एखाद्या नवीन व्यक्तीचे आगमन होऊ शकते. विवाहित व्यक्ती कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालवतील. ह्या आठवड्यात आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च करू नये. बाहेर जाण्यावर अत्यंत खर्च होईल. वाहन सावध राहून चालवावे लागेल. व्यापारी भागीदारीत व्यवसाय करण्याची संभावना असल्याने त्यांनी व भागीदारानी आपल्या कामांवर लक्ष द्यावे. नोकरी करणाऱ्यांची बदली संभवते. विद्यार्थी त्यांच्या सभोवतालच्या वातावरणाने त्रस्त होतील. त्याचा प्रतिकूल परिणाम त्यांच्या अध्ययनावर होऊ शकतो. ह्या आठवड्यात एखादा मोठा आर्थिक निर्णय घ्याल ज्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होऊ शकतो.
12 / 15
धनु: हा आठवडा चांगला असण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अत्यंत चांगला आहे. व्यापारातून चांगला फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. मात्र, पदोन्नती मिळविण्याच्या नादात कामात कोणत्याही प्रकारे गडबड होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. अशी काळजी घेतल्यास वरिष्ठ आपल्यावर प्रसन्न होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या बाबतीत सतर्क राहावे. इतर प्रवृत्तीत वेळ दवडल्यास त्याचा प्रतिकूल परिणाम अभ्यासावर होऊ शकतो. ह्या आठवड्यात कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नये. ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत त्यांना एखादी चांगली नोकरी मिळू शकते. विवाहितांना त्यांच्या जोडीदाराशी कौटुंबिक विषयांवर चर्चा करावी लागेल. त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होऊ शकेल.
13 / 15
मकर: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. विवाहितांसाठी हा आठवडा मिश्र फलदायी आहे. जोडीदाराशी मोकळेपणाने चर्चा करू शकाल. कुटुंबियांशी समन्वय साधू शकाल. प्रेमीजनांच्या जीवनात आनंद तर पसरेल परंतु काही आव्हानांमुळे तो वाया जाईल. मित्र एखाद्या योजनेत गुंतवणूक करण्यासंबंधी चर्चा करू शकतील. आर्थिक स्थिती पूर्वी पेक्षा चांगली असेल. तेव्हा आर्थिक स्थितीची काळजी करू नये. व्यवसायात काही बदल करावयाचा असेल तर तो ह्या आठवड्यात करू शकता. नोकरीत प्रगती झाल्याने प्रसन्न व्हाल. सावध राहावे लागेल. पदोन्नती संभवते. विद्यार्थी ह्या आठवड्यात एखाद्या नवीन संशोधनात सहभागी होऊ शकतात. जे त्यांच्यासाठी चांगला असेल. परंतु मार्गदर्शन करणारी व्यक्ती काही कारणाने नाराज होऊ शकते. विद्यार्थी एखाद्या नवीन अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. ज्यासाठी अनेक दिवसांपासून ते प्रयत्नरत होते. अति तेलकट व मसालेदार पदार्थ खाऊन आपली प्रकृती बिघडण्याची संभावना असल्याने आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल.
14 / 15
कुंभ: हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. प्रेमीजनांचे नाते दृढ होईल. त्यांच्या नात्यातील सर्व समस्यांचे निराकरण होईल. परंतु, व्यस्ततेमुळे समस्या एखादा ठोका देऊ शकते. आपले नाते तुटण्या पर्यंत जाऊ शकते. अशा परिस्थितीत आपणास मोजून मापून बोलावे लागेल. आपण जर घाई केलीत तर आपलेच काही नुकसान होऊ शकते. ह्या आठवड्यात कोणाचे ऐकून एखादी मोठी आर्थिक गुंतवणूक करू नये. अन्यथा ती व्यक्ती आपली आर्थिक फसवणूक करू शकते. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. आपल्या मित्रांपासून काही अंतर ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. व्यापारात काही बदल करण्याचा विचार आपण करू शकता, जो आपल्या हिताचा असेल. आपणास प्रकृतीचा जो त्रास होत आहे तो वाढू नये म्हणून आपणास वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल.
15 / 15
मीन: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा मिश्र फलदायी आहे. खर्चात वाढ होणार आहे. ह्या आठवड्यात प्रवासासाठी बराच पैसा खर्च कराल. वैवाहिक जोडीदार एखाद्या वस्तूची मागणी करण्याची संभावना आहे. प्रेमीजनांच्या समस्या वाढण्याची शक्यता आहे. नाते दृढ करण्यासाठी दोघांनीही नाते जपण्याची गरज आहे. त्यासाठी प्रेमिकेस एखाद्या रमणीय ठिकाणी फिरावयास घेऊन जाऊ शकता. व्यापारात एखाद्या व्यक्तीशी भागीदारी करू शकता. विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासाव्यतिरिक्त इतरत्र लागल्याचा विपरीत परिणाम अभ्यासावर होऊ शकतो.
टॅग्स :Weekly Horoscopeसाप्ताहिक राशीभविष्यAstrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिकvinayak chaturthiविनायक चतुर्थी