१३ फेब्रुवारीला सूर्याचा होणार कुंभेत प्रवेश; 'या' राशीच्या लोकांचं नशीब चमकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 21:29 IST
1 / 8Rashi Parivartan : ग्रहांच्या राशीतील बदलाचा प्रत्येकाच्या भाग्यावर मोठा प्रभाव पडत असतो. शुभ-अशुभ प्रभावामुळे कोणाचे नशीब उजळले तर कोणाच्या आयुष्यात निराशा येते. 2 / 8ग्रहांचे अधिपती सूर्य देव १३ फेब्रुवारी रोजी शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरू आधीच कुंभ राशीत विराजमान आहेत. ज्योतिषशास्त्रात सूर्यदेवाला ग्रहांचा राजा मानले जाते. 3 / 8संपूर्ण राशीचक्रातून भ्रमण करायला सूर्याला एक वर्षाचा काळ लागतो. वेगवेगळ्या राशीच्या लोकांवर त्याचा वेगवेगळा प्रभाव पडतो. चला जाणून घेऊया कोणकोणत्या राशी आहेत ज्यासाठी सूर्याचे राशी बदल शुभ परिणाम देईल.4 / 8मेष - व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. एखादा महत्त्वाचा करार निश्चित होऊ शकतो. गुंतवणुकीसाठी चांगली वेळ आहे. राजकारणात सक्रिय लोकांना मोठे पद मिळू शकते. पैशाची आवक वाढेल. व्यक्ती नोकरीत असो वा व्यवसायात, प्रगती नक्कीच होईल.5 / 8मिथुन - मिथुन राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या राशीच्या लोकांच्या संपत्तीत आणि धनात वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. सर्वच ठिकाणी परिस्थिती तुमच्या बाजूनं राहील. तुम्हाला पदोन्नती आणि सन्मान मिळेल. कौटुंबिक जीवनही आनंदी राहील.6 / 8कर्क - कर्क राशीच्या लोकांना व्यापार आणि राजकारणात मोठे यश मिळू शकते. याशिवाय जुन्या आजारांपासून आराम मिळेल. या कालावधीत धनलाभाचेही योग उद्भवतात. विवाह योग्य असलेल्यांना एक चांगली बातमी मिळू शकेल.7 / 8वृश्चिक - नोकरी-व्यवसायात प्रगती होईल. परदेशातूनही पैसे मिळतील. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. नवीन ऑफर उपलब्ध होतील आणि त्या खूप फायदेशीर ठरतील. नवीन काम सुरू करण्याच्या दृष्टीनेही चांगले दिवस येतील. जिथे तुम्ही पैसे गुंतवलेत तिथे तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. बऱ्याच कालावधीपासून जी गोष्ट खरेदी करण्याच्या विचारात होता, ती खरेदी करण्याचे योगही संभवतात.8 / 8कुंभ - कुंभ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होईल. पैशांचे येणेही वसूल होईल. कोणतेही काम करा, यश मिळेल. कुटुंब आणि समाजात तुमची प्रतिमा उजळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोतही वाढतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी आणि उत्तम राहील. परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते.