Shravan Vrat 2021 : कालसर्प दोष आणि राहू केतूच्या वाईट प्रभावातून मुक्त होण्यासाठी नागपंचमीला करा 'हे' सोपे उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 17:13 IST
1 / 5नागमूर्तीला दुधाचा अभिषेक करा. हा अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा १०८ वेळा जप करा. 2 / 5अंघोळ झाल्यावर शंकराला बेल वाहून सर्पमुर्तीला गंध लावून नवनाग स्तोत्राचे भक्तिभावाने पठण करा. 3 / 5एखाद्या शिव मंदिरात तांब्याची किंवा पितळ्याची सर्पाकृती शिवलिंगावर अर्पण करा. 4 / 5तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात तांब्याची किंवा पितळ्याची सर्पाकृती टाकून ते पाणी वाहत्या पण स्वच्छ नदीत सोडा. 5 / 5नागपंचमीच्या दिवशी देवघरात राहू यंत्र आणि कालसर्पदोष असल्यास कालसर्प यंत्र आणून त्याची गंध, अक्षता वाहून पूजा करावी आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर व्हावेत अशी नागदेवतेला प्रार्थना करावी.