By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 11:05 IST
1 / 15Mahashivratri 2025: महाशिवरात्रीला शिवतत्त्व सर्वाधिक प्रमाणात पृथ्वीवर असते. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व कैक पटीने वाढते, असे मानतात. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीला सर्वांत महत्त्वाचा मानला गेलेला निशीथकाल २६ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजून २७ मिनिटांपासून ते ०१ वाजून १६ मिनिटांपर्यंत असेल. 2 / 15महादेव शिवशंकर यांच्या प्रतिकांपैकी एक असलेले रुद्राक्ष अतिशय पवित्र, शुभ-लाभदायक, पुण्य फलदायी मानले जाते. भारतीय परंपरांमध्ये रुद्राक्षाचे विशेष महत्त्व आहे. रुद्राक्षाची उत्पत्ती भोलेनाथांच्या अश्रूंपासून झाली, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. प्रत्येक रुद्राक्षात भगवान शिव वास करतात, असे म्हटले जाते. महाशिवरात्री व्रताचा दिवस हा रुद्राक्ष धारण करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो.3 / 15महाशिवरात्रीला अनेक जण आवर्जून रुद्राक्ष धारण करतात किंवा रुद्राक्ष माळ गळ्यात घालतात. रुद्राक्ष धारण करण्याचे काही नियम सांगितले जातात. शास्त्रशुद्ध पद्धतीनेच रुद्राक्ष किंवा रुद्राक्ष माळ धारण करावी, असे सांगितले जाते. राशीनुसार रुद्राक्ष धारण केल्यास त्याचे लाभ वाढू शकतात, असे सांगितले जाते. असे असले तरी तज्ज्ञांच्या योग्य सल्ल्यानंतरच रुद्राक्ष धारण करावा. जाणून घेऊया...4 / 15मेष: या राशीचा स्वामी मंगळ आहे. मेष राशीच्या व्यक्तींनी तीन मुखी रुद्राक्ष धारण करावे, असे सांगितले जाते. महादेवांच्या शुभाशिर्वादासह विविध प्रकारचे फायदे होऊ शकतात, असे म्हटले जाते.5 / 15वृषभ: या राशीचा स्वामी शुक्र आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींनी सहा मुखी रुद्राक्ष धारण करावा. भाग्यवृद्धी होऊन समस्या, अडचणी दूर होऊ शकतात, असे सांगितले जाते.6 / 15मिथुन: या राशीचा स्वामी बुध आहे. मिथुन राशीच्या व्यक्तींनी चार मुखी रुद्राक्ष धारण करावे. यश-प्रगती होऊन समस्या दूर होण्यासाठी किंवा त्यातून मार्ग मिळण्यासाठी लाभदायक ठरू शकतो, असे म्हटले जाते.7 / 15कर्क: या राशीचा स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या व्यक्तींनी दोन मुखी रुद्राक्ष धारण करावा. भाग्योदय होण्याबरोबरच कुंडलीत चंद्राची स्थिती मजबूत होऊ शकते, असे मानले जाते.8 / 15सिंह: या राशीचा स्वामी सूर्य आहे. सिंह राशीच्या व्यक्तींनी बारा मुखी रुद्राक्ष धारण करावा. आव्हानांचा सामना करण्याचे बळ मिळू शकते. सूर्याची कुंडलीतील स्थिती मजबूत होऊ शकते, असे सांगितले जाते.9 / 15कन्या: या राशीचा स्वामी बुध आहे. कन्या राशीच्या व्यक्तींनी चार मुखी रुद्राक्ष धारण करावे. कामे सुलभतेने पार पडावीत, यश-प्रगती व्हावी, यासाठी फलदायी ठरू शकतो, असे म्हटले जाते.10 / 15तूळ: या राशीचा स्वामी शुक्र आहे. तूळ राशीच्या व्यक्तींनी सहा मुखी रुद्राक्ष धारण करावा. कामातील अडचणी, समस्या दूर होऊ शकतात. प्रलंबित कामे मार्गी लागू शकतात, असे सांगितले जाते.11 / 15वृश्चिक: या राशीचा स्वामी मंगळ आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी तीन मुखी रुद्राक्ष धारण करावे. महादेवांच्या शुभाशिर्वादासह धन-धान्य-वैभव लाभू शकते. कुंडलीतील मंगळ ग्रहाची स्थिती मजबूत होऊ शकते, असे म्हटले जाते.12 / 15धनु: या राशीचा स्वामी गुरु आहे. धनु राशीच्या व्यक्तींनी पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश-प्रगती साध्य करता येऊ शकते. कुंडलीतील गुरु ग्रहाची स्थिती मजबूत करता येऊ शकते, असे मानले जाते.13 / 15मकर: या राशीचा स्वामी शनी आहे. महादेव शनि देवाचे आराध्य आहेत. मकर राशीच्या व्यक्तींनी सात मुखी रुद्राक्ष धारण करावा. यशाचा मार्ग प्रशस्त होऊ शकतो. महादेव आणि शनिचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात. शनिची कुंडलीतील स्थिती मजबूत होऊ शकते, अशी मान्यता आहे.14 / 15कुंभ: या राशीचा स्वामी शनी आहे. महादेव शनिचे आराध्य आहेत. कुंभ राशीच्या व्यक्तींनी सात मुखी रुद्राक्ष धारण करावा. समस्या, अडचणी दूर होऊ शकतात. महादेवांसह शनीचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात. शनीची कुंडलीतील स्थिती मजबूत होऊ शकते, असे सांगितले जाते.15 / 15मीन: या राशीचा स्वामी गुरु आहे. मीन राशीच्या व्यक्तींनी महाशिवरात्रीला पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा. रुद्राक्षाचे आरोग्यदायी फायदे मिळू शकतात. कुंडलीतील गुरु ग्रहाची स्थिती मजबूत करता येऊ शकते, असे मानले जाते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.