शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 16:39 IST

1 / 7
परदेशात होऊन गेलेले ख्यातनाम ज्योतिष बाबा वेंगा अलीकडे चर्चेचा विषय झाले होते. कारण, त्यांची यापूर्वी केलेली भविष्यवाणी खरी झाली होती. ९/११ च्या हल्ल्यापासून ते रशिया-युक्रेन युद्धापर्यंत अनेक मोठ्या घटनांचे भाकीत केले होते. त्यातच त्यांनी २०२५ बद्दल इशारा देखील दिला आहे. सुदैवाने सध्या युद्ध परिस्थिती निवळल्याचे चित्र समोर येत आहे. अशातच आता नवीन भविष्यवाणी चर्चेत आहे.
2 / 7
नवीन भविष्यवाणीनुसार शनी देवाने सध्या मीन राशीत प्रवेश केला आहे. मात्र जेव्हा ते स्थलांतर करत करत जेव्हा कुंभ राशीत प्रवेश करतील तेव्हा तिसरे महायुद्ध अटळ असल्याचे भाकीत वर्तवले जात आहे. जे ६ वर्षं ६ महिने सुरु राहील.
3 / 7
शनीचा कुंभ राशीत प्रवेशाचा काळ पाहिला तर तो साधारण २०३६-३७ सालात असेल. या काळात चीन तेरा इस्लामी राष्ट्रांबरोबर महायुद्धाचे रणशिंग फुंकेल. त्यात भारताचाही समावेश असेल. मुख्य म्हणजे भारत हे महायुद्ध जिंकून विश्वगुरू बनेल असे म्हटले आहे.
4 / 7
या भविष्यवाणीनुसार या विश्वावर भारताची अधिसत्ता असेल आणि त्याचा राजा एक योगीपुरुष असेल. ती व्यक्ती आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करून विश्वाला शांततेचा संदेश देईल.
5 / 7
एवढेच नाही तर अमेरिकेचा एक भाग जलमय होईल, चीन अनेक तुकड्यांमध्ये विभागून जाईल, जगाच्या नकाशावर पाकिस्तान हे नाव उरणार नाही आणि भारताकडे एकहाती सत्ता येईल.
6 / 7
हे यश संपादन करण्यासाठी भारताला विष्णूंच्या दहाव्या रूपाचे अर्थात भगवान कल्की यांचे पाठबळ मिळेल आणि विश्वात समता, बंधुता, ममता प्रस्थापित होऊन पुन्हा एकदा सत्ययुगाची सुरुवात होईल.
7 / 7
सदर माहिती व्हायरल व्हिडीओच्या आधारे दिलेली असून लोकमत या माहितीला पुष्टी देत नाही.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषSocial Viralसोशल व्हायरलwarयुद्ध