By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 15:03 IST
1 / 9नववर्ष २०२४ सुरू होण्यास अवघे काही दिवस राहिले आहेत. २०२३ ची सांगता होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आगामी काळ विशेष असणार आहे. याचे कारण म्हणजे २०२३ वर्ष संपता संपता ग्रहांचे होत असलेले गोचर काही राशींसाठी अतिशय लाभदायक आणि शुभ परिणाम देणारे ठरू शकणार आहे.2 / 9नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध धनु राशीत विराजमान असून, याच राशीत बुध वक्री होत आहे. तर, २८ डिसेंबर रोजी बुध वक्री चलनाने वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. नवग्रहांचा राजा सूर्य १६ डिसेंबर रोजी धनु राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे सूर्य आणि बुधाचा शुभ मानला गेलेला बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे. 3 / 9बुद्धी, ज्ञान, शिक्षण, तत्वज्ञान, अध्यात्मिक ज्ञान, धार्मिक अभ्यास आणि शिक्षण यांचा कारक बुध मानला गेला आहे. वक्री ग्रह आणखी मजबूत आणि शक्तिशाली होतो, अशी मान्यता आहे. बुधाचे गुरुची रास असलेल्या धनु राशीत वक्री होणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. तीन लकी राशींना बुधाचे वक्री चलन अतिशय फायदेशीर ठरू शकते, शुभ ठरू शकते, असे सांगितले जाते. 4 / 9मिथुन राशीच्या व्यक्तींना बुधाचे वक्री चलन सकारात्मक ठरू शकेल. आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. या काळात अभ्यासात अधिक रस असेल, ज्याचा नक्कीच फायदा होईल.5 / 9धनु राशीच्या व्यक्तींना बुधचे वक्री चलन अनुकूल ठरू शकेल. अभ्यासात जास्त रस असेल. बौद्धिक कार्यातून प्रतिष्ठा आणि सन्मान मिळेल. सरकारकडून मदत मिळू शकते. आरोग्याबाबत सावध राहावे लागेल. आदर मिळू शकेल. खर्चात कपात होईल. 6 / 9कुंभ राशीच्या व्यक्तींना बुधाचे वक्री चलन फायदेशीर ठरू शकेल. मानसिक शांतता मिळेल. मालमत्तेत गुंतवणूक केल्यास फायदेशीर ठरणार आहे. उत्पन्नाचे अधिक स्रोत निर्माण होऊ शकतात. कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात. 7 / 9बुधाचे वक्री चलन मेष, वृषभ, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, मकर आणि मीन राशीच्या व्यक्तींनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे. या आगामी काळात काही अडचणी येऊ शकतात. व्यावसायिक वेग मंदावेल. खर्चात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. 8 / 9सूर्यानंतर मंगळ धनु राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी धनु राशीत सूर्य, मंगळ आणि बुधाचा त्रिग्रही योग जुळून येणार आहे. गुरु ग्रह मेष राशीत वक्री आहे. ३१ डिसेंबर हा इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस असणार आहे. या दिवशी गुरु ग्रह मेष राशीत मार्गी होणार आहे. 9 / 9- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.