शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 13:02 IST

1 / 7
सगळ्यांनाच रोज स्वप्नं पडतात असे नाही आणि पडलेली स्वप्नं लक्षात राहतात असे नाही. मात्र जेव्हा स्वतःचा, आप्तजनांचा मृत्यू स्वप्नात दिसतो तेव्हा ती स्वप्नं जागेपणीही डोळ्यासमोरून जात नाहीत. मनात घोळत राहतात. यावरच स्वप्न शास्त्राचे भाकीत आणि इतरही काही स्वप्नांचा उलगडा करून घेऊ.
2 / 7
जर तुम्हाला स्वप्नात हिरवीगार झाडे किंवा सुंदर फुलांनी भरलेली बाग दिसली, तर ते अत्यंत शुभ संकेत मानले जाते. हे स्वप्न दर्शवते की, तुमच्या जीवनात एक नवी आणि सकारात्मक सुरुवात होणार आहे. तुमची एखादी मोठी मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे. हे स्वप्न समृद्धी, आनंद आणि यशस्वी बदलाचे प्रतीक आहे.
3 / 7
स्वप्नात चांदीने भरलेला कलश दिसणे हे येणाऱ्या समृद्धी आणि सौभाग्याचे स्पष्ट संकेत आहे. चांदीचा संबंध चंद्र आणि शीतलतेशी असल्याने ते शुभ मानले जाते. तुमच्या जीवनात धनवृद्धी होणार आहे किंवा व्यवसायात मोठे यश मिळणार आहे. थांबलेली कामे आता वेगाने पूर्ण होतील. हे स्वप्न तुमच्या घरात लक्ष्मीच्या आगमनाचे आणि आर्थिक यश मिळण्याचे प्रतीक आहे.
4 / 7
स्वप्नात कोणत्याही देवी-देवतेचे किंवा साक्षात् परमेश्वराचे दर्शन होणे हा एक अत्यंत दिव्य आणि शुभ अनुभव मानला जातो. तुमच्या जीवनातील दुःख आणि अडचणी लवकरच दूर होणार आहेत. ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि जीवनात सकारात्मक वळण येणार आहे. हा तुमच्या आणि ईश्वराच्या कृपेचा पवित्र संदेश आहे, जो नवा मार्ग आणि शांती दर्शवतो.
5 / 7
हा स्वप्न पाहण्यास भीतीदायक वाटत असला तरी, स्वप्न शास्त्रानुसार, मृत्यूचे स्वप्न पाहणे हे अशुभ नाही, तर शुभ मानले जाते. हे स्वप्न जीवनचक्राच्या नवीन टप्प्याची सुरुवात दर्शवते. तुमच्या जुन्या समस्या, दुःख आणि नकारात्मकता आता संपुष्टात येत आहेत. हे स्वप्न मोठे परिवर्तन आणि नवीन संधी घेऊन येते, जिथे जुन्या अडचणी संपून नवी शक्यता जन्म घेतात.
6 / 7
जर तुम्ही स्वतःला स्वप्नात आरशात पाहत असाल, तर हे आत्मविश्वासाचे आणि यशाचे प्रतीक आहे. तुमची मेहनत लवकरच रंग आणणार आहे. करिअर, व्यवसाय किंवा वैयक्तिक जीवनात मोठे सन्मान किंवा उपलब्धी मिळण्याची शक्यता आहे. हे स्वप्न तुमचा आत्मविश्वास वाढत असल्याचे आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त होणार असल्याचे संकेत देते.
7 / 7
टीप: स्वप्न शास्त्रातील ही माहिती सामान्य समजुतींवर आधारित आहे. कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषDeathमृत्यूspiritualअध्यात्मिक