शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मंगळ-केतु कुजकेतु योग: ६ राशींना अच्छे दिन, मंगलच होणार; वेळोवेळी धनलाभ, लक्ष्मी कृपा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 13:53 IST

1 / 9
मे महिना हळूहळू सांगतेकडे जात आहे. याच महिन्यात गुरु आणि सूर्याच्या राशी परिवर्तनानंतर राहु-केतु यांचे गोचर होत आहे. हे दोन्ही ग्रह क्रूर आणि मायावी मानले जातात. या ग्रहांचे गोचर राशींसह देश-दुनियेवर प्रभावकारी मानले जाते. एका राशीत सुमारे १८ महिने राहु-केतु विराजमान असतात.
2 / 9
राहु आणि केतु अनुक्रमे कुंभ आणि सिंह राशीत प्रवेश करत आहेत. ७ जून २०२५ रोजी नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ सिंह राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे मंगळ आणि केतु यांचा कुजकेतु योग जुळून येणार आहे. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. मंगळ सिंह राशीत असेपर्यंत हा योग कायम राहणार आहे.
3 / 9
या योगाच्या कालावधीत काही लोकांचे नशीब चमकू शकते. अचानक आर्थिक लाभ आणि भाग्योदय होण्याची शक्यता आहे. तर, काहींना उत्पन्नात वाढ आणि नोकरीत पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 9
मेष: मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. या काळात अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
5 / 9
मिथुन: साहस आणि पराक्रमात वाढ होऊ शकेल. धैर्य आणि शौर्य वाढेल. भावंडांकडूनही सहकार्य मिळेल. काम किंवा व्यवसाय परदेशांशी जोडलेले असेल तर चांगला नफा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. कामाचे कौतुक होईल. पदोन्नती किंवा नवीन संधी मिळू शकतात.
6 / 9
कर्क: सकारात्मकता येऊ शकते. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. कामाचे कौतुक होईल. पदोन्नती किंवा नवीन संधी मिळू शकतात. व्यावसायिकांना कर्जाचे पैसे मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारू शकेल. लोक प्रभावित होतील.
7 / 9
सिंह: आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. प्रलंबित रक्कम, अडकलेली येणी मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. व्यवसाय किंवा गुंतवणुकीत गुंतलेल्या लोकांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. आदर मिळू शकेल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन अद्भुत असेल.
8 / 9
तूळ: उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या बाबतीत फायदेशीर ठरू शकते. आर्थिक दृष्टिकोनातून, हा काळ नवीन संधींनी भरलेला असू शकतो. उत्पन्नात स्थिर वाढ होण्याची शक्यता आहे. पूर्वी घेतलेले निर्णय आता फायदे देऊ लागतील. एक सन्माननीय स्थान मिळेल. गुंतवणुकीतून नफा होईल. तसेच या काळात शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकेल.
9 / 9
वृश्चिक: भाग्याची साथ मिळेल. कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. करिअरशी संबंधित नवीन योजना राबवू शकाल. एक नवीन प्रकल्प किंवा भागीदारी सुरू होऊ शकते. ती भविष्यात फलदायी ठरेल. धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य