शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

'या' तीन राशींवर सदासर्वदा असते शनी देवाचे कृपाछत्र; का? ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 17:21 IST

1 / 5
यामध्ये पृथ्वी तत्वाचा ज्योतिषशास्त्राशी खोलवर संबंध आहे. पृथ्वी घटकातील वृषभ, कन्या आणि मकर राशीची चिन्हे बुध ग्रहाशी संबंधित मानली जातात. या राशीचे लोक श्रीमंत आणि सुंदर असतात.
2 / 5
या तीन राशी इतर राशींच्या तुलनेत कठोर परिश्रम घेणाऱ्या आणि जीव ओतून काम करणाऱ्या मानल्या जातात. असा स्वभावधर्म असलेल्या व्यक्ती शनी देवांना प्रिय असतात. त्यामुळेच इतर राशीच्या लोकांना शनी देवाची भीती वाटत असली, तरी या तीन राशींवर शनी देव मेहरबान असतात आणि वेळोवेळी त्यांची परीक्षाही घेत असतात.
3 / 5
शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी आहे. शुक्राचा संबंध चंद्राशी आणि तो वृषभ राशीत बलवान असतो. याशिवाय या राशीच्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. शुक्र आणि बुध यांच्या प्रभावाखाली या राशीचे लोक धैर्यवान, आत्मविश्वासी आणि पैशाच्या बाबतीत इतरांपेक्षा पुढे असतात. मात्र, या राशीचे लोक हट्टी आणि रागीट स्वभावाचे असतात. त्यांच्यातील आढ्यता मोडण्यासाठी शनिदेव त्यांची नाना प्रकारे परीक्षा घेतात व ते त्या परीक्षेत खरे उतरतात.
4 / 5
बुध हा पृथ्वी तत्वाच्या कन्या राशीचा स्वामी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, कन्या ही पृथ्वी तत्वाचे सर्वात मोठे चिन्ह आहे. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांमध्ये धूर्तता, वक्तृत्व आणि व्यवस्थापन हे गुण असतात. याशिवाय या राशीचे लोक पैशाच्या बाबतीत इतरांपेक्षा पुढे असतात. त्यामुळे त्यांचा अहंकारही तेवढ्याच पटीत पोसला जातो. स्वतःच्या मी पणाला आवर घातला तर हे लोक हर क्षेत्रात प्रगती करू शकतात.
5 / 5
मकर राशीचा स्वामी शनि आहे. या राशीत बुध मजबूत राहतो. यामुळे या राशीचे लोक बुद्धिमान असतात. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे या राशीचे लोक संधीसाधू, धूर्त आणि धनवान मानले जातात. याच कारणाने त्यांच्यात अहंकार डोकावतो. तो शनी देवांना अजिबात प्रिय नाही म्हणून या राशीच्या लोकांना सर्व काही मिळते पण उशिरा हा अनुभव सर्रास येतो. याशिवाय मकर राशीचे लोक त्यांच्या विषयात निपुण असतात. या राशीच्या लोकांसाठी सूर्याची उपासना चांगली आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिष