शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Vastu Tips: शुक्रवारी बांबूचे रोप आणा घरी, लक्ष्मी कुबेर येतील दारी; चुकवू नका योग्य दिशा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 15:35 IST

1 / 7
तुम्ही अनेक लोकांच्या घरात आणि ऑफिसमध्ये बांबूचे रोप पाहिले असेल. आपल्या सभोवतालचे वातावरण प्रसन्न आणि आल्हाददायक बनवण्यासाठी या रोपाचा वापर केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का, की वास्तुशास्त्रात या बांबूच्या रोपाला विशेष मान्यता आहे. असे म्हटले जाते की घरात हे रोप ठेवल्याने आर्थिक वृद्धी येते आणि एवढी प्रगती होते की लोकांना आपल्या नशिबाचा हेवा वाटू लागतो.
2 / 7
मात्र बांबूचे रोप आणून काचेच्या प्लेटमध्ये पाणी टाकून ठेवून दिले तर उपयोग नाही. लक्ष्मी आणि कुबेर महाराजांना वास्तूकडे आकर्षित करणारे हे रोप योग्य जागी ठेवले तरच त्याचा भरघोस लाभ होतो.
3 / 7
वास्तुशास्त्रानुसार, बांबूचे रोप घरातील ड्रॉइंग रूम किंवा लिव्हिंग रूममध्ये ठेवावे. घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर हे छोटेसे रोप ती ऊर्जा शोषून घेते.घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि जीवनात आनंद निर्माण होऊन सुख शांती नांदते. हे रोप तुमचे भाग्य देखील बदलू शकते आणि कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या करिअरमध्येही यश देते.
4 / 7
असे मानले जाते की बांबूचे रोप नेहमी योग्य दिशेने लावावे. दिशा अचूक असेल तर अनेक प्रकारच्या रोगांचे परस्पर निवारण होते. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या किंवा ऑफिसच्या पूर्व दिशेला बांबूचे रोप लावणे चांगले. याशिवाय, तुम्ही उत्तर दिशेला बांबूचे रोप लावू शकता. जर तुम्हाला बऱ्याच काळापासून पैशाची कमतरता भासत असेल तर एकदा शुक्रवारी बांबूचे रोप आणून पूर्व दिशेला ठेवून पहा! नशीब पालटण्याची ताकद या रोपात आहे.
5 / 7
वास्तूनुसार, बांबूचे रोप बाथरूम किंवा शौचालयाजवळ चुकूनही ठेवू नये. याशिवाय, स्वयंपाकघरात हे रोप लावण्यासही मनाई आहे. बांबूचे रोप कधीही अस्वच्छ जागी ठेवू नये. असे केल्याने शुभ परिणाम मिळत नाहीत. तसेच, झाडाचे पाणी वेळोवेळी बदलले पाहिजे. असे मानले जाते की घरात किंवा ऑफिसमध्ये लाल फितीने बांधलेल्या बांबूच्या रोपाला जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतात.
6 / 7
वास्तू नियमांचे पालन करून घरी बांबूचे रोप आणल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते आणि अनावश्यक खर्चापासून मुक्तता मिळते. व्यवसायात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतात आणि जीवनात यश मिळते. घरचे वातावरण नेहमीच आल्हाददायक राहते. बांबूचे रोप हे भाग्याचे प्रतीक देखील मानले जाते. त्यामुळे शुक्रवारी हे रोप घरी आणा आणि योग्य दिशेला ठेवून त्याची निगा राखा.
7 / 7
सदर माहिती सामान्य गृहीतके आणि वास्तुविषयक मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्र