शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Surya Shani Yuti 2023: याच महिन्यात होतेय सूर्य-शनी युती; या 3 राशीच्या लोकांना बाळगावी लागणार सावधगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 21:47 IST

1 / 6
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह नियमितपणे राशी परिवर्तन करत असतात. यावेळी ग्रहांची युतीही होत असते. या युतीचा परिणाम मानवी जीवनावर, तसेच देश आणि जगावरही दिसून येतो. कर्मफल देणारे शनी देव कुंभ राशीत विराजमान असून 13 फेब्रुवारीला ग्रहांचा राजा म्हणून ओळखले जाणारे सूर्यदेवही गोचर करत आहेत.
2 / 6
अशा स्थितीत कुंभ राशीमध्ये सूर्य आणि शनीची युती होईल. अर्थात शनी आणि सूर्य एकाच राशीत विराजमान होणार असल्याने अनेक राशींच्या अडचणीही वाढू शकतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी आणि सूर्य हे दोन्ही शत्रू ग्रह आहेत.
3 / 6
सूर्य - शनी 2023 युती केव्हा ? शनीने 17 जानेवारी 2023 ला सायंकाळी 05 वाजून 04 मिनिटांनी कुंभ राशित प्रवेश केला आहे आणि सूर्यदेव 13 फेब्रुवारीला सकाळी 09 वाजून 21 मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करेल. अशात 13 फेब्रुवारीरोजी सूर्य आणि शनी यांची युती होत आहे. ही युती 14 मार्चपर्यंत राहणार आहे. यानंतर सूर्य देव मीन राशीत जातील.
4 / 6
या राशींना रहावं लागणार सावध - कर्क रास - सूर्य आणि शनीच्या युतीमुळे कर्क राशीच्या लोकांच्या समस्या वाढू शकतात. या दोन ग्रहांच्या युतीचा कर्क रास असलेल्या लोकांच्या संपत्तीवर परिणाम होऊ शकतो. या काळात शनी ढय्येचेही फळ देईल. याच बरोब या काळात कर्क राशीच्या लोकांना दुखापतीच्या बाबतीतही काळजी घ्यावी लागेल. एखादी दूर्घटना घडण्याचीही शक्यता आहे. वाणीवरही संयम असू द्या. या काळात व्यापारी वर्गाशी संबंधित लोकांनी पैशांच्या व्यवहारातही सावधगिरी बाळगावी. वादापासूनही सावध राहा.
5 / 6
वृश्चिक रास - दोन शत्रू ग्रहांच्या युतीमुळे हा काळ वृश्चिक राशीच्या लोकांना काही प्रमाणात अवघड जाईल. या काळात आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. या राशीच्या लोकांवर सध्या शनीची ढैय्या सुरू आहे. अशा स्थितीत मानसिक ताण तनाव वाढू शकतो. व्यवसायात घट होऊ शकते. गुंतवणुकीशी संबंधित निर्णय काळजीपूर्वक घ्या. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबतच्या संबंधातं अडचण येऊ शकते.
6 / 6
कुंभ रास - शनीने 17 जानेवारीला कुंभ राशीत प्रवेश केला असून सूर्यही 13 फेब्रुवारीला कुंभ राशीत प्रवेश करत आहे. यावेळी कुंभ राशीच्या लोकांसाठी समस्या निर्माण होऊ शकतात. या राशीतील युतीमुळे कुंभ राशीच्या लोकांवर सर्वाधिक नकारात्मक प्रभाव पडू शकतो. जे लोक या काळात नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत, त्यांनी यावेळी काही प्रमाणावर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आरोग्याची कडे अधिक लक्ष द्ययाल हवे. वैवाहिक जीवनात तणाव वाढू शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य