राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 15:12 IST
1 / 15Rahu Mahadasha Dosh Upay In Marathi: ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांचा केवळ कुंडली, व्यक्तींवर नाही, तर देश-दुनियेवर प्रभाव पडत असतो. दोन ग्रह असे आहेत, ज्यांची ओळख छाया ग्रह अशी आहे. ते म्हणजे राहु आणि केतु. राहु आणि केतु यांना नवग्रहांमध्ये स्थान असून, ते विशेष मानले जाते. कुंडलीतील राहु-केतु यांच्या स्थानांवरून व्यक्तींवरील प्रभाव पाहिला जातो. 2 / 15हे दोन्ही ग्रह एकमेकांसमोर असतात. म्हणजेच एकमेकांपासून सातव्या समसप्तक स्थानी असतात. राहु आणि केतु यांचे चलन कायम वक्री असते. कन्या राशी ही याचे स्वगृह आहे. वृषभ ही मूलत्रिकोणराशी आहे. मिथुन उच्चरास आणि धनु ही नीचरास आहे. याची उपास्यदेवता कालिका आहे. गोमेद हे याचे रत्न आहे. 3 / 15विशोंत्तरी महादशेत राहु महादशेचा काल सुमारे १८ वर्षांचा आहे. राहु हा भरपूर धन व ऐहिक सौख्य देणारा ग्रह आहे. परंतु, राहुची महादशा सुरू असेल, प्रतिकूल अशुभ परिणाम प्राप्त होत असतील, तर काही उपाय करणे उपयुक्त मानले जाते. हे उपाय केल्याने प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होऊ शकते, असे सांगितले जाते. 4 / 15राहु दोषाचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी, वैवाहिक जीवनात आणि सासरच्या लोकांशी आदराने आणि सौहार्दपूर्ण वागले पाहिजे, असे म्हटले जाते. 5 / 15राहुच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी व्यक्तीने नियमितपणे केशराचा टिळा लावायला हवा, असे सांगितले जाते.6 / 15गुरुवारी पिवळे कपडे, हरभरा डाळ किंवा हळद दान केल्याने राहुचा प्रतिकूल प्रभाव कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच गरजूंना अन्न देणे शुभ मानले जाते.7 / 15राहुच्या अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी वाईट सवयी आणि नकारात्मक संगतीपासून दूर राहावे.8 / 15घरातील शौचालय आणि पायऱ्या योग्य दिशेने बांधल्या तर राहुशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात, असे म्हटले जाते.9 / 15शनिवारी किंवा राहुकाल दरम्यान राहु शांतीसाठी विशेष प्रार्थना करणे अत्यंत शुभ मानले जाते.10 / 15कालभैरव, भगवान शिव आणि माता दुर्गेची पूजा केल्याने राहु दोषापासून मुक्तता मिळते, असे मानले जाते. 11 / 15ॐ अर्धकायं महावीर्यं चन्द्रादित्यविमर्दनम्। सिंहिकागर्भसंभूतं तं राहुं प्रणमाम्यहम्॥ हा नवग्रह स्तोत्रातील राहुचा श्लोक आहे. ॥ॐ नागध्वजाय विद्महे पद्महस्ताय धीमहि तन्नो राहुः प्रचोदयात्॥ हा राहुचा गायत्री मंत्र असल्याचे म्हटले जाते.12 / 15॥ॐ राहवे देवाय शांतिम, राहवे कृपाए करोति। राहवे क्षमाए अभिलाषत्, ॐ राहवे नमो: नम:॥, असा राहुचा शांती मंत्र असल्याचे म्हटले जाते. याशिवाय, ॥ ॐ भ्रां भ्रीं भ्रौं सः राहवे नमः ॥, हा राहुचा बीज मंत्र आहे. 13 / 15कुंडलीत राहु कमकुवत असेल तर प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी गोमेद रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. हे रत्न शनिवारी धारण करावे. असे केल्याने उत्तम लाभ मिळू शकतात.14 / 15मात्र, तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन अवश्य घ्यावे, असे सांगितले जाते. तसेच राहुच्या संबंधित गोष्टींचे यथाशक्ती दान करावे.15 / 15- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.