शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

बुध मार्गी: ६ राशींना लाभाचा काळ, उत्पन्न वाढेल; उधारी मिळेल, प्रमोशन-पगारवाढीचे शुभ योग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 14:03 IST

1 / 9
नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध मीन राशीत वक्री आहे. बुध आता मार्गी होत आहे. बुध मार्गी होणे सकारात्मक मानले जाते. मेष राशीत प्रवेश केलेला बुध काही दिवसांपूर्वी वक्री चलनाने मीन राशीत विराजमान झाला होाता. आता मार्गी झालेला बुध काही दिवसांनी पुन्हा मेष राशीत प्रवेश करेल.
2 / 9
मीन राशीत राहु विराजमान आहे. तसेच मंगळ ग्रहाने प्रवेश केला आहे. यामुळे बुध, मंगळ आणि राहु यांचा त्रिग्रही योग जुळून आला आहे. बुधाचे मार्गी चलन व्यापार, व्यवसाय, करिअर यासाठी लाभदायी मानले जाते.
3 / 9
मीन ही गुरुचे स्वामित्व असलेली रास असून बुध आणि गुरुचे समत्वाचे संबंध मानले जातात. त्यामुळे बुध मार्गी होण्याचा शुभ प्रभाव अनेक राशींवर पडू शकतो. सहा अशा राशी आहेत, ज्यांना बुधाच्या मार्गी चलनाने आगामी काळ फलदायी आणि उत्तम सकारात्मक, संधींचा ठरू शकतो, असे सांगतात. जाणून घेऊया...
4 / 9
वृषभ: उत्पन्नात वाढ होऊ शकेल. अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळण्याची शक्यता आहे. घर किंवा वाहन खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकेल. नवीन संधी शोधून काढल्यास परदेशात जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकेल. करिअरमध्ये चांगली कामगिरी करू शकाल. कुटुंबात आनंद आणि समृद्धी वाढेल. आत्मविश्वास वाढेल.
5 / 9
मिथुन: जीवनात भौतिक सुख आणि सुविधा वाढू शकतील. नोकरी आणि व्यवसायात अनेक संधी प्राप्त होऊ शकतील. त्या ओळखून त्यांचा पुरेपूर वापर करावा लागेल. करिअरशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. आर्थिक स्थितीही मजबूत असू शकेल. चांगले पैसे कमावू शकाल. बचत करू शकाल.
6 / 9
कर्क: बुधाचे मार्गी होणे लाभदायक ठरू शकते. नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. काम सहज पार पडेल. वाढत्या खर्चावर नियंत्रण राहील. लांबच्या प्रवासाची शक्यता आहे. चांगल्या संधी मिळू शकतात. परदेशात नोकरी मिळण्याची संधी निर्माण होऊ शकते.
7 / 9
कन्या: जीवनात वाढू शकेल. विरोधक मागे टाकून खूप पुढे जाल. व्यवसायात नवीन ऑर्डर मिळू शकतात. चांगली रक्कम कमावण्याची संधी मिळेल. प्रेम जीवनात नात्याची ताकद वाढू शकेल. फिटनेसवर लक्ष केंद्रित करू शकाल.
8 / 9
मकर: बुधचे मार्गी होणे सकारात्मक ठरू शकेल. व्यवसायात नफा होऊ शकेल. काही नवीन योजनांवर काम करण्याचा विचार करू शकता. खांद्यावर अनेक जबाबदाऱ्या असतील. त्या चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल. नोकरीत बढती किंवा वेतनवाढ मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये मोठी प्रगती होईल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढू शकतील.
9 / 9
कुंभ: बुधचे मार्गी होणे शुभ लाभदायक ठरू शकेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. खूप दिवसांपासून अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. काळ सकारात्मक असल्याचे म्हणता येऊ शकेल. चांगली कमाई करण्यासोबतच पैशाची बचत करू शकाल. उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य