शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१८ वर्षांनी सूर्य-राहु ग्रहण योग: ६ राशींना फलदायी, अपार यश-प्रगतीची संधी; दिलासादायक काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 13:33 IST

1 / 9
नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या राशीसंक्रमणाला संक्रांती असे म्हटले जाते. मीन राशीतील प्रवेशानंतर मीन संक्रांती सुरू होणार आहे. मीन ही गुरुचे स्वामित्व असलेली रास आहे. विद्यमान स्थितीत मीन राशीत राहु आणि बुध ग्रह विराजमान आहेत.
2 / 9
सूर्याच्या मीन राशीतील प्रवेशानंतर सूर्य आणि बुधाचा बुधादित्य राजयोग, तर, सूर्य आणि राहुचा ग्रहण योग तसेच सूर्य, बुध आणि राहुचा त्रिग्रही योग जुळून येणार आहे. राहु हा क्रूर आणि छाया ग्रह मानला जातो. यासह सूर्य आणि केतु यांचा समसप्तक योगही जुळून येत आहे.
3 / 9
सूर्याची मीन संक्रांती, बुधादित्य ग्रहण योग काही राशींना अतिशय लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. अनेक बाबतीत आगामी काळ फलदायी आणि यश, प्रगतीकारक, दिलासादायक ठरू शकेल, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 9
वृषभ: सूर्य-राहु ग्रहण युती योग लाभदायक ठरू शकेल. उत्पन्नात वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळू शकतो. शेअर बाजार आणि लॉटरीत चांगला नफा मिळू शकतो. मनोकामना पूर्ण होतील. कर्जाऊ दिलेले पैसे परत मिळू शकतात. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढती आणि मान-सन्मानातही वाढ होईल.
5 / 9
मिथुन: सूर्य-राहु ग्रहण युती योग अनुकूल ठरू शकेल. नोकरी-व्यवसायात यश मिळू शकते. नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नवीन नोकरी मिळू शकते. व्यवसायात पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. पैसे कमविण्याच्या नवीन संधी मिळतील. तणावातून आराम मिळेल. समस्या कमी होतील. सरकारी अधिकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कामाबाबत जे काही निर्णय घ्याल त्याचे कौतुक होईल.
6 / 9
तूळ: सूर्य-राहु ग्रहण युती योग आनंददायक ठरू शकेल. जी काही रणनीती बनवाल ती प्रभावी ठरेल. विरोध परास्त होऊ शकतील. गुप्त शत्रूंचा पराभव होईल. कोणालाही जास्त कर्ज देऊ नका. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. परदेशी सहलीला जाऊ शकता.
7 / 9
वृश्चिक: विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत चांगले यश मिळेल. अभ्यासाकडे पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे. मोठे यश मिळू शकते. मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकाल.
8 / 9
मकर: जे काम सुरू कराल त्यात यश मिळेल. अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. कौशल्य आणि नेतृत्वाच्या बळावर तुम्ही अत्यंत कठीण परिस्थितीत विजय मिळवाल. या काळात धार्मिक कार्यात अधिक रस असेल.
9 / 9
मीन: सूर्य-राहु ग्रहण युती योग शुभ फलदायी ठरू शकेल. आत्मविश्वासात वाढ होईल. नवीन काम सुरू करू शकता. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. संपत्ती वाढेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य