शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

मेष संक्रांत: ‘या’ ५ राशींवर संमिश्र प्रभाव, ग्रहण योगाने ३० दिवस महत्त्वाचे; तुमची रास कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 16:46 IST

1 / 9
नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य १४ एप्रिल रोजी गुरुचे स्वामीत्व असलेल्या मीन राशीतून मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत प्रवेश करत आहे. सूर्याच्या या राशीसंक्रमणाला मेष संक्रांत असे म्हटले जाते. सूर्य मेष राशीत आल्यानंतर बुधासोबत शुभ असा बुधादित्य योग जुळून येत आहे. (surya gochar mesh sankranti 2023)
2 / 9
आताच्या घडीला राहु मेष राशीत विराजमान आहे. २० एप्रिलला यंदाचे पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. हे ग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे वेधादि नियम पाळू नये, असे सांगितले जात आहे. मात्र, तरीही ग्रहणाचा प्रभाव दुनियेसह १२ राशींवर पडणार आहे. सूर्य आणि राहुच्या ग्रहण योगाचा प्रभाव काही राशींवर पडेल, असे सांगितले जात आहे. (sun transit in aries 2023)
3 / 9
बुधादित्य योग तसेच ग्रहण योगासह सूर्य, बुध आणि राहुचा त्रिग्रही योगही जुळून येत आहे. यामुळे सूर्याचा मेष प्रवेश अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. सूर्याच्या मेष प्रवेशाचा कोणत्या ५ राशीच्या व्यक्तींवर संमिश्र प्रभाव पडेल? कोणत्या राशीच्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगावी? जाणून घेऊया...
4 / 9
वृषभ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मेष प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण पाहायला मिळेल असे नाही. कामाची प्रशंसा होईलच असे नाही. आर्थिक बाबतीतही सावध राहावे लागेल. उत्पन्नात घट होऊ शकते. कौटुंबिक जीवन प्रभावित होऊ शकते. जीवनता काही चढ-उतार दिसतील. आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका.
5 / 9
कन्या राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मेष प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. कामाच्या ठिकाणी खूप सावध राहण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी काही चुका होऊ शकतात. कामाचा ताण जास्त असणार आहे. व्यापारी वर्गासाठी आगामी काळ चढ-उताराचा ठरू शकेल. खर्चात वाढ होऊ शकेल. बजेट तयार केल्यानंतर कामे ठरवावीत. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
6 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मेष प्रवेश करिअरच्या दृष्टीने अनुकूल सिद्ध होईलच असे नाही. वरिष्ठांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे. मन तणावग्रस्त राहू शकेल. प्रवासातून काही लाभ मिळतीलच असे नाही. आर्थिक स्थितीच्या दृष्टीनेही हे संक्रमण विशेष ठरेल असे नाही. नफा मिळविण्याच्या कमी संधी मिळू शकतील. जास्त प्रवास केल्याने खूप पैसे खर्च होऊ शकतात. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी.
7 / 9
मकर राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मेष प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. करिअरमध्ये अडचणी येऊ शकतात. आर्थिक आघाडीचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. खर्च जास्त असू शकेल. जोडीदाराशी संवाद आणि ताळमेळ राखण्यात समस्या येऊ शकतील. दोघांमधील वाढ वाढण्याची शक्यता आहे.
8 / 9
मीन राशीच्या व्यक्तींना सूर्याचा मेष प्रवेश काहीसा संमिश्र ठरू शकेल. व्यापारी वर्गासाठी आगामी काळ लाभदायक असेल असे नाही. आर्थिक लाभात अडचणी येऊ शकतात. आर्थिक बाबतीत अतिशय हुशारीने पुढे जाणे योग्य ठरू शकेल. खर्चही वाढू शकेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.
9 / 9
सूर्यग्रहण भारतात दिसणार नसले तरी काही राशीच्या व्यक्तींसाठी हे ग्रहण लाभदायक ठरू शकेल, तर काही राशींसाठी हा काळ संमिश्र ठरू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य