शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य - १४ ऑगस्ट ते २० ऑगस्ट २०२२; या राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होणार, अनेक संधी चालून येतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 11:57 IST

1 / 12
मेष- अनुकूलता राहील : अतिशय अनुकूल असे ग्रहमान अनुभवायला मिळेल. नोकरीत तुमचा फायदा होईल, असे निर्णय घेतले जातील. तुमचे महत्त्व सर्वाच्या लक्षात येईल. एखादी मोठी संधी मिळेल. चांगली बातमी कानावर पडेल. दगदग कमी होईल. जीवनाला स्थैर्य लाभण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले जातील. आर्थिक आवक चांगली राहील. प्रवास होतील. धार्मिक कार्यावर खर्च होईल. जमिनीच्या व्यवहारात मोठा फायदा होईल. एखादा सौदा मोठा लाभ देऊन जाईल. बचत करता येईल. टीप- रविवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
2 / 12
वृषभ- विविध लाभ होतील. शुभदायक ग्रहमान राहील. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. ओळखीचे फायदे होतील. एखादी मोठी संधी मिळेल. अपेक्षा पूर्ण होतील. जीवनसाथीचा चांगला सहयोग राहील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. मुलांची प्रगती होईल. तुमच्या नावलौकिकात भर पडेल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. काहीचे कामाचे स्वरूप बदलेल. घरी पाहुणे येतील. व्यवसायात भरभराट होईल. टीप- सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
3 / 12
मिथुन - मिळकतीच्या अनेकविध संधी मिळतील. त्यात हाती चांगला पैसा येईल. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होईल. भाग्याची साथ राहील. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल. चांगली संधी मिळेल. अचानक एखादा खर्च करावा लागेल. व्यवसायात विक्री चांगली होईल. तुमची छाप पडेल. तुमच्याकडून इतरांना शिकायला मिळेल. प्रेरणा मिळेल. घरात आनंदी वातावरण राहील. तुमच्या आवडीचे पदार्थ घरात बनतील. त्याचा मनसोक्त आस्वाद घ्याल. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार चांगले दिवस.
4 / 12
कर्क - अचानक धनलाभ होईल : घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. एखादी महागडी वस्तू खरेदी कराल. घरात आनंदी व आल्हाददायक वातावरण राहील. अचानक मोठा धनलाभ होईल. जमिनीचे व्यवहार तुमचा फायदा करून देणारे राहतील. आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. कुटुंबात समन्वय राहील. मित्रमंडळींचे सहकार्य मिळेल. प्रेमात यश मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. मनात सकारात्मक व आनंदी विचार राहतील. नोकरीत काही बदल होऊ शकतात. मुले प्रगती करतील. टीप- सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
5 / 12
सिंह - मोठी संधी मिळेल : चांगले ग्रहमान आहे. जीवनसाथीशी सूर जुळतील. | अचानक धनलाभ होईल. मात्र वाहने जपून चालवा. प्रवासात दगदग होईल. महत्त्वाचे कागद, वस्तू सांभाळून ठेवा. नोकरीत अचानक मोठी व नवीन संधी मिळेल. त्यातून तुमचा उत्कर्ष होईल. चैनीवर खर्च करण्याकडे कल राहील. लोक तुम्हाला मदत करतील. तुमच्या ओळखी पाळखी कामात येतील. त्यातून तुम्ही यशोशिखरावर जाऊ शकाल. मात्र, आपली माहिती ज्याला त्याला सांगत सुटू नका. टीप- रविवार, शुक्रवार, शनिवार, रविवार चांगले दिवस.
6 / 12
कन्या- लाभदायक ग्रहमान : विविध प्रकारचे लाभ होतील. आपण कल्पनाही केली नसेल, असे फायदे होतील. चांगल्या संधी समोर येतील. त्यांचा वेळीच फायदा घ्या. आर्थिक आवक चांगली राहील. मोठ्या व्यवहारात फायदा होईल. जीवनसाथीशी सूर जुळतील. थोडी आरोग्याची काळजी घ्या. तब्येतीला जपूनच कामे करा. वाहने जपून चालवा. अचानक मोठी संधी मिळेल. नोकरीत अनुकूल घटना घडतील. मानसन्मान मिळेल. प्रसिद्धी होईल. अनेकांच्या प्रशंसेस पात्र ठराल. टीप- सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
7 / 12
तूळ - नोकरीत प्रगती होईल : आरोग्याची काळजी घ्या. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील. तुमच्या प्रवास घडून येतील. मात्र, प्रवासात अचानक मुलांची प्रगती काही बदल होऊ शकतात. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तुमच्या प्रगतीला पूरक वातावरण राहील. उच्च अधिकार मिळतील. विरोधकांच्या कामे पूर्ण होतील. विविध प्रकारचे लाभ होतील. चांगल्या लोकांची साथ राहील. घरात सुख शांती होतील. नोकरी राहील. टीप- रविवार, सोमवार, बुधवार चांगले शकते.
8 / 12
वृश्चिक - उत्तम प्रवास होतील. प्रवासात फायदे होतील. नवीन ओळखी होतील. मनावरील ताण निघून जाईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यश मिळेल. मुलांची प्रगती होईल. प्रसिद्धी, नावलौकिक वाढवणाच्या घटना घडतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. प्रेम प्रकरणात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. घरी सांगण्यास हरकत नाही. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. पण आपण त्यांना पुरुन उराल. आर्थिक लाभ होतील. नोकरीत उच्च अधिकार व बदली होऊ शकते. टीप- सोमवार, मंगळवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
9 / 12
धनू- हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता मिळेल. सगळ्या अडचणी दूर होतील. कामात सतत कार्यरत राहाल. नोकरीत सकारात्मक बदल होऊ शकतात. तुमच्या शब्दाला किमत राहील. घरी पाहुणे येतील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. भेटीगाठी, बोलणे झाल्यामुळे मन मोकळे होईल. मुलांना यश मिळेल. त्यामुळे आनंद होईल. एखादा अभ्यासक्रम करीत असाल तर त्याचा फायदा होईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. भावंडांची भेट होईल. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार चांगले दिवस.
10 / 12
मकर - मित्रांचे सहकार्य मिळेल : ग्रहमानाची साथ तुम्हाला मिळेल. एखाद्या उपक्रमात सहभागी व्हाल. चार लोकांशी चर्चा होईल. त्यातून नवीन माहिती कळेल. भावंडांशी मधुर संबंध राहतील. नोकरीत बदली होऊ शकते. वादाचे प्रसंग खुबीने टाळा. मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. त्यांना मोठी संधी मिळेल. एखादा नवीन छंद किंवा की आपण शिकू इच्छित असाल तर त्यासाठी चांगला काळ आहे. नावलौकिक होईल. जीवनसाथी चांगली साथ देईल. टीप- रविवार, सोमवार, शनिवार चांगले दिवस.
11 / 12
कुंभ -धनलाभ होईल : धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. विविध मार्गानी आर्थिक लाभ होतील. मोठ्या उलाढाली होतील. त्यातून धनप्राप्ती होईल. घरी एखाद्या छोटेखानी समारंभाचे आयोजन केले जाईल. त्यानिमित्ताने इष्ट मित्र, नातेवाइकांच्या भेटी होतील. गोडधोड खाण्याचा योग येईल. मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथी चांगली साथ देईल. नोकरीत उत्कर्ष होईल. तुमच्या गुणांची खऱ्या अर्थाने कदर केली जाईल. काहींना एखादी मोठी संधी मिळेल. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, शुक्रवार चांगले दिवस.
12 / 12
मीन- अनुकूल काळ : या सप्ताहात तुमच्या समोर अनेक संधी उभ्या राहतील. नेमका कशाचा फायदा घ्यायचा असा प्रश्न पडेल. अशा वेळी जीवनसाथीचा सल्ला महत्त्वाचा ठरेल. वडीलधाऱ्या जाणकारांशी चर्चा करण्यास हरकत नाही. काही व्यवहार फायदेशीर ठरतील. जमिनीच्या व्यवहारात सावधानता बाळगा. कागदपत्रे वाचून मगच सही करा. डोळे झाकून मध्यस्थीवर विश्वास ठेवू नका. जीवनसाथीशी नात्यात गोडवा राहील. टीप- सोमवार, मंगळवार, शनिवार चांगले दिवस.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य