By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 07:00 IST
1 / 4शनि हा सर्वात बलवान ग्रहांपैकी एक आहे, शनीच्या पाठबळामुळे शश राजयोग निर्माण होईल. हा काळ पुढील तीन राशीच्या लोकांच्या जीवनात बरेच बदल घडवून आणू शकतो. मात्र त्यांचे आचरण शुद्ध असायला हवे. तरच त्यांना अपेक्षित फळ मिळते. या काळात शनी देवाची पूजा करणे, गरजूंना मदत करणे, वृद्धांची सेवा करणे इ. गोष्टी केल्या असता शनी कृपा होते आणि अपेक्षित फळ मिळते. हा नियम १२ ही राशींना लागू होतो, पण पुढील तीन राशींनी जास्त सतर्क राहायला हवे. 2 / 4वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीची प्रतिगामी चाल खूप फायदेशीर ठरणार आहे. या राशीच्या लोकांना या काळात जे काही काम हाती घेतील त्यात यश मिळेल. याशिवाय व्यवसाय आणि नोकरीतही लक्षणीय प्रगती होईल. हा काळ त्यांच्यासाठी बरेच सकारात्मक बदल घेऊन येणार असेही म्हटले जाते. याशिवाय रोजगाराचे नवीन मार्गही उपलब्ध होतील.3 / 4ज्योतिष शास्त्रानुसार या काळात कन्या राशीच्या लोकांच्या नशिबाची कुलुपे उघडतील. त्यांना त्यांच्या सर्व कामात यश मिळेल. त्यांना नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोतही मिळतील. त्याचबरोबर या राशीच्या लोकांच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या संपतील आणि त्यांना मान-सन्मान मिळेल.4 / 4या बदलाचा प्रभाव कुंभ राशीच्या लोकांवर खूप चांगला राहील. या लोकांच्या सर्व समस्या संपतील. अपेक्षित यश मिळेल. या राशीचा अधिपती ग्रह शनि आहे, त्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल पाहायला मिळतील. याशिवाय पैशाची कमतरताही दूर होईल. सद्यस्थितीत कुंभ राशीला साडेसाती सुरु आहे. तरीही त्यांना सकारात्मक फळ मिळेल!