Numerology: त्रिग्रही लक्ष्मी नारायण योग, ६ मूलांकांना दुपटीने लाभ; पद-पैसा-नफा, चांगला काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 21:20 IST
1 / 12Numerology: ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. राशींप्रमाणे मूलांकांना ग्रहांचे स्वामित्व बहाल करण्यात आले आहे. ग्रहांच्या गोचराचा जसा राशींवर प्रभाव पडत असतो, तसा तो मूलांकांवरही पडतो, असे सांगितले जाते.2 / 12२०२५ या वर्षाची काही दिवसांनी सांगता होणार आहे. डिसेंबर महिन्यात वृश्चिक राशीत त्रिग्रही योग जुळून आलेला आहे. तसेच बुध आणि शुक्र यांच्या युतीने लक्ष्मी नारायण योग जुळून आलेला आहे. बुधादित्य आणि शुक्रादित्य असे राजयोगही जुळून आलेले आहेत. याचा मूलांकांवरही प्रभाव पडू शकेल. मूलांक १ चे कौतुक होऊ शकाल. मूलांक २ ला यशाचा मार्ग सापडेल, मूलांक ३ ला संपत्तीत वाढ होऊ शकेल. 3 / 12मूलांक ४ ला बदल स्वीकारावे लागतील, मूलांक ५ चे निर्णय योग्य ठरू शकतील. मूलांक ६ भविष्यासाठी निर्णय घेऊ शकतील, मूलांक ७ ला काही चांगली बातमी मिळेल, मूलांक ८ साठी कठोर परिश्रमांचा काळ आहे. मूलांक ९ ला काळ अनुकूल ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. सविस्तर जाणून घेऊया...4 / 12ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. आत्मविश्वासाने आणि अधिकाराने पुढे जाल. निर्णयावर ठाम राहाल. कामाच्या ठिकाणी कामगिरीवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल. प्रशंसा आणि नवीन जबाबदारी मिळू शकतात. जुन्या समस्येचे निराकरण होऊ शकते. नातेसंबंधांमध्ये मोकळेपणाने संवाद साधता येईल. गैरसमज दूर होण्यास मदत होईल. आर्थिक परिस्थिती स्थिर राहील. थकवा आणि ताण टाळणे हिताचे राहू शकेल.5 / 12ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. संवेदनशीलता आणि निर्णय क्षमतेने परिस्थिती हाताळाल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. काही प्रसंगी मध्यस्थीची भूमिका बजावावी लागू शकते. कामाच्या ठिकाणी नवीन आयडिया सुचतील. परंतु, त्या अंमलात आणण्यात काही विलंब होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये संवादामुळे बंध मजबूत होतील. आर्थिक बाबी हळूहळू सुधारतील. मानसिक ताण तणावातून दिलासा मिळू शकेल.6 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. शिकणे, समजून घेणे आणि प्रगती करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. एखाद्या वरिष्ठ किंवा मार्गदर्शकाकडून मदत मिळू शकते. करिअरमध्ये प्रगती, नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नतीचे योग आहेत. एखाद्या मोठ्या प्रकल्पावर काम करत असाल, तर यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आनंदाची बातमी मिळू शकेल.7 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. नियोजन आणि कामाच्या शैलीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. अचानक होणारे बदल दैनंदिन दिनचर्येत व्यत्यय आणू शकतात. परंतु ते शेवटी फायदेशीर ठरतील. हाती घेतलेल्या कामांसाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. संयम राखणे आवश्यक आहे. नातेसंबंधांमधील जुने गैरसमज संपतील, अशी चिन्हे आहेत. गुंतवणूक करण्याचा मोह होऊ शकतो, परंतु सखोल संशोधनाशिवाय कोणतेही पाऊल उचलू नका. मानसिकदृष्ट्या थोडा ताण जाणवू शकतो.8 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. बैठका आणि नेटवर्किंगचा विशेष फायदा होऊ शकतो. संवाद कौशल्य काम पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. ज्या प्रकल्पांना विलंब होत होता त्यांना आता गती मिळेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ संतुलित राहील. काही किरकोळ नफा मिळू शकेल. निर्णय योग्य ठरण्याची शक्यता आहे. 9 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. नातेसंबंध, आकर्षण, कला आणि सौंदर्य यासाठी काळ अनुकूल राहू शकेल. कुटुंबात आणि प्रेम जीवनात गोडवा वाढेल. गैरसमज कमी होतील. कारकिर्दीत सर्जनशीलता स्पष्टपणे दिसून येईल. लोक कामाची प्रशंसा करतील. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. फायदे मिळू शकतात. घरगुती किंवा वैयक्तिक कामांमध्ये अधिक व्यस्त राहू शकाल. वातावरण सकारात्मक राहील.10 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. मानसिक शांतता लाभू शकेल. अध्यात्माकडे कल राहील. निर्णय घेण्यापूर्वी सखोल विचार कराल. कोणत्याही मोठ्या चुका टाळण्यात यश मिळू शकेल. कामात हळूहळू पण स्थिर प्रगती होईल. एखाद्या गोष्टीबद्दल स्पष्ट दिशा मिळू शकेल. आर्थिक परिस्थिती मिश्रित असेल. मिळकत आणि खर्च दोन्ही संतुलित असल्याचे दिसून येईल.11 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. संयम, कठोर परिश्रमाची आवश्यकता आहे. अनेक कामांना विलंब होऊ शकतो. हळूहळू परिस्थिती बाजूने येईल. करिअरबद्दल गंभीरपणे विचार कराल. त्यानुसार निर्णय घ्याल. नातेसंबंधांमध्ये जबाबदारी वाढेल. महत्त्वाच्या बाबींवर चर्चा होऊ शकते. आर्थिक खर्च जास्त असू शकतो. बजेटिंग महत्त्वाचे असेल. विश्रांती घेणे आवश्यक आहे.12 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. जलद गतीने कामे कराल. करिअरमध्ये प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होतील. एखादा मोठा निर्णय घेण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल आहे. नातेसंबंध बिघडू नयेत म्हणून रागावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. आर्थिक उलाढाली वाढू शकतील. प्रलंबित येणी मिळण्याची किंवा घेतलेल्या संधीचा फायदा होण्याची दाट शक्यता आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.