1 / 15मराठी वर्षातील वैशाख महिना सुरू असून, लवकरच या महिन्याची सांगता होत आहे. वैशाख अमावास्येला शनैश्चर जयंती असते. यंदा २०२५ मध्ये सोमवार, २६ मे रोजी शनैश्चर जयंती आहे. याच दिवशी वैशाख सोमवती अमावास्येचे व्रतही केले जाणार आहे.2 / 15शनि महादेव शिवशंकर यांना गुरु मानतो. शनि जयंती सोमवारी येत असून, या दिवशी सोमवती अमावास्येचे व्रताचरण केले जाणार आहे. त्यामुळे शनि जयंतीच्या दिवशी केलेले शिवपूजन विशेष फलदायी आणि लाभदायी मानले गेले आहे. 3 / 15शनी हा न्यायाधीशाच्या भूमिकेत असल्यामुळे माणसाच्या कर्माचा सर्व ताळेबंद त्याकडे असतो. माणसाच्या कर्मानुसार तो यश देतो. तो कधी कुणावर अन्याय करत नाही, असे सांगितले जाते. तुमच्या राशीनुसार शनि जयंतीला न्यायाधीश शनिशी संबंधित काही उपाय अगदी रामबाण ठरू शकतात, असे म्हटले जाते. नेमके काय करावे? जाणून घेऊया...4 / 15मेष: या राशीच्या लोकांनी हनुमंतांचे पूजन करावे. हनुमंतांना सिंदूर अर्पण करावे. गरजूंना दान करावे. 5 / 15वृषभ: या राशीच्या लोकांनी दही आणि साखरेचे दान द्यावे. भगवान शिवाची पूजा करावी. 6 / 15मिथुन: या राशीच्या लोकांनी या दिवशी 'ॐ शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा. तसेच हनुमंतांचे पूजन करावे.7 / 15कर्क: या राशीच्या लोकांनी शनिस्तोत्राचे पठण करावे. तांदूळ आणि तीळ दान करावे.8 / 15सिंह: या राशीच्या लोकांनी गहू आणि गूळ दान करावे. शनि मंत्राचा जप केल्याने सूर्य आणि शनि दोघांचेही आशीर्वाद मिळू शकतात.9 / 15कन्या: या राशीच्या लोकांनी गरजूंना दान करावे. महादेव शिवशंकरांचे पूजन करावे.10 / 15तूळ: या राशीच्या लोकांनी दही आणि साखर दान करावी. शिवपूजन करताना जलाभिषेक करावा.11 / 15वृश्चिक: या राशीच्या लोकांनी हनुमानाची पूजा करावी. बुंदीचे लाडू अर्पण करावे. लाल वस्त्रे दान करावे.12 / 15धनु: या राशीच्या लोकांसाठी काळे तीळ दान करावे. शिवलिंगावर जलाभिषेक करावा.13 / 15मकर: या राशीच्या लोकांनी मोहरीचे तेल अर्पण करावे. शनिस्तोत्राचे पठण करावे. 14 / 15कुंभ: या राशीच्या लोकांनी शनिस्तोत्राचे पठण करावे. प्राण्यांना अन्नदान करावे.15 / 15मीन: या राशीच्या लोकांनी कपडे किंवा मिठाई दान करावी. भगवान शिवाच्या मंत्रांचा जप करावा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.