शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मंगळ गोचर: ७ राशींना अनुकूल, प्रतिष्ठा-कीर्तीत वाढ; पगारवाढीचे योग, गुंतवणुकीत लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 15:00 IST

1 / 10
नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह स्वराशीत म्हणजेच मेष राशीत विराजमान आहे. जुलै महिन्यात मंगळ ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. सुमारे १८ महिन्यांनी मंगळ वृषभ राशीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
2 / 10
मंगळ सुमारे ४६ दिवस वृषभ राशीत विराजमान असेल. मंगळ हा भूमी, शौर्याचा कारक मानला जातो. २६ ऑगस्टपर्यंत मंगळ वृषभ राशीत असेल. मंगळाचे होणारे राशीपरिवर्तन केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर प्रभावकारी मानले जाते.
3 / 10
मंगळाचे होणारे गोचर काही राशींना उत्तम मंगलमय ठरू शकेल. आर्थिक आघाडी, व्यवसाय, शिक्षण, नोकरी, करिअर, कुटुंब यांमध्ये शुभ लाभ मिळू शकतील, असे सांगितले जात आहे. कोणत्या आहेत त्या ७ राशी? जाणून घेऊया...
4 / 10
मेष: पैशांची बचत करण्यात यशस्वी होऊ शकाल. मान-सन्मान, प्रतिष्ठा आणि कीर्तीत चांगली वाढ होऊ शकेल. जोडीदारासोबतच्या नात्यात अधिक आनंद टिकवून ठेवण्यास सक्षम होऊ शकाल. संशोधन कार्यात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना चांगला नफा आणि प्रगती मिळू शकेल. इतर व्यवसायात गुंतवणूक करू शकतात.
5 / 10
वृषभ: व्यवसायात चांगला नफा मिळविण्यासाठी नवीन योजना आखाव्या लागतील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. सासरच्यांशी संबंध चांगले राहतील. प्रत्येक पावलावर त्यांची साथ मिळेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. एकमेकांच्या भावनांचा आदर कराल.
6 / 10
सिंह: नवीन व्यवसाय सुरू करू शकता. नोकरदारांना करिअरच्या प्रगतीसाठी सुवर्ण संधी मिळू शकतील. चांगले उत्पन्न असलेल्या अनेक कंपन्यांकडून ऑफर मिळतील. मालमत्ता आणि वाहने खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
7 / 10
कन्या: कामात नशिबाची साथ मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. नोकरदारांच्या पगारात वाढ आणि व्यावसायिकांना चांगले आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मंगळाच्या प्रभावामुळे नेतृत्व क्षमतेत वाढ होऊ शकेल. देश-विदेशात प्रवास करू शकता. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळू शकते.
8 / 10
तूळ: उत्पन्नाचे नवे स्रोत सापडू शकतील. आर्थिक स्थिती सुधारू शकेल. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरदारांच्या पगारात वाढ होऊ शकेल. व्यावसायिकांना चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील. प्रतिष्ठा आणि कीर्ती वाढू शकेल.
9 / 10
धनु: भावंडांचे सहकार्य मिळू शकेल. नोकरदारांना चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. बचत करण्यात यश मिळू शकेल. संयम, धैर्य यांत वाढ होऊ शकेल. निर्णय क्षमतेला फायदा होईल. व्यावसायिकांना चांगला नफा आणि प्रगती होण्याची शक्यता आहे.
10 / 10
कुंभ: भौतिक सुख मिळू शकेल. नोकरदारांना चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवीन पद प्राप्त करू शकाल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. सन्मान आणि प्रतिष्ठा लाभू शकेल. रिअल इस्टेट, प्रॉपर्टी संबंधित व्यवसाय आहे, त्यांना चांगला लाभ मिळू शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य