शुक्र गोचर २०२५: वर्षाखेरिस 'या' ५ राशींना मिळणार धन, संपत्ती करिअरबाबत मोठी भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 12:02 IST
1 / 6२० डिसेंबर २०२५ रोजी शुक्र ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहे. गुरूची रास असलेल्या धनुमध्ये शुक्र आल्याने, काही राशींसाठी हे गोचर अत्यंत लाभदायक आणि फलदायी ठरणार आहे. विशेषतः ५ राशींना या काळात धन, करिअर आणि प्रेम जीवनात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०२५ची वर्षाखेर पुढील पाच राशींसाठी लाभदायी ठरणार असल्याचे चिन्ह आहे. 2 / 6मेष (Aries): मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे गोचर भाग्याच्या स्थानी होत आहे. यामुळे तुम्हाला अनेक दिवसांपासून अडकलेल्या कामांमध्ये यश मिळेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी उत्तम संधी मिळतील. आर्थिक बाजू मजबूत होईल आणि तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. अध्यात्म आणि लांबच्या प्रवासाचे योग आहेत.3 / 6मिथुन (Gemini): शुक्र गोचर मिथुन राशीच्या विवाहित जीवनाच्या आणि भागीदारीच्या घरात होत आहे. यामुळे तुमचे वैवाहिक जीवन आनंदी आणि प्रेमळ राहील. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे योग बनत आहेत. व्यवसायात भागीदारीतून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.4 / 6सिंह (Leo): शुक्र गोचर सिंह राशीच्या प्रेम (Love) आणि शिक्षण (Education) स्थानी होत आहे. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत रोमान्स आणि आनंदाचा राहील. प्रेम संबंधात असलेल्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात यश मिळेल. अचानक धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे.5 / 6तूळ (Libra): शुक्र ग्रह तूळ राशीचा स्वामी आहे आणि हा गोचर तुमच्या पराक्रम आणि संवाद (Communication) स्थानी होत आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि बोलण्यामुळे कामे मार्गी लागतील. करिअरमध्ये तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. लहान प्रवास होण्याची शक्यता आहे. भावंडांसोबतचे संबंध सुधारतील आणि तुम्हाला त्यांचे सहकार्य मिळेल.6 / 6मीन (Pisces): मीन राशीसाठी शुक्राचे हे गोचर करिअर (Career) आणि कार्यक्षेत्राच्या स्थानी होत आहे. हा काळ तुमच्या करिअरसाठी अत्यंत शुभ आहे. नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढीचे योग आहेत. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. व्यवसायात मोठे आर्थिक व्यवहार (Deals) यशस्वी होतील, ज्यामुळे मान-सन्मान वाढेल.