शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'भोली सुरत दिलके खोटे' हे गाणे 'या' चार राशींना तंतोतंत लागू होते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 13:57 IST

1 / 4
या राशीचे लोक खूप सरळ दिसतात पण तसे नसतात. आपल्याला सांगतील एक आणि करतील भलतेच. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला गाफील ठेवण्याची कला त्यांच्याकडे जन्मतः असते. ससा आणि कासवातल्या गोष्टीतल्या कासवासारखे ते छुपेरुस्तम असतात. हे लोक आपल्या आयुष्यात आलेल्या सर्व प्रकारच्या अडचणींना धीराने तोंड देतात.
2 / 4
या राशीचे लोक सर्व काही अगदी सहज करतात. त्यामुळे टेन्शन नावाचा प्रकार त्यांच्या शब्दकोशातही नसतो. मोठ्यात मोठया गोष्टी ते अगदी हसत खेळत पार पाडतात. हे लोक स्वतः अडचणीत सापडले तरीसुद्धा ते सुज्ञपणे निर्णय घेऊन सहज संकटातून बाहेर पडतात.
3 / 4
या राशीच्या लोकांना आपले निर्णय कोणाशीही शेअर करायला आवडत नाही. अगदी जवळच्या व्यक्तीलाही ते ताकास तूर लागू देत नाहीत. एवढी गोपनीयता प्रत्येक कामात बाळगतात, त्यामुळे यशस्वी होतात. आपल्या भोळ्या चेहऱ्याने समोरच्याला जिंकून घेतात. दुसऱ्याकडून गोड बोलून काम कसे करवून घ्यायचे ते यांच्याकडून शिकावे!
4 / 4
या राशीचे लोक सरळ दिसतात क्वचित असतातही! ते कोणाच्या आड सहसा जात नाहीत आणि कोणी त्यांच्या वाटेत आडवा गेले, तर त्याला ते सोडत नाहीत. म्हणून या राशीच्या लोकांशी जरा जपूनच वागा. त्यांची कोणी फसवणूक केली, तर ते त्यांना त्यांच्या पद्धतीने उत्तर देतात. निर्णय घेण्यात खूप हुशार असतात. त्यामुळे ते यशस्वी होतात.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष