शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 15:49 IST

1 / 9
देवघर हा घरातील असा कोपरा असतो जिथे आपण सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी दिवसभरातून काही क्षण तिथे घालवतो. मात्र आपल्याही नकळत घडणाऱ्या चुकांमुळे तेथील ऊर्जा भंग पावते आणि सकारात्मक ऊर्जेचा अभाव जाणवू लागतो. तो दूर व्हावा म्हणून या वास्तू टिप्स!
2 / 9
देवघरात कधीही तुटलेली मूर्ती किंवा काच फुटलेला फोटो ठेवू नये. अशा मूर्तींची पूजा करणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि कामात अडथळे येतात. अशा मूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे.
3 / 9
अनेकांना देवघरात शंख ठेवायला आवडते, पण वास्तुशास्त्रानुसार एकाच देवघरात दोन शंख ठेवू नयेत. यामुळे घरातील सदस्यांमध्ये विनाकारण वाद आणि तणाव निर्माण होऊ शकतो. जर तुमच्याकडे दोन शंख असतील, तर एक शंख पूजेसाठी ठेवा आणि दुसरा घराच्या दुसऱ्या कोपऱ्यात सजावटीसाठी ठेवा.
4 / 9
देवाला वाहिलेली फुले सुकली की ती लगेच काढून टाकावीत. सुकलेली फुले नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानली जातात. यामुळे घरात गरिबी येते आणि प्रसन्नता नष्ट होते. नेहमी ताजी फुले आणि शुद्ध पाण्याचा वापर करावा.
5 / 9
अनेक लोक श्रद्धेपोटी मृत पूर्वजांचे फोटो देवाच्या मूर्तींसोबत ठेवतात. मात्र, वास्तुशास्त्रानुसार देव आणि पितर यांचे स्थान वेगवेगळे असायला हवे. पितरांचे फोटो दक्षिण भिंतीवर लावावेत, पण ते प्रत्यक्ष देवाच्या जवळ किंवा मूर्तींच्या रांगेत असू नयेत.
6 / 9
देवघरात कधीही कात्री, चाकू किंवा सुई यांसारख्या धारदार वस्तू ठेवू नका. अशा वस्तू हिंसा आणि संघर्षाचे प्रतीक मानल्या जातात. पूजेच्या साहित्यात केवळ दिवा, अगरबत्ती आणि सात्विक वस्तूच असाव्यात.
7 / 9
देवघरात एकाच देवाच्या अनेक मूर्ती किंवा फोटो ठेवू नका. विशेषतः समोरासमोर मूर्ती ठेवणे टाळावे. यामुळे घरातील ऊर्जेचा समतोल बिघडतो. गणपती किंवा इतर देवांची एकच पण सुंदर मूर्ती पुरेशी असते.
8 / 9
देवघर हे अत्यंत पवित्र स्थान आहे. तिथे विसरूनही पाकीट, बेल्ट किंवा चामड्याच्या कोणत्याही वस्तू ठेवू नका. यामुळे देवघराची पवित्रता भंग पावते आणि लक्ष्मीची कृपा मिळत नाही.
9 / 9
देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यात (North-East) असावे. पूजेच्या वेळी आपले तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवघराची स्वच्छता दररोज करावी आणि तिथे नेहमी एक दिवा तेवत ठेवावा.
टॅग्स :Vastu shastraवास्तुशास्त्रHomeसुंदर गृहनियोजनTraditional Ritualsपारंपारिक विधीPuja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिक