शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Shukra Gochar 2023: यंदा फेब्रुवारीत 'या' सहा राशींवर होणार प्रेमाचा आणि पैशांचा वर्षाव; बघा तुमचंही भाग्य उजळणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 17:07 IST

1 / 7
शुक्र हा धन, विलास आणि सौंदर्याचा ग्रह मानला जातो. १५ फेब्रुवारीला शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. १२ मार्चपर्यंत तो या राशीत मुक्काम करेल. ज्योतिष शास्त्रानुसार मीन राशीत शुक्राचे हे संक्रमण खूप महत्वाचे आहे कारण मीन राशीत शुक्र उच्च स्थानावर असणार आहे. त्याचा लाभ पुढील सहा राशींना अनुभवता येणार आहे.
2 / 7
शुक्राचे संक्रमण कर्क राशीत भाग्याच्या घरात असेल. बृहस्पति अर्थात गुरु देखील येथे उपस्थित आहे, त्यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. अडचणी कमी होतील आणि धनलाभही होईल. पैशांअभावी एखादे काम थांबले असेल तर तेही पूर्ण केले जाईल. नव्या नोकरीची संधी आली तर त्यातही यश मिळू शकते. यासोबतच नवीन क्षेत्रातील संधी तुमच्या वाट्याला येऊ शकते. या काळात जोडीदाराची उत्तम साथ आणि प्रेम लाभेल.
3 / 7
शुक्राच्या संक्रमणामुळे तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो, ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नसेल. जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल त्याचा नफा आता तुम्हाला उपभोगता येईल. विवाहेच्छुक असाल तर चांगले स्थळ चालून येईल आणि तुमच्या पसंतीसही पडेल. लग्नाचे योग आहेत. प्रेम, पैसा आणि संसार अशी त्रिसूत्री येत्या काळात जुळून येणार असल्याची स्थिती आहे.
4 / 7
कन्या राशीच्या लोकांच्या व्यवसायात वाढ होईल. आर्थिक स्थिती भक्कम झाल्याने सांसारिक अडचणी दूर होतील. जोडीदाराबरोबर एका मोठ्या सहलीचे आयोजन कराल. नोकरदार वर्गाला नोकरीत प्रमोशन मिळू शकते. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. मन शांत, आनंदी आणि समाधानी असेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमचे व्यक्तिमत्वही उजळेल.
5 / 7
शुक्राच्या या संक्रमणामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. व्यावसायिकांना तसेच विद्यार्थ्यांना परदेश गमनाचे योग आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेत मेहनतीचे फळ मिळेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवता येईल. हा काळ तुमच्यासाठी खूप आनंद घेऊन येईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. नवदाम्पत्याला संतान प्राप्तीचे योग आहेत. उत्पन्नाची नवीन साधने प्राप्त झाल्याने प्रापंचिक अडचणी काही प्रमाणात कमी होतील हे नक्की!
6 / 7
करिअरसाठी हा काळ चांगला आहे. मालमत्तेच्या व्यवहारात फायदा होईल. लांबचे प्रवास होतील आणि ते आर्थिक लाभाचे योग जुळून येतील. घरात एखादे शुभ कार्य किंवा लग्न होऊ शकते. विवाहेच्छुकांना मनासारखा जोडीदार मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. आलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवल्यास भविष्यात चांगले उत्पन्न मिळू शकेल.
7 / 7
शुक्राचे संक्रमण मीन राशीत होणार असल्याने ते इतर राशींच्या तुलनेत अधिक भाग्यकारक ठरेल. वास्तविक पाहता मीन राशीची साडेसाती सुरु झाली आहे, तरीदेखील ग्रहांचे अशा पद्धतीने होत असलेले स्थलांतर मीन राशीच्या पथ्यावर पडणार आहे. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला त्यात फायदा होईल. व्यवसाय वाढवण्याचे स्वप्न साकार होईल. नोकरदारांना पदोन्नतीची आणि पगारवाढीची शक्यता आहे. याशिवाय वैवाहिक जीवनातही आनंद मिळेल. मुलांकडून शुभ वार्ता समजतील.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य