२७ नोव्हेंबरपर्यंत शनि वक्री: ९ राशींना १३८ दिवस लाभ, पद-पैसा; भरघोस भरभराट, भाग्योदय काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 13:30 IST
1 / 13ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिने जुलै महिना विशेष ठरणारा आहे. या महिन्यात नवग्रहांचा गुरु बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रह उदय होणार आहे. तर नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनि ग्रह वक्री होणार आहे. आताच्या घडीला शनि गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत विराजमान आहे. जून २०२७ पर्यंत शनि मीन राशीत असणार आहे. 2 / 13शनि मीन राशीत असल्यामुळे कुंभ, मीन आणि मेष या राशींची साडेसाती सुरू असून, सिंह आणि धनु या राशींवर ढिय्या प्रभाव सुरू आहे. शनि ग्रहाचे मीन राशीत वक्री होणे विशेष मानले जात आहे. २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत शनि वक्री स्थितीत असणार आहे.3 / 13शनि वक्री होणे काही राशींसाठी अत्यंत चांगले ठरू शकते, असे म्हटले जात आहे. शनिचे शुभाशिर्वाद या राशींना प्राप्त होऊ शकतात. नोकरी, व्यवसायात भरभराट होऊ शकते, असे सांगितले जाते. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...4 / 13मेष: परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते. व्यवसायात यशस्वी होऊ शकता. शिक्षण क्षेत्रातच फायदे मिळू शकतात. नवीन विषयांमध्ये रस असू शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. अनावश्यक खर्चापासून मुक्त होऊ शकता. पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता. आरोग्याची विशेष काळजी घेतल्यास ते चांगले होईल.5 / 13वृषभ: आगामी काळात उत्पन्न वाढू शकते. गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते आणि नवीन संपर्क फायदेशीर ठरू शकतील. जर एखाद्या प्रकल्पावर काम करत असाल, तर त्याला गती आणि यश मिळू शकते. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे.6 / 13मिथुन: करिअरच्या क्षेत्रात अनपेक्षित फायदे मिळू शकतात. कामाच्या संदर्भात केलेले प्रवास लाभदायक करू शकता. फायदा होऊ शकतो. व्यवसायाच्या क्षेत्रात ध्येय साध्य करू शकता. आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकेल. व्यवसायातून चांगले पैसे कमवू शकता. नोकरीत बोनस किंवा इन्सेटिव्ह मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. 7 / 13कर्क: नशीब चमकू शकते. प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. व्यावसायिक भागीदारी फायदेशीर ठरू शकेल. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. आकर्षण वाढेल. देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करू शकता. धार्मिक कार्यांमध्ये आवड वाढू शकेल.8 / 13तूळ: करिअरमध्ये यश मिळू शकते. चांगली प्रगती होऊ शकते. ध्येयाकडे वाटचाल करू शकता. व्यवसायात चांगल्या नवीन संधी मिळू शकतात. शिक्षणाच्या क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना चांगले निकाल मिळू शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. बराच काळ अडकलेले पैसे वसूल होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांचा पगार वाढू शकतो. व्यवसायातून नफा मिळू शकतो. 9 / 13वृश्चिक: स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष फायदे मिळू शकतात. प्रयत्नांचे पूर्ण फळ मिळू शकते. स्वतःचा व्यवसाय असेल तर खूप व्यस्त राहणार आहात. कुटुंबासाठी नक्कीच वेळ काढा. सोशल नेटवर्किंगचा फायदा होऊ शकतो. कोणतीही जुनी इच्छा, विशेषतः जमीन, मालमत्तेशी संबंधित इच्छा पूर्ण होऊ शकते. बांधकाम, वाहन खरेदी किंवा कोणतीही मोठी गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकेल. चांगले सकारात्मक परिणाम मिळण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल.10 / 13धनु: घर, फ्लॅट किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये सुरू असलेले वाद संपू शकतात. व्यवसायातील मंदी किंवा अनिश्चितता संपू शकेल. नफा मिळण्यासाठी अनुकूलता लाभू शकेल. लक्ष केंद्रित करण्याची आणि कठोर परिश्रम करण्याची क्षमता वाढेल. अनेक क्षेत्रात फायदा होऊ शकतो. पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता.11 / 13मकर: विविध क्षेत्रात लाभ मिळू शकतो. परिश्रमाचे फळ मिळू शकते. कुटुंब आणि भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळू शकते. परदेश प्रवासाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. व्यवसायासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. सोशल मीडिया किंवा ऑनलाइन व्यवसायाद्वारे नफा कमवू शकता. परदेशातून नवीन संधी मिळू शकतात. अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात. सासरच्या लोकांकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे.12 / 13मीन: मानसिक तणावातून दिलासा मिळू शकतो. निर्णय घेण्याची क्षमता आणि आत्मविश्वास वाढेल. मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. रिअल इस्टेटशी संबंधित कामांमध्ये यश मिळू शकते. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यावसायिक भागीदार मिळू शकतो. परदेश प्रवासाची शक्यता निर्माण होते. अध्यात्माकडे अधिक कल असेल. दान आणि पुण्य याद्वारे विशेष लाभ मिळू शकतील. सुख, सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. अनावश्यक खर्च टाळावेत. 13 / 13- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.