२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 13:29 IST
1 / 9Year 2026 Astrology: २०२६ हे वर्ष अनेकार्थाने विशेष ठरणारे आहे. या वर्षात अनेक ग्रहांचे राशी आणि नक्षत्र गोचर होणार आहे. नवग्रहांचे छाया ग्रह मानले जाणारे राहु आणि केतु यांचे गोचर होणार आहे. आताच्या घडीला राहु संपूर्ण वर्षभर कुंभ राशीत आणि केतु सिंह राशीत विराजमान असेल.2 / 9पुढील वर्षीच्या डिसेंबर २०२६ मध्ये राहु शनिचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत आणि केतु कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. तसेच नवग्रहांचा गुरू बृहस्पती म्हणजेच गुरू ग्रह सुरुवातीला मिथुन राशीतून कर्क राशीत आणि त्यानंतर सिंह राशीत प्रवेश करेल. 3 / 9२०२६ मध्ये नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनि नक्षत्र गोचर करणार आहे. २०२६ संपूर्ण वर्ष शनि मीन राशीत असेल. त्यामुळे २०२६ या संपूर्ण वर्षात कुंभ, मीन आणि मेष राशीची साडेसाती सुरू राहणार आहे. वर्ष २०२७ मध्ये शनि मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. 4 / 9राहु-केतु, शनि आणि गुरू या चार ग्रहांच्या गोचरामुळे अनेक योग, राजयोग, विपरीत योग जुळून येणार आहेत. याचा सर्वोत्तम आणि सर्वाधिक चांगला परिणाम चार राशींना होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. कुटुंब, व्यवसाय, नोकरी, आर्थिक आघाडीवर सकारात्मक, अनुकूल परिणाम प्राप्त होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. तुमची रास आहे का यात? जाणून घेऊया...5 / 9वृषभ: २०२६ हे वर्ष यशाने भरलेले असेल. करिअरमध्ये इच्छित पदोन्नती, पगारवाढ आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आनंददायी घटना वाढू शकतील. सुख समृद्धीचा लाभ घेता येऊ शकेल. नवीन घर किंवा वाहन घेण्याची योजना यशस्वी होऊ शकेल. वैयक्तिक जीवन समृद्ध राहील. अविवाहित व्यक्तींसाठी विवाहाच्या शक्यता निर्माण होतील. विवाहितांचे संबंध अधिक सुसंवादी होतील. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल.6 / 9सिंह: २०२६ मध्ये या राशीवर शनिचा ढिय्या प्रभाव राहू शकेल. असे असले तरी इतर ग्रहांची स्थिती शुभ परिणाम देईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी निर्माण होतील. उत्पन्न वाढेल. मुलांकडून समाधान मिळेल. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांनाही फायदा होईल. लांब प्रवास होण्याची शक्यता आहे.7 / 9तूळ: २०२६ हे वर्ष करिअरमध्ये प्रगतीचे वर्ष असेल. व्यवसायात नफा वाढेल. एक मोठा फायदेशीर करार मिळेल. मागील गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींसाठी लग्नाच्या चर्चा पुढे सरकू शकतात. वैवाहिक नातेसंबंधांमध्येही गोडवा येईल. लांब पल्ल्याच्या प्रवासाची शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.8 / 9धनु: २०२६ मध्ये ग्रहांचे आशीर्वाद मिळत राहतील. आर्थिक समृद्धी वाढेल. नवीन घर, वाहन किंवा जमीन खरेदी करण्याच्या संधी उपलब्ध होतील. पदोन्नतीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असेल. दर्जा आणि प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात शांतता, आनंद नांदेल. व्यवसायात भरभराट होईल. समाजात आदर वाढेल.9 / 9- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.