शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 09:01 IST

1 / 12
Shani Margi In Meen Rashi 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांचा न्यायाधीश असलेल्या शनि ग्रहाला अनन्य साधारण महत्त्व आहे. नवग्रहांमध्ये सर्वांत धीम्या गतीने गोचर करणारा शनि ग्रह आहे. आताच्या घडीला शनि ग्रह गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत विराजमान आहे. गेले सुमारे १३८ दिवस वक्री असलेला शनि आता याच मीन राशीत मार्गी होणार आहे.
2 / 12
नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात शनि मीन राशीत मार्गी होणार आहे. शनि मीन राशीत असल्यामुळे कुंभ, मीन आणि मेष या राशींची साडेसाती सुरू असून, सिंह आणि धनु या राशींवर ढिय्या प्रभाव सुरू आहे. शनि ग्रहाचे मीन राशीत मार्गी होणे विशेष मानले जात आहे.
3 / 12
वक्री झालेला शनि मार्गी होणे अनेक राशींना शुभ लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. शनिचे शुभाशिर्वाद या राशींना प्राप्त होऊ शकतात. नोकरी, व्यवसायात भरभराट होऊ शकते, असे सांगितले जाते. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...
4 / 12
मिथुन: शनि मार्गी होणे फायदेशीर ठरू शकते. कामात आणि व्यवसायात चांगली प्रगती दिसू शकते. व्यावसायिक त्यांच्या निर्णयांवर समाधानी असतील. प्रत्येक आव्हानाला दृढनिश्चयाने तोंड देतील. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांशी समन्वय सुधारेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ आहे. व्यवसायात विस्तार आणि नफ्याच्या संधी असतील. समाजात प्रतिष्ठा वाढेल. या काळात वडिलांशी संबंध चांगले राहतील.
5 / 12
कर्क: शनि मार्गी होणे अनुकूल ठरू शकते. या काळात नशिबाची बाजूने असेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. बऱ्याच काळापासून रखडलेले प्रकल्प पूर्ण होतील. नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ आहे. व्यवसाय विस्तार आणि नफ्याच्या संधी निर्माण होतील. सामाजिक दर्जा वाढेल. आनंदी वैवाहिक जीवनाचा आनंद घेता येऊ शकेल. संशोधनात सहभागी असलेल्यांना फायदा होऊ शकतो.
6 / 12
तूळ: शनि मार्गी होणे चांगले ठरू शकते. विरोधकांवर विजय प्राप्त करता येऊ शकेल. हितशत्रू पराभूत होऊ शकतील. या काळात वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. एखाद्या दीर्घकालीन समस्येतून मुक्तता मिळू शकते.
7 / 12
वृश्चिक: अच्छे दिन सुरू होऊ शकतात. या काळात धैर्य आणि शौर्य वाढेल. आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. नवीन नोकरी, वाहन किंवा मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. नवीन आकांक्षा निर्माण होतील. आयुष्यात स्थिरता आणि आदर वाढेल. जुन्या गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध निर्माण होतील. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
8 / 12
मकर: शनि मार्गी होणे शुभ ठरू शकते. या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. यश मिळेल. भावंडांशीही चांगले संबंध निर्माण होतील. नोकरदार व्यक्तींना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. व्यावसायिकांना नवीन करार किंवा भागीदारीचा प्रस्ताव मिळू शकतो, जो भविष्यात फायदेशीर ठरेल.
9 / 12
कुंभ: शनि मार्गी होणे सकारात्मक ठरू शकते. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होतील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिरता मिळेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले प्रकल्प पूर्ण होतील. नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा चांगला काळ आहे. व्यवसाय विस्तार आणि नफ्याच्या संधी निर्माण होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. वाणी प्रभावी होईल. लोकांना प्रभावित कराल.
10 / 12
मीन: गेले सुमारे १३८ दिवस वक्री असलेला शनि या राशीत मार्गी होणार आहे. नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. भाग्याचा भक्कम पाठिंबा लाभू शकेल. अडकलेले सरकारी काम पूर्ण होऊ शकते. घरी किंवा कुटुंबात एखादा धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होऊ शकतो. कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल. नवीन संधी उपलब्ध होतील. त्या स्वीकारल्याने आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे.
11 / 12
शनि एका राशीत शनि तब्बल २.५ वर्षे असतो. २९ मार्च २०२५ रोजी शनि मीन राशीत विराजमान झाला आहे. जून २०२७ पर्यंत शनि मीन राशीत असणार आहे. शनि साडेसाती आणि ढिय्या प्रभाव अतिशय महत्त्वाचा मानला जातो.
12 / 12
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिक