By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 10:04 IST
1 / 15एप्रिल महिना सुरू झाला आहे. या महिन्यात अनेकविध महत्त्वाचे सण-उत्सव साजरे करण्यात येतील. भारताचे बहुरंगी आणि विविधतेचे चित्रण करणारा जणू आगामी आठवडा असल्याचे सांगितले जात आहे. याचे कारण आठवड्याची सुरुवात सोम प्रदोषाने होत आहे. यानंतर महावीर जयंती, हनुमान जयंती आणि गुड फ्रायडे देशभरात उत्साहात साजरे केले जातील.2 / 15ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास या आठवड्यात नवग्रहातील शुक्र ग्रह मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीतून स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सुमारे महिनाभर शुक्र वृषभ राशीत विराजमान असेल. यानंतर मे महिन्यात दोनवेळा शुक्र राशीबदल करणार आहे. आधी मिथुन आणि नंतर कर्क राशीत शुक्राचा प्रवेश होईल.3 / 15सण-उत्सव आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून विचार केल्यास तुमच्यासाठी एप्रिल महिन्याचा हा आठवडा कसा जाईल. कोणत्या राशीच्या व्यक्तींना उत्तम लाभ मिळू शकतील? कोणत्या राशींना सावधगिरी बाळगावी लागेल? जाणून घेऊया, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य...4 / 15मेष: धनलाभ होण्याच्या दृष्टीने हा सप्ताह अनुकूल आहे. वडिलोपार्जित संपत्तीची कामे ऐरणीवर येतील. आवडत्या खाद्य पदार्थांचा आस्वाद घेता येईल. व्यवसायात यशस्वी वाटचाल सुरू राहील. शैक्षणिक क्षेत्रात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. जवळच्या प्रवासाचे योग येतील. सामाजिक कार्यात तुमच्यावर मोठी जबाबदारी राहील. ती तुम्ही यशस्वीपणे पूर्ण कराल. त्यामुळे तुमची प्रशंसा होईल. मात्र हे सगळे करत असताना तुम्हाला बरीच दगदग होईल. काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार चांगले दिवस.5 / 15वृषभ: तुमच्या प्रगतीचा आलेख उंचावत राहील. नोकरी, व्यवसायात चांगली स्थिती राहील. सतत कार्यरत राहाल. तुमची अडून राहिलेली अनेक कामे पूर्ण होतील. अधिकारी वर्गाचे चांगले सहकार्य मिळेल. विविध लाभ होतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. चैन करण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. नोकरीत काही बदल होऊ शकतात. मुलांची प्रगती होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. तरुण वर्गाला आनंददायक बातम्या कळतील. आरोग्याची काळजी घ्या. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.6 / 15मिथुन: कार्यक्षेत्रात तुमच्या बाजूने वातावरण राहील. तुमचे पारडे जड राहील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी मिळेल. कामाचे स्वरूप बदलेल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. आर्थिक आवक राहील. मौजमजा करण्यासाठी पैसा खर्च करण्याकडे कल राहील. जीवनसाथीशी वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जवळच्या सहलीला जाऊन याल. मुलांची प्रगती होईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. लोकांच्या भेटीगाठी होतील. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.7 / 15कर्क: कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची कदर केली जाईल. तुमचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. काही अनपेक्षित बदल होऊ शकतात. आर्थिक आवक चांगली राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. काहींना भेटवस्तू मिळतील. वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद मिळतील. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्या समवेत फिरणे, मौजमजा करणे होईल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. नवीन संधी मिळतील. नवीन मित्र, सहकारी जोडले जातील. एखाद्या संस्थेसाठी समाजसेवा कराल. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.8 / 15सिंह: तुमच्या मनात अनेक नवीन योजना असतील. त्या पूर्ण करण्यासाठी हालचाली कराल. त्यासाठी लोकांचे सहकार्य मिळेल. आत्मविश्वासाने कामे कराल. मनात आनंदी विचार राहतील. नवीन ओळखी होतील. धाडसाने कामे कराल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. थोडे गैरसमज होतील. नोकरीत चांगली स्थिती राहील. सुखसोयी वाढवून मिळतील. चांगल्या बातम्या कानावर पडतील. कर्तृत्वाला वाव मिळेल. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.9 / 15कन्या: ग्रहमान अनुकूल राहील. तुमच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होऊ शकतो. मात्र अनावश्यक खर्च करण्याकडे कल राहील. सप्ताहाच्या सुरुवातीला थोड्या अडचणी असतील; पण त्यातून मार्ग काढाल. त्यानंतर तुमच्या प्रगतीचा वेग वाढत जाईल. आनंदवार्ता समजतील. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ आहे. टीप- बुधवार, गुरुवार, शनिवार चांगले दिवस.10 / 15तूळ: विवाहासाठी अनुकूल काळ आहे. चांगली स्थळे चालून येतील. भाग्याची चांगली साथ तुम्हाला मिळेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. नवीन ओळखी होतील. त्यातून तुमचा फायदा होईल. भेटवस्तू मिळतील. हाती घेतलेल्या कामात सफलता मिळेल. कामात उत्साह राहील. मात्र, लवकर कामे करण्याच्या नादात जास्तीचा पैसा खर्च होईल. जीवनसाथीची चांगली साथ राहील. व्यवसायात भरभराट होईल. अचानक धनलाभ होऊ शकतो. टीप- रविवार, सोमवार, मंगळवार, शुक्रवार चांगले दिवस.11 / 15वृश्चिक: विविध लाभ होतील. ग्रहमान अनुकूल राहील. हाती घ्याल ते तडीस न्याल अर्शी परिस्थिती राहील. घरी पाहुणे येतील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नोकरीत कामात बदल होऊ शकतो. नवीन काम फायदेशीर ठरेल. तुमचे महत्त्व वाढेल. कामाच्या निमित्ताने फिरणे होईल. धनलक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील. चांगल्या बातम्या कळतील. मुलांची प्रगती होईल. समाजात तुमचा गौरव होईल. व्यवसायात प्रगती होईल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. टीप- सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस.12 / 15धनु: अडचणी दूर झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. कामात उत्साह राहील. मौजमजा करण्यासाठी वेळ द्याल. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. तुमच्या नावलौकिकात भर पडणाया घटना घडतील. नोकरीत तुमचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात सफलता मिळेल. नवीन कामाची संधी मिळेल. जवळच्या लोकांच्या भेटीगाठी होतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मुलांचे प्रश्न सुटतील. त्यांचे कौतुक होईल. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.13 / 15मकर: सप्ताहाच्या सुरुवातीला आपल्याला काही अडचणींना तोंड द्यावे लागेल. कामानिमित्त दगदग होईल. कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी आटापिटा करावा लागेल. मात्र, थोडा संयम दाखवला तर हळूहळू परिस्थिती आटोक्यात येईल. तुमच्या मेहनतीचे चीज होईल. लोकांकडून वाहवा होईल. काहींना प्रवास घडून येतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा ठसा उमटेल. मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगला काळ आहे. नौकरीत बदलीची शक्यता आहे. टीप- बुधवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.14 / 15कुंभ: व्यवसायाला पूरक वातावरण राहील. तुमच्या नवनवीन प्रयोगांचे कौतुक होईल. सतत कार्यरत राहावे लागेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मात्र, कामाचा व्याप सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. थोडे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणे, आराम करणे आवश्यक आहे. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. ज्येष्ठ मंडळींचा सल्ला उपयुक्त ठरेल. जीवनसाथीची चांगली साथ तुम्हाला मिळेल. काहींना भेटवस्तू मिळतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. टीप- रविवार, सोमवार, शुक्रवार चांगले दिवस.15 / 15मीन: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. सप्ताहाच्या सुरुवातीला आरोग्याची काळजी घ्या. फार दगदग होईल अशी कामे करू नका. शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करता येईल. व्यवसायात भरभराट होईल. जीवनसाथीशी सूर जुळतील. नात्यात गोडवा राहील. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. भावंडांची खुशाली कळेल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. टीप- मंगळवार, बुधवार, गुरुवार चांगले दिवस. - विजय देशपांडे, (ज्योतिषविशारद)