शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 15:23 IST

1 / 8
२०२५ वर्षातले हे शेवटचे पंचक आहे. वर्षअखेरीस काही अघटित घडू नये यासाठी काळजी घ्या. या कालावधीत शक्यतो दक्षिण दिशेला प्रवास टाळा, या पाच दिवसात सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा आणि स्वत:भोवती सकारात्मक ऊर्जेचे वलय तयार व्हावे म्हणून हनुमान चालिसाचे नियमित पठण करा. त्याबरोबरच पुढील ७ राशींनी दिलेल्या गोष्टींचे पालन करून सतर्क राहा.
2 / 8
मेष राशीच्या जातकांसाठी पंचक काळ मानसिक तणाव वाढवणारा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी विनाकारण वाद टाळावेत. या काळात निर्णय घेताना घाई करू नका, अन्यथा आर्थिक नुकसान सोसावे लागेल. आरोग्याबाबत विशेषतः डोकेदुखी किंवा डोळ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.
3 / 8
वृषभ राशीच्या व्यक्तींनी या काळात पैशांच्या व्यवहारात खूप जपून राहावे. कोणालाही मोठे कर्ज देऊ नका किंवा गुंतवणूक करू नका. कुटुंबात छोट्या कारणावरून मोठे वाद होण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान सामानाची आणि स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.
4 / 8
कर्क राशीच्या लोकांसाठी हे पंचक आरोग्याच्या दृष्टीने थोडे जड जाऊ शकते. जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठ तुमच्यावर नाराज होऊ शकतात, त्यामुळे आपले काम चोख ठेवा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून कोणाशीही वाद घालू नका.
5 / 8
कन्या राशीच्या जातकांनी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या कडू शब्दामुळे तुमचे जवळचे मित्र किंवा नातेवाईक दुखावले जाऊ शकतात. व्यवसायात नवीन प्रयोग करण्यासाठी हा काळ योग्य नाही. गुंतवणुकीचे निर्णय पुढे ढकलणे हितकारक ठरेल.
6 / 8
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या काळात कामाचा अतिरिक्त ताण जाणवेल. मेहनतीचे फळ उशिरा मिळाल्यामुळे चिडचिड होऊ शकते. वाहन चालवताना वेग मर्यादेत ठेवा. घरातील मोठ्या व्यक्तींच्या आरोग्याची चिंता सतावू शकते.
7 / 8
मकर राशीसाठी पंचक काळ आर्थिक ओढाताण निर्माण करू शकतो. अचानक उद्भवलेल्या खर्चामुळे तुमचे बजेट कोलमडू शकते. जोडीदारासोबत मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संयम ठेवा. कायदेशीर बाबींमध्ये अडकण्याची शक्यता असल्याने कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करा.
8 / 8
चंद्र तुमच्याच राशीत असताना पंचक संपणार असल्याने तुम्हाला मानसिक गोंधळ जाणवेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ टाळावा. स्वतःवरचा विश्वास डळमळीत होऊ देऊ नका. नकारात्मक विचार मनात आणण्यापेक्षा ध्यानधारणा किंवा योगासने केल्यास लाभ होईल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यWeekly Horoscopeसाप्ताहिक राशीभविष्य