शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

३१ जुलैला बुधचे तिसऱ्यांदा गोचर: सिंह प्रवेश ऑगस्टभर ‘या’ ५ राशींना देणार शुभ-लाभ; सुख-वृद्धी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 08:29 IST

1 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै महिना विशेष मानला गेला आहे. याचे कारण नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध या एकाच महिन्यात तीन वेळा राशीबदल करणार आहे. कर्क राशीत विराजमान असलेला बुध सूर्याचे स्वामित्व असलेल्या सिंह राशीत प्रवेश करत आहे. (mercury transit in leo 2022)
2 / 9
३१ जुलै रोजीपर्यंत बुध कर्क राशीत विराजमान असेल आणि त्यानंतर बुध पुढच्या सिंह राशीत प्रवेश करेल. २१ ऑगस्टपर्यंत बुध सिंह राशीत विराजमान असेल. त्यानंतर कन्या राशीत प्रवेश करेल. कन्या ही बुधचेच स्वामित्व असलेली रास आहे. (budh gochar in singh rashi 2022)
3 / 9
जुलै महिन्याच्या सुरुवातीला २ जुलै रोजी बुध वृषभ राशीतून मिथुन राशीत विराजमान झाला. यानंतर १६ जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश केला आणि आता ३१ जुलै रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे.
4 / 9
बुधचा सिंह प्रवेश महत्त्वाचा मानला जातो. बुध हा माल आणि व्यापार्‍यांचा रक्षक मानला जातो. बुध हा सर्वांत लहान ग्रह असला तरी तो सर्वांत प्रभावशाली मानला जातो. बुधच्या सिंह प्रवेशाचा नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळू शकेल? जाणून घेऊया...
5 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना सकारात्मक ठरेल. या कालावधीत उत्साहात वाढ होऊ शकेल. तुम्हाला मुलाकडून चांगली बातमी मिळू शकते. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी यश मिळवण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम कराल आणि तुमच्या प्रयत्नांचे कौतुकही होईल. या काळात तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. गैरसमज होते ते दूर होतील आणि समजूतदारपणाही वाढू शकेल.
6 / 9
सिंह राशीत होत असलेले बुधचा प्रवेश लाभदायक ठरू शकेल. आगामी काळ सिंह राशीच्या व्यक्तींसाठी उत्तम ठरू शकेल. तुमचे संवाद कौशल्य सुधारेल आणि तुम्ही लोकांचे मन वळवू शकाल. जर तुम्ही नवीन योजनेवर काम करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल. तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल, परंतु तुम्हाला तुमच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी लागेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल.
7 / 9
बुधचे स्वामित्व असलेल्या कन्या राशीसाठी बुधचा सिंह राशीतील प्रवेश फायदेशीर ठरू शकेल. विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेत चांगली वाढ होईल. कुटुंबाशी तुमचे संबंध खूप चांगले होऊ शकतील. तुमच्या मुलांसोबत चांगला वेळ घालवाल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी मिळेल. जे लोक स्वतःचा व्यवसाय करत आहेत, त्यांना ऑगस्ट महिन्यात चांगला नफा मिळेल.
8 / 9
गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीच्या व्यक्तींना बुधचा सिंह राशीतील प्रवेश अनुकूल ठरू शकेल. वैवाहिक जीवन सुखकारक होऊ शकेल. जोडीदाराशी नातेसंबंध सुधारू शकतील. दुसरीकडे, जे लोक अद्याप अविवाहित आहेत, त्यांच्यासाठीही चांगली स्थळे येण्याची शक्यता आहे. तुमचे ध्येय यशस्वीरित्या साध्य कराल. तुमच्या कामात काही अडथळे येऊ शकतात, पण तुम्ही मेहनत केली तर सर्व अडचणीतून सुटका मिळेल.
9 / 9
शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीच्या व्यक्तींना बुधचा सिंह राशीतील प्रवेश चांगला ठरू शकेल. नोकरदार कामाच्या ठिकाणी चांगले काम करतील. तुमच्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसाही होईल. तुमच्या पालकांच्या पाठिंब्याने, समाजात तुमचा सन्मान वाढेल आणि तुम्ही अनेक कामे पूर्ण करू शकाल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य