म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 12:15 IST
1 / 12Numerology: नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. घटस्थापना झाल्यानंतर आता पुढील नऊ दिवस देवीच्या विविध स्वरुपांचे पूजन, नामस्मरण करून आदिशक्तीचा उत्सव देशभरात साजरा केला जाईल. पूर्वी बहुतांश घरी घटस्थापना होत होती. आता त्याचबरोबर सार्वजनिक स्वरूपातही मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होऊ लागला आहे.2 / 12ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांचा राजा सूर्य आणि राजकुमार बुध तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. याचा प्रभाव देश-दुनियेसह सर्व राशी आणि मूलांकांवर होणार आहे. ज्योतिषशास्त्राची एक शाखा म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. नवग्रहांना मूलांकांचे स्वामित्व बहाल केलेले आहे.3 / 12देशातील उत्सवाचा काळ आणि एकूण ग्रहस्थिती पाहता कोणत्या मूलांकांना नवरात्रोत्सव आर्थिक आघाडी, नोकरी, व्यवसाय, कुटुंब, बिझनेस आदी क्षेत्रांवर अनुकूल ठरू शकेल, कोणत्या मूलांकांच्या व्यक्तींनी कोणती काळजी घ्यावी, ते जाणून घेऊया...4 / 12ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती होईल. झटपट निर्णय घेण्याच्या क्षमतेने समस्या सोडवू शकाल. आर्थिक बाबतीत वेळ कठीण जाईल. खर्चाचे प्रमाण वाढू शकेल. कुठेतरी बाहेर जाण्याची योजना आखू शकता. सरकारी क्षेत्राकडून लाभाची शुभ शक्यता असून विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. आयुष्यात हळूहळू बदल होतील.5 / 12ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. धनवृद्धीसाठी शुभ संधी मिळतील. वडिलधाऱ्यांच्या मदतीने अडकलेला पैसा परत मिळू शकेल. व्यावसायिकांना पैशाशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल. नोकरदारांनी संयम बाळगून कामे केल्यास यश मिळू शकेल. आईसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आईची मदत मोलाची ठरू शकेल. प्रियजनांच्या सहवासात आनंददायी वेळ घालवाल.6 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना खूप मेहनत करावी लागेल. नोकरदार कामाच्या ठिकाणी खूप व्यस्त राहतील. टीमवर्कने काम केल्यास चांगले परिणाम मिळतील. धावपळ करावी लागू शकते. आर्थिक लाभ होईल. गुंतवणुकीतून चांगला नफा होईल. कोणीतरी पुढे येऊन तुम्हाला मदत करेल.7 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. दुर्गा देवीच्या कृपेमुळे व्यावसायिक क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी मिळेल. नवरात्रीच्या निमित्ताने कुटुंबासमवेत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा बेत होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा. गुंतवणुकीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. एक नवीन सुरुवात जीवनात आनंद आणि समृद्धी आणेल.8 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. तब्येतीची काळजी घ्या. बोलताना सावध राहा. नोकरीच्या क्षेत्रात चांगली प्रगती होईल. कामे यशस्वी होतील. एखाद्या गोष्टीबद्दल द्विधा मनस्थितीत असाल. वैवाहिक जीवन चांगले राहील. जोडीदारासोबत भविष्याची योजना आखू शकता. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळा. कोणत्याही सरकारी क्षेत्रातून लाभ होण्याची शुभ शक्यता आहे.9 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. व्यवसायात नवीन डील मिळाल्याने चांगली गती येईल. नोकरी करणाऱ्या लोकांनी नोकरी बदलण्याचा प्रयत्न केल्यास चांगली ऑफर मिळू शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही गुंतवणुकीत झटपट निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते. तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. 10 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. नवीन काम मिळाल्याने मन प्रसन्न राहील. यशाचे मार्ग खुले होतील. शारदीय नवरात्रीमुळे कुटुंबात धार्मिक वातावरण असेल. बाहेरील खाण्याबाबत काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत चांगले निकाल मिळवू शकतात. वैवाहिक जीवन चांगले राहील. जीवनात अनेक बदल होतील.11 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. कामाच्या ठिकाणी हाती घेतलेले काम जीवनात आनंददायी परिणाम आणू शकतात. कोणत्याही दोन निर्णयांबाबत मनात शंका राहील. परस्पर प्रेम अधिक घट्ट होईल. प्रेम जीवन रोमँटिक राहील. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर अनुकूल काळ असेल. दुर्गा देवीचा आशीर्वाद मिळेल. अचानक आर्थिक लाभ होईल. कुटुंबातील सदस्यांमधील परस्पर प्रेम अधिक घट्ट होईल. मन प्रसन्न राहील.12 / 12ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. देवी दुर्गेच्या आशीर्वादाने नवीन जमीन किंवा वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होईल. नोकरदारांना काही समस्या येऊ शकतात. व्यावसायिकांसाठी अतिशय अनुकूल काळ असेल. ते व्यवसाय विस्तारासाठी योजना आखतील. कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आईकडून चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होऊ शकेल. भागीदारीत केलेले काम शुभ राहील. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.