Mangal Gochar 2023: १३ जानेवारीपासून मंगळ होणार मार्गी, २ महिने मेष ते मीन राशींवर राहणार असा प्रभाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 13:25 IST
1 / 13१३ जानेवारीपासून मंगळ मार्गी होणार आहे. १३ जानेवारीला मंगळ वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. मंगळ ग्रह मार्गी होण्याचा कालावधी हा वृषभ राशीसह अनेक राशींसाठी शुभ फलदायी ठरणार आहे.2 / 13मेष - मंगळ मार्गी झाल्यानंतर मेष राशीच्या लोकांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांच्या समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकतात. तसंच कौटुंबीक आणि आर्थिक समस्याही कमी होण्याची शक्यता आहे. या कालावधीत खाण्यापिण्यावर अधिक लक्ष द्या. 3 / 13वृषभ - या राशीच्या लोकांसाठी हा कालावधी अतिशय शुभ ठरणार आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गासाठीही हा कालावधी शुभ ठरु शकतो. नवं काम हाती घेऊ शकता. विद्यार्थ्यांनाही अपेक्षित यश मिळू शकते. मेहनतीचं फळ या कालावधीत मिळू शकतं. 4 / 13मिथुन - हा कालावधी मिथुन राशीच्या लोकांना अनुकूल परिणाम देणार मानला जात आहे. व्यापारातील समस्या या कालावधीत काही प्रमाणात कमी होऊ शकतात. दरम्यान, आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कौटुंबीक जीवनात चढ उतार येण्याची शक्यता आहे. शांतपणे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.5 / 13कर्क - हा कालावधी तुमच्यासाठी शुभ फलदायी ठरू शकतो. आर्थिक स्थितीही सुधारू शकते आणि नोकरीत संधीही मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठीही हा कालावधी अनुकूल ठरेल. आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. पुढील महिना शुभ ठरण्याची शक्यता आहे. 6 / 13सिंह - हा कालावधी तुमची संकंट दूर करणारा ठरू शकतो. तुम्हाला नव्या नोकरीची किंवा व्यापाराची संधी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणीही संबंध सुधारतील. कुटुंबातही आनंदाचं वातावरण राहिल. 7 / 13कन्या - मंगळ मार्गी होत असल्यानं तुमच्या जीवनात आनंदी वातावारण निर्माण होईल. कुटुंबात किंवा कामाच्या ठिकाणी काही समस्या असतील तर त्या कमी होऊ शकतात. आर्थिक स्थितीही सुधारू शकते. तुम्हाला कामात भावंडांचीही मदत मिळेल.8 / 13तूळ - हा कालावधीत तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. आर्थिक आणि आरोग्यासंबंधीच्या समस्या कमी होऊ शकतात. कार्यक्षेत्रातही संबंध सुधारतील. आर्थिक व्यवहार जपून करा. या कालावधीत आवश्यकता नसल्यास दूरचा प्रवास टाळलेला बरा.9 / 13वृश्चिक - या कालावधीत वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या कमी होऊ शकतात. तसंच कामकाजाच्या ठिकाणीही उत्तम परिणाम दिसण्याची शक्यता आहे. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करण्याच्या विचारात असाल तर हा कालावधी उत्तम ठरू शकतो. या कालावधीत शांततेनं निर्णय घ्या.10 / 13धनु - धनु राशीसाठी या कालावधी शुभ ठरु शकतो. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या कमी होण्याची शक्यता आहे. तसंच कायदेशीर प्रकरणांतरही निर्णय तुमच्या बाजून येऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीनंही हा कालावधी उत्तम आहे. विद्यार्थ्यांनाही या कालावधीत यश मिळेल. तसंच दूरचा प्रवास होऊ शकतो.11 / 13मकर - मंगळ मार्गी होणं हे मकर राशीसाठी चांगला संकेत मानला जातोय. या कालावधीत संघर्ष कमी होण्याची शक्यता आहे. तसंच ही वेळ तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते. कुटुंबातही मधूर संबंध प्रस्थापित होतील. तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. 12 / 13कुंभ - या कालावधीत कुंभ राशीच्या लोकांच्या समस्या कमी होऊ शकतात. तसंच कामकाजाच्या ठिकाणीही नवी संधी मिळू शकतील. तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. 13 / 13मीन - मीन राशीच्या लोकांना या कालावधीत संमिश्र परिणाम दिसून येऊ शकतात. काही प्रमाणात लाभ होऊ शकतो, पण दुसरीकडे समस्या वाढू शकतात. जुन्या आजारातून थोडा दिलासा मिळू शकतो. धार्मिक कार्यांकडे कल वाढण्याची शक्यता आहे.