साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना समाधानाचा काळ, शेअर बाजारातून फायदा; बँकेतील शिल्लक वाढेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 08:11 IST
1 / 15या सप्ताहात कुठलेही ग्रहपालट नाही. ग्रहस्थिती अशी - गुरु, राहू आणि हर्षल मेषेत, शुक्र कन्येत, केतू तुळेत, रवी मंगळ आणि बुध वृश्चिकेत, प्लूटो मकरेत, शनी कुंभत; तर नेपच्यून मीन राशीत आहे. 2 / 15चंद्राचे भ्रमण कर, कुंभ, मीन आणि मेष राशीतून राहील. या सप्ताहात सोमवारी सकाळी १० वाजून ०८ मिनिटांपासून पंचक सुरु होत आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार या दिवशी पूर्ण काळ पंचक असून, शुक्रवारी दुपारी ४ वाजून ०१ मिनिटांपर्यंत पंचक राहील. गुरुवारी प्रबोधनी एकादशी आहे. शुक्रवारी प्रदोष असून, तुलसी विवाहास प्रारंभ होत आहे. चातुर्मास समाप्त होईल. 3 / 15दिवाळीनंतरचा आगामी आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींना भरपूर लाभ होतील? नोकरी, व्यवसाय, कुटुंब, वैवाहिक जीवन, व्यापार-व्यवसाय-बिझनेस, करिअर या आघाड्यांवर आगामी सप्ताहात काय प्रभाव पडू शकेल? जाणून घेऊया... 4 / 15मेष: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील तणाव आता काही प्रमाणात दूर होतील. असे असले तरी सतर्क राहावे. सुखद बातमी मिळण्याची संभावना आहे. व्यावसायिक कामानिमित्त एखादा दूरवरचा प्रवास करू शकता. निर्यातीतून लाभ होईल. एखाद्या नवीन संस्थेशी किंवा व्यक्तीशी भागीदारी करण्याची संधी मिळेल, जी भविष्यात लाभदायी होऊ शकेल. नोकरी चांगली चालेल. कामाचा आनंद घेऊ शकाल. पदोन्नती संभवते. पगारवाढीसाठी बोलणी करू शकता. खर्चात वाढ होईल व त्यामुळे आपण त्रासून जाऊ शकता. परंतु आपली निर्णय क्षमता उत्तम असल्याने हळूहळू परिस्थितीत सुधारणा करू शकाल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा परिश्रम करण्याचा आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. किरकोळ त्रास संभवतात.5 / 15वृषभ: हा आठवडा मानसिक ताण वाढविणारा आहे. असे असले तरी विवाहितांच्या वैवाहिक जीवनात परस्पर सामंजस्य वाढेल. नाते अधिक दृढ करण्यासाठी नव्याने काही प्रयत्न कराल. सध्या एकीकडे आपले खर्च तर दुसरीकडे मानसिक ताण अर्थात दोन्ही शीघ्र गतीने वाढतील. त्यामुळे चिंता वाढतील. असे असले तरी प्राप्तीत सुधारणा होऊ लागेल. नवनवीन प्रकारे प्राप्तीत वाढ करण्यावर लक्ष देऊ लागाल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. पदोन्नती संभवते. काम व कामाची पद्धत ह्यांचे कौतुक होईल. व्यापारासाठी आठवडा उपयुक्त ठरेल. बुद्धी सामर्थ्याने कामांना शीघ्र गतीने पुढे घेऊन जाल. विद्यार्थ्यांना खूप परिश्रम करावे लागतील. त्याचे यथोचित परिणाम मिळतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. 6 / 15मिथुन: हा आठवडा चढ-उतारांनी भरलेला आहे. वैवाहिक जीवन सुखावह होईल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. कोणतेही मोठे काम हाती घेऊ नका, अन्यथा ते पूर्ण करण्यास त्रास होऊ शकतो. खर्चात वाढ होईल. अचानकपणे होणारे खर्च चिंतेत भर घालू शकतात. कौटुंबिक जवाबदाऱ्यांकडे लक्ष द्यावे. नोकरीच्या ठिकाणी काही समस्या होऊ शकतात. विरोधकांपासून सावध राहणे गरजेचे आहे. व्यापारासाठी हा आठवडा अनुकूल आहे. प्रयत्न यशस्वी होतील. व्यापारात तेजी येईल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. अभ्यासात एखाद्या व्यक्तीच्या मदतीची आवश्यकता भासू शकते. ती भावंडांपैकी किंवा मित्रांपैकी कोणीही असू शकते. त्यांच्या मदतीने अभ्यास करणे लाभदायी होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.7 / 15कर्क: हा आठवडा चांगला आहे. वैवाहिक जीवन सुखद होईल. जोडीदाराच्या सहकार्याने एखादे नवीन काम करण्याचा प्रयत्न कराल. घरात जमीन - जुमल्याशी संबंधित बाबींवर चर्चा होईल. एखादी मोठी प्रॉपर्टी खरेदी करण्यात यश प्राप्ती संभवते. जर स्वतःचे घर बनविण्याचा विचार करत असाल तर त्यात यशस्वी होता येईल. बँकेतील शिल्लक वाढेल. शेअर बाजारात गुंतवणूक केल्याने फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांनी अनुभवाचा फायदा घ्यावा. व्यापारासाठी एखाद्या तज्ञ व्यक्तीच्या आधाराची गरज भासेल. विद्यार्थी अभ्यासात रमून जातील. ते काही नवीन विषयांचा अभ्यास करतील. त्यावर लक्ष केंद्रित करतील. आहाराकडे लक्ष द्यावे लागेल.8 / 15सिंह: हा आठवडा मध्यम फलदायी आहे. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनातील समस्यांना बाजूस सारून वाटचाल करतील. सामंजस्य उत्तम करण्याचा प्रयत्न करतील. परिश्रम तर करालच, परंतु त्याचे पूर्ण फळ मिळणार नाही. हिंमत हारु नका. आगामी काळात त्याची भरपाई होईल. कार्यक्षेत्री परिश्रम चालूच ठेवावेत. कोणाशीही जास्त न बोलता आपले काम करत राहावे. व्यापारी व्यवसाय वृद्धीवर लक्ष केंद्रित करतील. त्यासाठी एखाद्या नवीन क्षेत्रात शिरकाव करण्याचा प्रयत्न करतील. एखाद्या कामासाठी त्यांना कायदेशीर सल्ला घेण्याची गरज भासू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यामुळे स्पर्धेत यश प्राप्त होऊ शकते. मित्रांचे सहकार्य मिळेल. एखादी चांगली योजना बनवून ते अभ्यासात प्रगती करू शकतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. 9 / 15कन्या: हा आठवडा चांगला आहे. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात संतुष्ट होण्याच्या मार्गावर असतील. प्रॉपर्टीशी संबंधित कामातून फायदा होऊ शकतो. रिअल इस्टेटशी संबंधित काम करत असाल तर हा आठवडा फायदेशीर ठरणार आहे. एखादा मोठा सौदा संभवतो. त्यात मोठा लाभ होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. सहकाऱ्यांशी सलोखा राहील. त्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कौशल्याचा वापर करून नोकरीच्या ठिकाणी उत्तम कामगिरी करून दाखवू शकाल. त्यामुळे स्थितीत सुधारणा होईल. योजना अनुकूल दिशेत मार्गक्रमण करतील. काही नवीन योजनांवर कार्यरत राहाल. विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत गंभीर होऊन परिश्रम करतील. त्याचे चांगले फळ अनुभवास येतील. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. 10 / 15तूळ: हा आठवडा काही नवीन शिकविणारा आहे. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा आनंद घेऊ शकतील. खर्चांवर नियंत्रण कसे ठेवावे हे शिकण्याची वेळ आता आली आहे. अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. खर्चांवर नियंत्रण ठेवून प्राप्तीत कशी वाढ करता येईल यावर लक्ष केंद्रित करावे. व्यापारासाठी आठवडा सामान्य आहे. गुंतवणूक करणे सध्या जोखमीचे ठरू शकते. गुंतवणूक करण्याची आवश्यकताच असेल तर दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करावे. नोकरीत धावपळीचा आठवडा आहे. व्यापाऱ्यांना सरकारी क्षेत्राकडून मोठा लाभ संभवतो. विद्यार्थी गंभीरतेने त्यांचे अध्ययन करतील. त्याचे सुखद परिणाम मिळतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. 11 / 15वृश्चिक: हा आठवडा मिश्र फलदायी आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन हळूहळू संतुलित होऊ लागेल. काहीसा त्रास होईल. मानसिक चिंता व खर्चाने त्रस्त व्हाल. परंतु, हे सर्व त्रास हळूहळू दूर होऊ लागतील. प्राप्तीत सुधारणा होईल. तीव्र बुद्धिमत्तेचा वापर कराल. व्यापारात चांगला लाभ होईल. व्यापारात एखाद्या सौद्यामुळे आपणास लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना थोडे विचारपूर्वक काम करावे लागेल. कामात चुका होऊ नयेत याची खबरदारी घ्यावी. खर्चांवर नियंत्रण ठेवल्यास स्थिती चांगली होईल. कोणालाही आपले पैसे उसने देऊ नका. विद्यार्थ्यांना थोडे परिश्रम करावे लागतील. अनेक अडचणी येऊन अभ्यासात चांगले परिणाम मिळतील.12 / 15धनु: हा आठवडा सकारात्मक आहे. प्राप्तीत वाढ होईल. किरकोळ खर्च होतील. आर्थिक स्थिती मजबूत झाल्याने मोकळा श्वास घेऊ शकाल. कौटुंबिक जीवनात तणाव असल्याचे दिसू शकेल. त्याचा परिणाम व्यावसायिक जीवनावर होऊ शकतो, तेव्हा सावध व सतर्क राहून कामावर लक्ष केंद्रित करावे. व्यापारासाठी हा आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. खर्चात वाढ होईल. असे असले तरी गुंतवणूक करण्याची संधी मिळेल, परंतु गुंतवणुकीच्या प्रमाणात लाभ कमी होऊ शकतो. सरकारी क्षेत्राकडून लाभ होण्याची संभावना आहे. विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर काळ आहे. एखाद्या विशेष व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे प्रगतीची संधी मिळेल. 13 / 15मकर: हा आठवडा चांगला आहे. कौटुंबिक जीवनात समाधान राहील. वाद होण्याची संभावना आहे. कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. लोकात आपल्या कार्यकौशल्याचा जयजयकार होईल. कार्यक्षेत्री स्थिती मजबूत होईल. विरोधकांवर मात कराल. प्राप्तीत वाढ होईल. व्यापार योग्य मार्गाने वाटचाल करेल. समाधान लाभेल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. अभ्यासातून लक्ष विचलित होणार नाही याकडे लक्ष द्यावे. आत्मविश्वास उंचावेल.14 / 15कुंभ: हा आठवडा चांगला आहे. विवाहितांना वैवाहिक जीवनात काही तणाव जाणवेल. आजवर जे कष्ट घेतले आहेत, त्याचे फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. नोकरी असो किंवा व्यापार दोन्ही क्षेत्रात यश प्राप्त होईल. व्यापारात व्यवसाय वृद्धीच्या संभावनेचा शोध घेऊ शकता, फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची संधी मिळू शकते. वरिष्ठांशी नीट वागावे लागेल, कारण सध्या ते पाठीशी राहतील. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तणावापासून दूर राहावे. दिनचर्येत नियमितपणा राखावा.15 / 15मीन: हा आठवडा अंशतः फलदायी आहे. जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल तर आताच मागणी घाला. त्यात यशस्वी होऊ शकता. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. कोणताही मोठा निर्णय घेऊ नये, अन्यथा आपणास मोठे नुकसान सोसावे लागू शकते. प्राप्ती तर होईलच, परंतु खर्च जास्त होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामात यश प्राप्त होईल. कामे वेळेवर पूर्ण कराल. स्थिती मजबूत होईल. व्यापारी व्यक्ती व्यापारी बुद्धीचा वापर करून व्यापारास मजबुती प्रदान करतील. व्यावसायिक भागीदार कुवतीनुसार काम मजबूत करेल. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. लक्ष विचलित करणाऱ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी वेळापत्रक बनवून अभ्यास केल्यास फायदा होईल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.