शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२ राजयोग दुप्पट लाभ: ५ मूलांकांना सुखाचा काळ, उत्तम यश-प्रगती; नवीन नोकरीची संधी, शुभ घडेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 11:12 IST

1 / 12
Numerology: फेब्रुवारी महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला आहे. कुंभ राशीत त्रिग्रही योग जुळून येत आहे. कुंभ ही शनिची रास आहे. या राशीत शनि विराजमान आहे. स्वराशीत शनि विराजमान असल्यामुळे शश नामक राजयोग जुळून आलेला आहे. याच राशीत नवग्रहांचा राजा सूर्य आणि नवग्रहांचा राजकुमार बुध विराजमान झाले आहेत. बुध आणि सूर्य यांच्या युती योगाने बुधादित्य राजयोग जुळून आलेला आहे.
2 / 12
ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. राशींप्रमाणे मूलांकांना ग्रहांचे स्वामित्व बहाल करण्यात आले आहे. ग्रहांच्या गोचराचा जसा राशींवर प्रभाव पडत असतो, तसा तो मूलांकांवरही पडतो, असे सांगितले जाते.
3 / 12
पुढील काही दिवस हे दोन राजयोग असणार आहे. बुध ग्रहाने कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केल्यावर बुधादित्य राजयोगाची सांगता होणार आहे. तत्पूर्वी अनेक मूलाकांना हे दोन राजयोग वरदान काळाप्रमाणे ठरू शकतात, असे सांगितले जात आहे. तुमचा मूलांक कोणता तुम्हाला बुधादित्य राजयोगाचा काळ कसा ठरू शकेल? जाणून घ्या...
4 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकाल. व्यावसायिक प्रश्न सुटतील. योजना आणि वेळापत्रकात बदल होऊ शकतो, त्यासाठी तयार असावे. आदर आणि सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे. पैशांच्या बाबतीत वेळ थोडी कठीण असेल, खर्च वाढू शकतो. कामात प्रगती होईल. परंतु, सावधगिरी बाळगावी.
5 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. जे कराल त्यामुळे इतरांना खूप फरक पडेल. लक्ष दिल्यास कामे वेळेवर होतील. शांतपणे आणि संयमाने कार्यरत राहावे. मित्रांसोबत किंवा भावंडांसोबत काही वाद होऊ शकतात. त्यामुळे मानसिक चलबिचल होऊ शकेल. नशिबाची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी हुशारी यश मिळवून देऊ शकेल. गुंतवणुकीतून चांगला नफा होऊ शकेल. प्रियजनांसोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकता. कष्टाचे चीज होईल आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकेल.
6 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. रागावर नियंत्रण ठेवा. रागामुळे नातेसंबंधांना नुकसान पोहोचणार नाही, याचा विचार करा. काही वैयक्तिक समस्या उद्भवू शकतात. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आता ती वेळ नाही. नोकरीत पदोन्नती मिळेल. पैशाच्या बाबतीत फायदा होईल. गुंतवणुकीतून अधिक आर्थिक फायदा होईल. एखाद्याच्या सल्ल्याने नाते चांगले होऊ शकते. यश मिळेल.
7 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. अनेक बाबतीत काळजी घ्यावी लागेल. चुका होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत राहू शकेल. नवीन गुंतवणुकीतून नफा होऊ शकतो. कामात विचार करून निर्णय घ्यावा. यश मिळेल. मन शांत होईल. गुंतवणुकीतून नफा अपेक्षित आहे.
8 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. इतरांसाठी, विशेषतः जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसाठी गोष्टी योग्य करण्याच्या सर्वोत्तम मार्गांचा विचार कराल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. नवीन प्रकल्पातून यश मिळेल. हे प्रकल्प फायदेशीर ठरतील. पैशांची कमतरता भासू शकते. खर्च वाढू शकतो. विशेषतः तरुणांना जास्त खर्च करावा लागू शकेल. चांगली बातमी मिळू शकते.
9 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. भागीदारी करण्याचा विचार करा. पण विचार केल्यानंतरच करारावर स्वाक्षरी करा. अन्यथा काही समस्या निर्माण होऊ शकतात. कामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. कष्टाचे फळ मिळू शकेल. आनंददायी घटना घडू शकतील. खर्च वाढू शकतो, काळजी घ्यावी. संभाषणाद्वारे प्रकरणे सोडवण्याचा प्रयत्न करावा. याचे चांगले परिणाम मिळतील.
10 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. काळजी करू नका कारण योग्य वेळी सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतील. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने हा काळ आनंदी राहील. कामात हळूहळू प्रगती होईल. जास्त खर्च होईल. मन थोडे अस्वस्थ राहील.
11 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. विचार अधिक स्पष्ट होतील. इतरांशी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या जोडण्याची क्षमता सुधारेल. शांत वाटेल. प्रेम जीवन खास क्षणांनी भरलेले असेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. भविष्यासाठी योजना बनवू शकता. कामात काही आव्हाने येऊ शकतात; नुकसान शक्य आहे. मेहनतीचे चीज होईल. नशीब बाजूने असेल. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील.
12 / 12
ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. रागावर नियंत्रण ठेवा. धीर धरा. वाटाघाटी करण्यापूर्वी सल्लागारांशी आणि भागीदारांशी चर्चा करा. प्रयत्नांमध्ये अनुकूल परिणाम मिळू शकतील. धनलाभ होऊ शकतो. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. नोकरीत हळूहळू प्रगती होईल. पैसे मिळतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :numerologyसंख्याशास्त्रAstrologyफलज्योतिषspiritualअध्यात्मिक