शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 08:54 IST

1 / 11
नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह स्वराशीत म्हणजेच वृश्चिक राशीत विराजमान झालेला आहे. त्यामुळे रुचक नामक राजयोग जुळून आलेला आहे. तसेच काही दिवसांनी याच राशीत चंद्र प्रवेश करणार आहे. मंगळ चंद्राच्या युतीने महालक्ष्मी राजयोग जुळून येणार आहे.
2 / 11
नोव्हेंबर महिन्यात नवग्रहांचा राजा सूर्य आणि शुक्र तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शुक्रादित्य, मंगल आदित्य नामक राजयोग जुळून येणार आहेत. यासह तूळ राशीत त्रिग्रही योग जुळून येईल. तसेच कर्क राशीतील गुरु ग्रह हंस महापुरुष राजयोग निर्माण करत आहे.
3 / 11
याशिवाय, नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनि ग्रह मीन राशीत मार्गी होत आहे. या सर्व राजयोग आणि ग्रहमानाचा काही राशींना सर्वोत्तम लाभ, सुवर्ण संधी आणि सर्वोत्कृष्ट परिणाम प्राप्त होऊ शकतील, असे सांगितले जात आहे. तुमची रास आहे का यात? जाणून घेऊया...
4 / 11
वृषभ: महालक्ष्मीसह अन्य राजयोग चांगले ठरू शकतात. धैर्य वाढेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. अनेक क्षेत्रात यशस्वी होण्यास भाग्याची भक्कम साथ लाभू शकेल. माध्यमे, लेखन, संवाद आणि प्रवास याद्वारे लक्षणीय नफा मिळवू शकता. धार्मिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. उत्पन्न वाढू शकते. मित्रांकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकतो.
5 / 11
मिथुन: राजयोगांसह शनि मार्गी होणे सकारात्मक ठरू शकेल. हा काळ कामात आणि व्यवसायात लक्षणीय प्रगती आणू शकतो. व्यावसायिक त्यांच्या निर्णयांवर समाधानी असतील. प्रत्येक आव्हानाला दृढनिश्चयाने तोंड देतील. व्यावसायिक जीवनात स्थिरता आणि प्रगती होऊ शकेल. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक उत्तम काळ असेल. कंपन्यांमध्ये उच्च पदांवर असलेल्यांना नेतृत्वाच्या नवीन संधी मिळू शकतात.
6 / 11
कन्या: महालक्ष्मीसह अन्य राजयोग लाभदायक ठरू शकतात. महालक्ष्मी राजयोगाच्या निर्मितीमुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. उत्पन्नात झपाट्याने वाढ होईल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. बोलण्यावर थोडा संयम ठेवा, अन्यथा गोष्टी चुकीच्या होऊ शकतात.
7 / 11
तूळ: त्रिग्रही राजयोगांसह शनि मार्गी होणे अनुकूल सिद्ध होऊ शकेल. एखाद्या महत्त्वाच्या कामात यश मिळू शकेल. शत्रूंवरही विजय मिळवू शकाल. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. मुलांबद्दलही चांगली बातमी मिळू शकते. दीर्घकालीन समस्या, अडचणी यातून दिलासा मिळू शकेल.
8 / 11
वृश्चिक: राजयोगांचा लाभ होईल. धैर्य आणि शौर्य वाढेल. आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. नवीन नोकरी, वाहन किंवा मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. नवीन आकांक्षा निर्माण होतील. आयुष्यात स्थिरता आणि आदर वाढेल. जुन्या गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध निर्माण होतील. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
9 / 11
मकर: राजयोग लाभप्रद ठरू शकतील. या काळात उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, पैशाचा ओघ वाढण्याची आणि संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल. रखडलेला व्यवहार अचानक पूर्ण होऊ शकतो. गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.
10 / 11
मीन: राजयोगांचे उत्तम फल मिळू शकेल. लाभदायक काळ राहू शकेल. नशिबाची, भाग्याची भक्कम साथ लाभेल. अडकलेले सरकारी काम पूर्ण होऊ शकते. घरी किंवा कुटुंबात धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम घडू शकतात. कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल. नवीन संधी निर्माण होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल.
11 / 11
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिक