By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 07:00 IST
1 / 6रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला तिच्या रक्षणाची हमी देतो. यंदा भावा बहिणांना मंगळ ग्रहाचे परिवर्तन संरक्षण कवच देईल. मंगळ ग्रहाच्या राशी परिवर्तनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात ११ ऑगस्ट रोजी श्रावण पौर्णिमा आहे. हा दिवस रक्षाबंधन म्हणून साजरा केला जातो. या उत्सवाच्या माहोलमध्ये पुढील पाच राशींना मिळणार आहे उत्तम ग्रहस्थितीचे कवच. 2 / 6ज्योतिष शास्त्रानुसार मंगळाचे संक्रमण सिंह राशीसाठी शुभ ठरणार आहे. तुम्ही ज्या कामाची सुरुवात कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. आर्थिक प्रगतीची शक्यता आहे. सकारात्मकता वाढल्यामुळे अपेक्षित यश, पद प्राप्त कराल. 3 / 6मंगळ वृषभ राशीसाठी मंगल ठरेल. या काळात शत्रूंचा पराभव होईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर फायदा होईल. जुन्या वादातून सुटका होऊ शकते.4 / 6तूळ राशीच्या लोकांना या काळात धनलाभ होण्याची शक्यता आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल. घरच्यांचा पाठिंबा मिळेल. 5 / 6मंगळाचे संक्रमण कर्क राशीसाठी शुभ ठरेल. कोणत्याही जुन्या कर्जातून सुटका होऊ शकते. नोकरीत प्रमोशन मिळेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सर्वांचे सहकार्य मिळेल. परीक्षेची तयारी करणाऱ्या लोकांना चांगले यश मिळेल. 6 / 6प्रेम जीवनात नवीन ऊर्जेचा संचार होईल. विवाहेच्छुकांचे लग्न ठरेल. या दरम्यान नवीन वाहन किंवा घर खरेदीची शक्यता आहे. आर्थिक भरभराट होण्याची दाट शक्यता आहे.