1 / 15शुक्रवारी बुध आणि मंगळ राशी पालट करत आहेत. शुक्र मेषेत, रवी, बुध आणि हर्षल वृषभ राशीत असून, शुक्रवारी बुध मिथुन राशीत जाईल. तेथे त्याची गुरूशी युती होईल. मंगळ कर्क राशीत असून, शुक्रवारी तो सिंह राशीत जाईल. तेथे त्याची युती केतुशी होईल. प्लूटो मकर राशीत, तर राहु कुंभ राशीत आहे. शनि आणि नेपच्यून मीन राशीत आहेत. 2 / 15बुध मिथुन राशीत गोचर करणार आहे. तर मंगळ सूर्याचे स्वामित्व असलेल्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. मंगळ आणि केतुची होत असलेली युती काही प्रमाणात अशुभ मानली गेली आहे. तर बुध आणि गुरू हे दोन्ही ग्रह शुभ ग्रह मानले जात असून, याचा सकारात्मक प्रभाव पडू शकतो, असे म्हटले जात आहे. 3 / 15जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होत असलेले हे दोन्ही ग्रह गोचर महत्त्वाचे मानले गेले आहेत. तर याच दिवशी ज्येष्ठ महिन्याच्या शुद्ध पक्षातील निर्जला एकादशी आहे. ग्रहांचे गोचर आणि एकादशीचे व्रत यामुळे आगामी काळ काही राशींना अतिशय अनुकूल ठरू शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...4 / 15मेष: आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. व्यवसायात अत्यंत व्यस्त राहाल. कार्यकौशल्य उठून दिसेल. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ उत्तम आहे. त्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची संभावना आहे. आर्थिक बाबतीत लाभदायी कालावधी आहे. पूर्वी एखादी आर्थिक गुंतवणूक केली असेल, तर त्याचा फायदा मिळू शकेल. प्रेमिकेस आपल्या मनातील विचार सांगू शकाल. विद्यार्थी काही तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीने जीवनात प्रगती करू शकतील.5 / 15वृषभ: प्रकृती उत्तम राहील. असे असले तरी उन्हात जाणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे. व्यवसाय व कारकीर्दसाठी काळ अनुकुल आहे. इंटिरियर डेकोरेशन, फाईन आर्ट इत्यादी क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींसाठी कालावधी चांगला आहे. प्रेमिकेस विचार मोकळेपणाने सांगू शकता. आर्थिक बाबतीत यशस्वी होण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे पडतील किंवा यश प्राप्ती विलंबाने होईल.6 / 15मिथुन: आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासावरील लक्ष विचलित होऊ शकते. व्यापाऱ्यांनी विशेष लक्ष दिले तर त्यांचा व्यापार चांगला होईल. नोकरी करणाऱ्यांची इच्छापूर्ती होऊ शकते. कुटुंबियांशी आपल्या विवाहा संबंधी बोलणी करू शकाल. पूजा-पाठ करण्यात व्यस्त राहू शकता. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आजारपणामुळे खर्च करावा लागू शकतो.7 / 15कर्क: व्यावसायिक प्रगती करण्याची संधी मिळू शकते. व्यापारात भागीदाराच्या खांद्याला खांदा लावून कामे करू शकाल. विवाहितांना त्यांचे संबंध दृढ करण्यासाठी काही प्रयोग करावे लागतील. आर्थिक चढ-उतारांचा काळ आहे. काही दिवसांसाठी प्राप्तीत वाढ होण्याची संभावना आहे. मात्र नंतर खर्चात वाढ होऊ शकते. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनत वाढवावी लागेल.8 / 15सिंह: व्यापारासाठी कालावधी चांगला आहे. व्यापारी त्यांच्या व्यवसायात खूप मेहनत करतील. नोकरी करणारे कार्यालयात कामे खूप जोशात सुरू करतील. आर्थिक बाबतीत अधिक सावध राहावे लागेल, अन्यथा नुकसान होऊ शकते. विवाहितांना आपले संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जोडीदाराशी वाद होण्याची संभावना आहे.9 / 15कन्या: आहारावर नियंत्रण न ठेवल्यास आरोग्य विषयक काही त्रास होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांची कामगिरी चांगली झाल्याने त्यांना उन्नतीची संधी प्राप्त होऊ शकते. त्यांना वरिष्ठांसमोर मान खाली घालावी लागणार नाही. व्यापाऱ्यांना व्यावसायिक कारणांसाठी एखादा प्रवास करावा लागू शकतो. व्यापारात प्रगती करण्यासाठी अहंकार बाजूस करावा. विवाहित व्यक्ती त्यांच्या जोडीदारासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकतात. तिच्याशी संवाद साधून मन मोकळे करू शकतील.10 / 15तूळ: नोकरी करणाऱ्यांसाठी कालावधी चांगला आहे. नोकरीत प्रगती होऊ शकते. व्यापाऱ्यांनी भागीदाराशी समन्वय साधून काम केले तर आर्थिक उन्नती होऊ शकेल. विवाहित व्यक्ती रुसलेल्या जोडीदाराची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतील. पाहुण्यांची ये-जा झाल्याने खर्चात वाढ होऊ शकते. विद्यार्थी अभ्यासात प्रगती होण्यासाठी एखादी शिकवणी लावून घेऊ शकतात.11 / 15वृश्चिक: व्यापाऱ्यांनी भागीदाराशी उत्तम समन्वय साधला तर त्यांना व्यापारात मोठा फायदा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्ती सध्याच्या नोकरीस कंटाळले असल्यास दुसऱ्या नोकरीसाठी प्रयत्न करू शकतात. प्रेमीजनांचे संबंध दृढ होतील. काही वाद होण्याची संभावना आहे. विवाहितांना त्यांच्या जोडीदाराची खूप काळजी घ्यावी लागेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासास वेळ मिळावा म्हणून मित्रांपासून दूर राहावे लागेल.12 / 15धनु: विवाहित व्यक्तींचा जोडीदार त्यांच्यावर अत्यंत खुश झाल्याचे दिसून येईल. शेअर्स बाजारात गुंतवणूक करण्यास काळ प्रतिकूल आहे. व्यापाऱ्यांना चांगला लाभ होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. अन्यथा त्यांचे लक्ष विचलित होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना एखादी चांगली संधी मिळू शकते. कामगिरी चांगली होईल.13 / 15मकर: आर्थिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. विवाहित व्यक्ती त्यांच्या जोडीदाराच्या सहवासात सुखद क्षण घालवू शकतील. घरगुती गरजा पूर्ण करण्यासाठी भरपूर पैसा खर्च कराल. स्टेशनरी व मुलांचे सामान खरेदी करण्यासाठी पैसा खर्च होऊ शकतो. जुनी नोकरी सोडून नवीन नोकरी धरू इच्छित असणाऱ्यांसाठी काळ अनुकूल आहे. व्यापारी एखादा चुकीचा व्यावसायिक निर्णय घेण्याची शक्यता असल्याने त्यांनी कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा.14 / 15कुंभ: नोकरी करणाऱ्यांना अत्यंत सावध राहावे लागेल. कामे लक्षपूर्वक करावीत. वेळेत कामे न झाल्याने तणावास सामोरे जावे लागू शकते. व्यापाऱ्यांचा व्यापार चांगला होईल. आहारावर आपणास नियंत्रण ठेवावे लागेल. मसालेदार पदार्थ खाणे टाळावे. आर्थिक स्थिती चांगली राहील. उच्च शिक्षण घेणाऱ्यांची कामगिरी उत्तम होईल. प्रेमीजनांतील जवळीक वाढेल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराची उजळ बाजू समजल्याने त्यांच्या विषयी अभिमान वाटू लागेल.15 / 15मीन: ज्या व्यक्तींना नोकरी बदलावयाची आहे त्यांच्यासाठी काळ अनुकूल आहे. व्यापाऱ्यांना प्रगतीची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत राहील. एखादे घर खरेदी करावयाचे असेल तर त्यासाठी कालावधी प्रतिकूल आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी त्यांचे शिक्षक उभे राहतील. एखाद्या गोष्टीमुळे प्रेमीजनांत काही वाद होण्याची शक्यता आहे. मात्र दोघांनी सामंजस्य दाखविल्यास त्यांचे संबंध दृढ होऊ शकतात. जोडीदाराच्या नावाने एखादा व्यवसाय सुरू करू शकाल.