कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 13:31 IST
1 / 16Rahu Ketu Kundali Impact: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे महत्त्व आणि महात्म्य वेगळे आहे. ग्रहांच्या गोचराचा कुंडलीतील स्थानांप्रमाणे त्या-त्या व्यक्तीवर त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडत असतो. प्रत्येक ग्रहाचा व्यक्तींवर, राशींवर आणि देश-दुनियेवर शुभ तसेच अशुभ परिणाम होत असतो, असे म्हटले जाते. 2 / 16सर्वच ग्रह काळाच्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे गोचर, राशी प्रवेश करत असतात. ग्रहाचा अस्त होणे, उदय होणे, ग्रह वक्री होणे या गोष्टी ग्रहांच्या गोचरामुळे घडत असतात. ज्योतिषशास्त्रात राहु-केतु यांना छाया ग्रह मानण्यात आले आहे.3 / 16२९ मे २०२५ रोजी राहु आणि केतु यांचे गोचर झाले आहे. राहु आणि केतु अनुक्रमे मीन आणि कन्या राशीतून आता कुंभ आणि सिंह राशीत विराजमान झाले आहेत. राहु-केतुचे राशीपरिवर्तन अनेकार्थाने विशेष ठरणारे आहे. राहु-केतुच्या राशीबदलाचे प्रभाव आणि परिणाम दीर्घकालीन असतात. राहु-केतु पापकारक ग्रह मानण्यात आले असून, ते कायम वक्री चलनानेच एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात.4 / 16पुढील सुमारे दीड वर्ष राहु आणि केतु अनुक्रमे कुंभ आणि सिंह राशीत विराजमान असणार आहेत. विशेष म्हणजे राहु आणि केतु एकमेकांपासून समसप्तक स्थानी असतात. एखाद्या व्यक्तीच्या राशीतील राहु आणि केतुचे स्थान तसेच अन्य ग्रहांशी असलेला संबंध यावरून परिणाम व प्रभाव होत असतात, असे सांगितले जाते.5 / 16राहु-केतुची वक्री दृष्टी पडल्यास संबंधित व्यक्तींचे अच्छे दिन संपुष्टात येतात, असे मानले जाते. मात्र, काही व्यक्तींच्या जन्मकुंडलीत विशिष्ट स्थानी राहु-केतु असतील, तर त्याचा अशुभ वा प्रतिकूल प्रभाव पडत नाही. उलटपक्षी, राहु-केतुची कृपादृष्टी होऊन शुभ परिणाम प्राप्त होतात. तसेच राहु-केतुच्या शुभ स्थानामुळे लाभाचे प्रमाण वाढते, असे सांगितले जाते. जन्मकुंडलीतील नेमक्या कोणत्या स्थानावरील राहु-केतु शुभ लाभदायक ठरतात? जाणून घेऊया...6 / 16एखाद्या व्यक्तींच्या जन्मकुंडलीत तिसऱ्या स्थानी राहु-केतु असेल, तर ते शुभ मानले जाते. कुंडलीतील तिसरे स्थान बळ आणि पराक्रमाचे मानले गेले आहे. आपल्या जन्मकुंडलीत तिसऱ्या स्थानी राहु-केतु असेल, तर अजिबात घाबरता कामा नये. उलट आनंद वाटायला हवा.7 / 16या स्थानी असलेले राहु-केतु बल आणि पराक्रमाच्या माध्यमातून जीवनातील ध्येयप्राप्त करण्यासाठी पाठबळ देतात. अशा व्यक्ती मल्ल, बॉडी बिल्डर क्षेत्रात भरपूर नाव, प्रसिद्धी मिळवतात. यातच करिअर करतात, असे सांगितले जाते. या स्थानी असलेले राहु-केतु व्यक्तीला स्वावलंबी, महत्त्वाकांक्षी तसेच दृढ संकल्प बनवतात, असे म्हटले जाते.8 / 16एखाद्या व्यक्तींच्या जन्मकुंडलीतील सहाव्या स्थानी राहु-केतु असतील, तर ते चांगले मानले जाते. कुंडलीतील सहावे स्थान शत्रूचे मानले गेले आहे. या स्थानी राहु-केतु विराजमान असेल, तर कितीही आणि काहीही झाले तर शत्रू आपले काहीच बिघडवू शकणार नाही, असे सांगितले जाते.9 / 16जन्मकुंडलीत सहाव्या स्थानी राहु-केतु असेल, तर अशा व्यक्ती ऊर्जेचा एकदम पूरेपूर आणि योग्य पद्धतीने वापर करून यश आणि प्रगती साध्य करतात. अशा व्यक्ती मोठे आणि महत्त्वाचे निर्णय क्षणार्धात घेतात. न्यायालयीन प्रकरणांमध्ये यांना बहुतांश वेळेस विजय प्राप्त होतो. मात्र, अशा व्यक्तींनी आर्थिक व्यवहार करताना नेहमीच सावधगिरी बाळगावी, असे सांगितले जाते.10 / 16ज्या व्यक्तींच्या जन्मकुंडलीतील दहाव्या स्थानी राहु-केतु विराजमान असतो, अशा व्यक्ती जीवनात भरपूर यश आणि प्रगती साध्य करतात, असे म्हटले जाते. अशा व्यक्ती राजकीय आणि सरकारी क्षेत्रात कार्यरत असल्यास यशाची उत्तुंग शिखरे सर करू शकतात, असे सांगितले जाते. अशा व्यक्तींमध्ये उत्तम नेतृत्व गुण असतात.11 / 16हाती घेतलेल्या बहुतांश कामात यांना यशप्राप्ती होते. अशा व्यक्ती अधिक प्रमाणात पैसे खर्च करत नाहीत. बचत करण्यात या व्यक्ती माहीर असतात. या व्यक्तींचा स्वभावच अनेक लाभ मिळवून देत असतो. अशा व्यक्ती कठोर मेहनत करतात आणि त्याचे फळ त्यांना निश्चित मिळते, असे सांगितले जाते.12 / 16एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत अकराव्या स्थानी राहु-केतु असेल, तर ते शुभ फलदायी मानले जाते. कुंडलीतील अकरावे स्थान व्ययाचे मानले गेले आहे. राहु-केतु या स्थानी विराजमान असले, तर या व्यक्तींचा अशा क्षेत्राशी संबंध येतो, जेथे पैसे दुपटीने परत मिळतात.13 / 16ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे गुंतवणुकीतून यांना भरघोस लाभ मिळतो. व्यापार, व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अशा व्यक्तींना उत्तम यश आणि लाभ मिळतो, असे सांगितले जाते.14 / 16ज्या व्यक्तींच्या कुंडलीत मेष, वृषभ आणि कर्क यात केतु असतो, त्यांना शुभ परिमाण मिळतात. उत्तम लाभ प्राप्त होऊ शकतात, असे मानले जाते. केतुच्या भक्कम पाठबळामुळे प्रत्येक कार्यात यांना यशप्राप्ती होते. वैवाहिक जीवन सुखमय होते, असे सांगितले जाते.15 / 16एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत केतु बाराव्या स्थानी असेल, तर अशा व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळते. आर्थिक स्थिती उत्तम राहते. अनेकदा आपल्याला कमी लेखणाच्या प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींशी आपला वारंवार सामना होत असतो, असे सांगितले जाते.16 / 16- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.