षडाष्टक योग २०२५: १८ सप्टेंबर शनी-शुक्र अशुभ षडाष्टक; ५ राशींचे आर्थिक, मानसिक आरोग्य धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 16:49 IST
1 / 6शुक्र हा भौतिक सुख देणारा आणि शनी हा वैराग्य देणारा ग्रह आहे. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सिंह राशीत हा अशुभ षडाष्टक योग तयार होत आहे. ज्यामुळे आर्थिक नुकसान, आरोग्याच्या तक्रारी आणि नातेसंबंधात बिघाड संभवते. याबाबत ज्योतिषांच्या माहीनुसार योग्य मार्गदर्शन घेऊ. 2 / 6मेष : अनावश्यक खर्च ओढावल्याने तुमचे बजेड बिघडू शकते. तुमची साडेसाती सुरु असल्याने या काळात तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे. शनी देव तुमच्या कामावर लक्ष ठेवून आहेत. छोट्या चुकीचीही मोठी शिक्षा होऊ शकते. मानहानी होऊ शकते. वाद टाळा, सल्ला देताना आणि घेताना १०० वेळा विचार करा. शनि आणि मंगळाच्या मंत्रांचा जप करा.3 / 6सिंह : व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वासावर वाईट परिणाम होऊ शकतो. समाजात तुमच्या मान सन्मानाला धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. एखादा आजार डोकं वर काढत असेल तर वेळीच उपाय करा. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल, पण अकारण वाद तुमच्या नात्यात दुरावा निर्माण करू शकतात. जोडीदाराशी नाते बिघडल्याने मानसिक ताण येऊ शकतो. आर्थिक, मानसिक संतुलन राखा. हनुमान तसेच शनी चालीसा पठण करा. 4 / 6धनु : हा काळ तुमच्यासाठी तणाव वाढवणारा असू शकेल. आरोग्याच्या तक्रारी त्रास देतील. नोकरी, व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक ताण सहन करावा लागू शकतो. अशा वेळी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर खडीसाखर ठेवणे लाभदायी ठरेल. कोणत्याही कामाच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. कर्ज घेऊ नका. गुंतवणूक सांभाळून करा. शनी मंत्राचा रोज जप करा. 5 / 6कुंभ : कुंभ राशीसाठी साडेसातीचा हा अंतिम टप्पा लाभदायी ठरू शकतो, पण त्यांना कामाबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे. तुमच्या सामाजिक प्रतिमेला धक्का लागू शकतो. हितशत्रूंचा धोका संभवतो. सहकाऱ्यांच्या कुरघोड्या, नातेवाईकांचे कट कारस्थान मानसिक तणाव देऊ शकतात. या काळात अनावश्यक खर्च टाळा. शनी तथा हनुमान मंदिरात जाण्याचा नेम सुरु ठेवा. 6 / 6मीन : मिन राशीसाठी साडेसातीचा मधला टप्पा सुरु आहे. त्यामुळे त्यांना संमिश्र परिणाम दिसू शकतात. कौटुंबिक नातेसंबंधात लाभ तर नोकरी व्यवसायात नुकसान होऊ शकते. हा काळ आर्थिक नुकसान देणारा असेल. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. मौनाचा आधार घ्या. कमी बोला आणि योग्य ठिकाणी बोला. दर मंगळवारी हनुमान मंदिर आणि शनिवारी शनी मंदिरात जा.