शुक्रचा कुंभ प्रवेश: ८ राशींना इच्छापूर्ती काळ, ४ राशींना संमिश्र; तुमची रास कोणती? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 06:15 IST
1 / 15जानेवारी महिन्यात मंगळ, बुध यांचा चलनबदल, सूर्य आणि शनी पिता-पुत्रांचे राशीपरिवर्तन यानंतर आता नवग्रहांमधील शुक्र ग्रह मकर राशीतून कुंभ राशीत विराजमान होत आहे. शुक्राचे राशीपरिवर्तन अनेकार्थाने विशेष मानले जात आहे. अलीकडेच शनीने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. यानंतर आता शुक्रही कुंभ राशीत विराजमान होत आहे. शुक्र आणि शनीचा योग विशेष मानला जात आहे. (venus transit in aquarius 2023)2 / 15सन २२ जानेवारी रोजी शुक्र कुंभ राशीत विराजमान झाला आहे. प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. याचा परिणाम सर्व राशींसह देश-दुनियेवर होत असल्याचे सांगितले जाते. ग्रहाच्या राशीपरिवर्तनाचा प्रभाव अनुकूल किंवा प्रतिकूल असू शकतो. (shukra gochar in kumbh rashi 2023)3 / 15ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र आणि शनी मित्र ग्रह मानले जातात. शुक्राचा राशीबदल खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. कारण त्याचा प्रत्येक मनुष्याच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. कुंभ राशीतील शुक्राच्या संक्रमणाचा मेष ते मीन राशीपर्यंत सर्व राशींवर काय परिणाम होईल ते जाणून घेऊया...4 / 15मेष राशीच्या व्यक्तींना शुक्रचा कुंभ प्रवेश चांगला ठरू शकेल. नोकरदारांचा कार्यालयातील प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढेल. अधिकार्यांशी संबंधही चांगले राहतील. तुमची संपत्ती वाढू शकेल. सुखसोयी वाढतील. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. घर, वाहन इत्यादी खरेदीची योजना आखू शकता.5 / 15वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्रचा कुंभ प्रवेश अनुकूल ठरू शकेल. व्यापारी आणि व्यावसायिकांना यश मिळेल. नशिबाची साथ मिळेल. पर्यटन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना चांगला नफा मिळेल. शुक्र आणि शनीची युती शुभ-फलदायी ठरू शकेल. हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळू शकेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. व्यायाम आणि योगासने करणे उपयुक्त ठरू शकेल. 6 / 15मिथुन राशीच्या व्यक्तींना शुक्रचा कुंभ प्रवेश सकारात्मक ठरू शकेल. विद्यार्थ्यांची शिक्षणात प्रगती होऊ शकेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यास इच्छुक आहेत, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल. आई-वडिलांसोबत कोणत्याही धार्मिक स्थळी प्रवास कराल. आगामी काळ चांगला राहू शकेल. शुक्र-शनीचा राजयोग तुम्हाला भरपूर शुभ फळ देईल. कामात चूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. 7 / 15कर्क राशीच्या व्यक्तींना शुक्रचा कुंभ प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आगामी काळ फारसे चांगले परिणाम देणार नाही. आळस वाढू शकेल. कार्यक्षेत्रातील काही कामांबाबत मन खूप अस्वस्थ असेल. परंतु परिस्थिती समंजसपणे हाताळण्यास सक्षम असाल. कुटुंबात काही तणाव असू शकतो. इच्छा असूनही आनंदी राहू शकणार नाही.8 / 15सिंह राशीच्या व्यक्तींना शुक्रचा कुंभ प्रवेश चांगला ठरू शकेल. कार्यक्षेत्रात चांगले सहकार्य मिळेल. नवीन कामांसाठी प्रेरणा मिळेल. कोणतेही काम कराल, त्यातून चांगले फायदे मिळतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल. नोकरदारांसाठी काळ चांगला राहील. घाईगडबड टाळणे उपयुक्त ठरू शकेल. आगामी काळ खूप फलदायी ठरू शकेल. 9 / 15कन्या राशीच्या व्यक्तींना शुक्रचा कुंभ प्रवेश संमिश्र ठरू शकेल. शुक्राच्या राशीपरिवर्तनाचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसू शकेल. जेवढी जास्त मेहनत कराल, तेवढी प्रगती होईल. कठोर परिश्रम केल्याशिवाय काहीही मिळणार नाही, मेहनत करूनच फायदा मिळेल. व्यवसायात काही नवीन सुरू केलेत तर भरपूर नफा मिळेल. वडिलांच्या प्रकृतीकडे अधिक लक्ष द्या. डॉक्टरांचा सल्ला घेत राहा. घरच्या जबाबदाऱ्या पार पाडा.10 / 15तूळ राशीच्या व्यक्तींना शुक्रचा कुंभ प्रवेश चांगला ठरू शकेल. सर्जनशील कल्पना वाढतील. काही कल्पनांचा फायदाही होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगले लाभ होतील. शुक्र आणि शनीचा योग अनुकूल राहील. विशेष लोकांशी भेट होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकेल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. 11 / 15वृश्चिक राशीच्या व्यक्तींना शुक्रचा कुंभ प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. हा कालावधी थोडा कठीण असू शकतो. चैनीच्या गोष्टींमध्ये वाढ होईल. आरोग्याच्या बाबतीत सावध राहावे लागेल. वाहन जपून चालवावे. वाहन किंवा जंगम मालमत्ता खरेदी करण्याची योजना या काळात आखता येऊ शकेल.12 / 15धनु राशीच्या व्यक्तींना शुक्रचा कुंभ प्रवेश मध्यम फलदायी ठरू शकेल. कामातून खूप फायदा होईल. संघर्ष वाढू शकेल. जे काम करत आहात, ते करूनच तुम्हाला यश मिळेल. कौटुंबिक स्थिती चांगली राहील. करिअरबाबत काळजी घ्यावी. भावंडांशी तुमचे संबंध चांगले राहतील. वडील आणि शिक्षकांचे सहकार्य मिळेल.13 / 15मकर राशीच्या व्यक्तींना शुक्रचा कुंभ प्रवेश यशकारक ठरू शकेल. धनसंचय, बचत करण्यात यश मिळेल. अचानक पैसे मिळू शकतात. व्यवसायातील एखाद्या योजनेतून नफा मिळू शकतो. जीवन अतिशय शिस्तबद्ध होऊ शकेल. कौटुंबिक परिस्थिती अनुकूल राहील. भरपूर यश आणि नफा मिळू शकेल. 14 / 15कुंभ राशीत शुक्राचा प्रवेश झाला असून, या राशीत शनी विराजमान आहे. या राशीच्या व्यक्तींना शुक्र-शनीची युती उत्तम ठरू शकेल. तुम्हाला आनंद मिळेल. तुमच्या वैवाहिक जीवनात येणारा अडथळा दूर होईल. अनेक मार्गांनी पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होऊ शकेल.15 / 15मीन राशीच्या व्यक्तींना शुक्रचा कुंभ प्रवेश अनुकूल ठरू शकेल. अडकलेले पैसे मिळू शकतील. विचारपूर्वक केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल. आरोग्याबाबत सावध राहण्याची गरज आहे. आर्थिक आघाडीवर बजेट तयार करून त्यानुसार मार्गक्रमण करणे उपयुक्त ठरू शकेल. मनोरंजनावर पैसे खर्च करू शकता. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.