शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Numerology: अंकज्योतिषानुसार 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तींवर सदैव राहते लक्ष्मी-कुबेराची कृपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 13:32 IST

1 / 6
ज्योतिषानुसार काही मूलांक असे आहेत, जे मजबूत नेतृत्व क्षमता, उत्तम भाग्य आणि आयुष्यात मोठ्या अडचणींवर सहज मात करण्याची क्षमता दर्शवतात. तसेच त्यांच्यावर लक्ष्मी आणि कुबेराची सदैव कृपादृष्टी राहते, अर्थात ते कोणत्याही प्रसंगावर मात करत आर्थिक दृष्ट्या सबळ राहतात. अंकशास्त्रानुसार ते भाग्यवान कोण आहे ते जाणून घेऊ.
2 / 6
मूलांक १ च्या लोकांमध्ये जन्मजात नेतृत्व क्षमता असते. ते आत्मविश्वासू, महत्त्वाकांक्षी आणि धाडसी असतात. त्यांचे नशीब नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहते. त्यांना आयुष्यात मान-सन्मान आणि उच्च पद प्राप्त होते. हे लोक कधीही दुसऱ्यांवर अवलंबून राहत नाहीत आणि त्यांच्या कामात ते नेहमी प्रामाणिक असतात. सरकारी क्षेत्रात किंवा प्रशासकीय पदांवर त्यांना मोठे यश मिळते. यांचे नशीब इतके चांगले असते की, ते कोणतेही काम हाती घेतल्यास त्यात यश मिळवतातच. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या ते सक्षम असतात.
3 / 6
मूलांक ३ चे लोक अत्यंत बुद्धिमान, ज्ञानी आणि सकारात्मक असतात. त्यांच्यावर गुरू ग्रहाचा प्रभाव असल्याने त्यांना भाग्य आणि समृद्धी मिळते. हे लोक अध्यात्मिक, धार्मिक आणि नैतिक मूल्यांचे पालन करणारे असतात. ते नेहमी इतरांना योग्य मार्गदर्शन करतात. त्यांना शिक्षण, अध्यापन, सल्लागार आणि धार्मिक कार्यांमध्ये मोठे यश मिळते. आयुष्यात त्यांना पैशाची कमतरता सहसा जाणवत नाही.
4 / 6
लांक ५ चे लोक तीक्ष्ण बुद्धीचे, व्यवसायी (Business Minded) आणि संवाद कुशल असतात. त्यांच्यात धोका पत्करण्याची क्षमता जास्त असते. हे लोक अत्यंत लवचिक (Flexible) आणि प्रत्येक परिस्थितीत जुळवून घेणारे असतात. व्यापारात आणि संपर्काशी संबंधित कामांमध्ये यांना मोठे यश आणि धनलाभ होतो.
5 / 6
मूलांक ९ चे लोक शूर, उत्साही आणि प्रचंड ऊर्जावान असतात. मंगळाच्या प्रभावामुळे त्यांच्यात कोणतेही आव्हान स्वीकारण्याची आणि त्यावर मात करण्याची ताकद असते. ते कोणालाही घाबरत नाहीत. हे लोक अत्यंत दृढनिश्चयी असतात. एकदा ठरवलेले ध्येय पूर्ण होईपर्यंत ते थांबत नाहीत. यांच्यात मानवता आणि समाजासाठी काहीतरी करण्याची भावना तीव्र असते. त्यांना पोलीस, सेना, डॉक्टरी किंवा बांधकाम क्षेत्रात मोठे यश मिळते. त्यांचे नशीब त्यांना लढून यश मिळवून देते.
6 / 6
अंक ज्योतिषानुसार हे मूलांक निश्चितच उत्तम भाग्य घेऊन येतात, पण कोणत्याही मूलांकाच्या व्यक्तीला आयुष्यात यश आणि मजबूत नशीब प्राप्त करण्यासाठी मेहनत, प्रामाणिकपणा आणि सतत प्रयत्न करणे महत्त्वाचे असते. आपले नशीब सुधारण्याची गुरुकिल्ली आपल्या प्रयत्नांमध्येच दडलेली आहे!
टॅग्स :numerologyसंख्याशास्त्र