शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Surya Gochar 2022 : आता सूर्य धनु राशीत करणार गोचर, तुळ आणि कुंभसह या राशींचं नशीब चकाकणार; पटापट चेक करा तुमची रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 17:01 IST

1 / 13
सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले जाते. शुक्रवारी, म्हणजेच 16 डिसेंबरला सूर्य देव धनू राशीत प्रवेश करत आहेत. सूर्याचे हे गोचर सकाळी साधारणपणे 09 वाजून 38 मिनिटांनी होईल. धनू ही एक अग्नी तत्व असलेली रास आहे. महत्वाचे म्हणजे, ही रास धर्म, उच्च शिक्षण, विश्वास, वेदांत, सत्य, भाग्य, धन, प्रेरणा, बुद्धी आणि सौभाग्याची रास मानली जाते. तर जाणून घेऊयात, 16 डिसेंबरला होणारे सूर्याचे गोचर सर्व राशींसाठी कसे असेल? कसे फळ देईल?
2 / 13
मेष - सूर्याचे धनु राशीतील गोचर अथवा संक्रमण आपल्या जीवनात आनंद घेऊन येणार आहे. मेष राशीचे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी भारतात अथवा परदेशातील एखाद्या संस्थेत प्रवेश घेण्याचा विचार करत असतील तर, त्यांना ती संधी मिळू शकते.
3 / 13
वृषभ - सूर्याचे धनु राशीतील गोचर आपल्याला सकारात्मक परिणाम देईल. या दरम्यान सूर्याची दृष्टी आपल्या द्वितीय भावावरही पडत आहे. यामुळे तुमचे बोलणे प्रभावी होईल आणि आर्थिकदृष्ट्या पैशाचा प्रवाह चांगला राहील आणि पैशाची बचतही शक्य होईल.
4 / 13
मिथुन- या काळात, आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची अधिक काळजी घ्या. कारण त्याची प्रकृती खालावू शकते. तसेच, तुमच्या जोडीदारासोबत वाद आणि अनावश्यक अहंकार टाळा. यामुळे तुमचे संबध बिघडू शकतात.
5 / 13
कर्क - जर तुम्ही एखाद्या वादात अथवा कायदेशीर प्रकरणात अडकलेले असाल, तर या काळात तुम्हाला त्यात विजय मिळू शकतो. अर्थ निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे.
6 / 13
सिंह - या काळात तुम्हाला तुमचे भविष्य घडविण्यासाठी पुढची दिशा मिळेल आणि तुमचे सर्व संभ्रम दूर होतील. तुम्ही तुमच्या ध्येयांसंदर्भात अधिक स्पष्ट व्हाल. पाचवे घरही भूतकाळातील पुण्यांचे घर आहे, यामुळे तुम्हाला मागील वर्षात केलेल्या कामाचे सकारात्मक फळ मिळेल.
7 / 13
कन्या - या काळात तुमच्या कौटुंबिक जीवन काही समस्या येऊ शकतात. यामुळे वाणी आणि रागावर संयम ठेवा आणि अहंकार टाळण्याचा प्रयत्न करा. तसेच आईच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्या.
8 / 13
तूळ - जर तुम्ही मार्केटिंग, सोशल मीडिया अथवा कन्सल्टन्सी क्षेत्रात काम करत असाल अथवा जेथे संप्रेषण अथवा संवाद कौशल्य खूप महत्त्वाचे आहे, अशा ठिकाणी काम करत असाल, तर तुम्हाला या काळात लाभाच्या स्वरुपात सकारात्मक परिणाम मिळतील.
9 / 13
वृश्चिक - तुमच्या संवाद कौशल्यात जबरदस्त सुधारणा होईल. यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. अर्थात तुमचे बोलणे आकर्षक असेल. सूर्याच्या धनु राशीतील गोचर काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबाचे संपूर्ण सहकार्य मिळेल. यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायात चांगली कामगिरी करू शकाल.
10 / 13
धनु - तुमचा मान सन्मान आणि पद प्रतिष्ठा वाढवण्याची शक्यता आहे. तुमचे नेतृत्व आणि निर्णय घेण्याची क्षमता इतरांना प्रभावित करेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि उच्च अधिकारी तुमच्या व्यवस्थापनाचे कौतुक करतील. या काळात तुमची पदोन्नतीही होऊ शकते.
11 / 13
मकर - सूर्याच्या धनू राशीत गोचर काळात, तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागेल. कारण या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, प्रतिकूलही ठरू शकते, अर्थात तुमचे आरोग्य खालावू शकते.
12 / 13
कुंभ - या काळात तुम्हाला तुमच्या पैतृक कुटुंबाचा आणि मोठ्या भावंडांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. याच बरोबर, तुमचे जोडीदारासोबतचे नाते मधुर असेल आणि तुम्ही त्यांच्यासोबत एखाद्या ड्रीम डेस्टिनेशनवरही जाऊ शकतात.
13 / 13
मीन - जे लोक नोकरीच्या शोधात आहेत किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना या काळात काही चांगल्या संधी अथवा ऑफर्स मिळतील. महत्वाचे म्हणजे, तुम्ही कुठल्याही प्रकारचे कर्ज घेऊ नका आणि कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका, असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य