शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

बुधचे चलनबदल: ‘या’ ६ राशींना उत्तम काळ, नशिबाची पूर्ण साथ; करिअर, व्यापारात मोठा फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 07:25 IST

1 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, जानेवारी महिन्यात अनेक महत्त्वाचे स्थानबदल, चलनबदल, राशीपरिवर्तन होत आहेत. जानेवारी महिना ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. ग्रहांच्या गोचराचा, चलनबदलाचा राशींना वेगवेगळ्या पद्धतीने लाभ होऊ शकेल. काही राशींसाठी हा काळ सर्वोत्तम असेल, तर काही युती-योगांमुळे राशींना प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागेल.
2 / 9
शुक्रवार, १३ जानेवारी रोजी बुध धनु राशीत उदय होणार आहे. तसेच १८ जानेवारीला धनु राशीत मार्गी होईल. तर ७ फेब्रुवारीला धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी बुध हा बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, संवाद कौशल्य यांचा कारक मानला जातो.
3 / 9
बुध गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत उदय होणार आहे. बुधाच्या उदयाचा देश-दुनियेसह सर्व राशींवर प्रभाव दिसून येईल. बुधचा धनु राशीत होणारा उदय आणि त्यानंतरचे मार्गी चलन ६ राशींना अतिशय लाभदायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना बुधचा उदय लाभदायक ठरू शकेल. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा कालावधी तुमच्यासाठी फायदेशीर असेल. नोकरदारांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. आईसोबतचे नाते अधिक घट्ट होऊ शकेल. तसेच आईचा पूर्ण पाठिंबाही मिळू शकेल.
5 / 9
सिंह राशीच्या व्यक्तींना बुधचा उदय चिंतामुक्तीचा ठरू शकेल. सर्व आव्हानांना खंबीरपणे सामोरे जाल. परदेशी संस्थांमध्ये शिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी फायदेशीर सिद्ध होईल. मुलांशी तुमचे नाते चांगले राहील. कौटुंबिक जीवनही अनुकूल राहील. शेअर बाजाराशी संबंधित लोकांना चांगले फायदे मिळतील. आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होईल. वर्क फ्रॉम होम तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकेल.
6 / 9
तूळ राशीच्या व्यक्तींना बुधचा उदय अनुकूल ठरू शकतो. जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर चांगला फायदा होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. व्यवसायात चांगली वाढ होईल. अडकलेला पैसा मिळाल्याने मन प्रसन्न राहील. काही कामानिमित्त परदेशात जाण्याची संधीही मिळेल. कुटुंब आणि गुरु यांचे सहकार्य मिळेल. प्रगतीच्या अनेक संधी मिळतील.
7 / 9
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना बुधचा उदय सकारात्मक ठरू शकेल. हा काळ छान असणार आहे. जास्तीत जास्त नफा मिळविण्याच्या संधी मिळतील. भरपूर बचत करू शकाल. व्यवसाय वाढवायचा असेल तर नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमच्या कल्पनांचे कौतुक होईल. तुमच्या संवादाचा चांगला प्रभाव पडेल. कीर्ती आणि आदर वाढेल. मात्र, आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
8 / 9
धनु राशीत बुधचा उदय होत आहे आणि याच राशीत बुध मार्गी होणार आहे. या राशीच्या व्यक्तींसाठी हा कालावधी फायदेशीर ठरू शकेल. विविध क्षेत्रांमध्ये लाभ मिळतील. अनेक संधी उपलब्ध होतील. नफा मिळविण्याचे मार्गही उपलब्ध होतील. भागीदारीत व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. एकमेकांचा आदर करताना सहकार्याची भावना निर्माण होईल.
9 / 9
कुंभ राशीच्या व्यक्तींना बुधचा उदय चांगला ठरू शकेल. अनेक आर्थिक लाभ होतील. कामाच्या ठिकाणी प्रभाव वाढेल. करिअरची सुरुवात करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. मान-सन्मान वाढेल. नवीन व्यवसाय सुरू करू शकता. धार्मिक कार्यात रस राहील. दानधर्मावर खर्च होईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य