२०० वर्षांनी प्रतिकूल योग! ‘या’ ३ राशींनी चंद्रग्रहणाला असावे सावध, सतर्क; नेमके काय करु नये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 13:20 IST
1 / 9नोव्हेंबर महिन्यात अनेक सांस्कृतिक सण, व्रत-वैकल्ये साजरी केली जाणार आहेत. यातच कार्तिक पौर्णिमेला चंद्रग्रहण होणार असून, ते खग्रास पद्धतीने भारतात दिसणार आहे. ऐन दिवाळीत सूर्यग्रहण झाले होते. आता तुळशी विवाहाला चंद्रग्रहण होत आहे. (lunar eclipse november 2022)2 / 9कार्तिक पौर्णिमेला होणारे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. चंद्रग्रहणाची सुरुवात म्हणजेच ग्रहणस्पर्श भारतात दिसणार नाही, तर चंद्रग्रहणाचा मोक्ष दिसेल. हे चंद्रग्रहण मेष राशीत होणार आहे. ग्रहणस्पर्श दुपारी ०२ वाजून ३९ मिनिटे, ग्रहण मध्य दुपारी ४ वाजून ३० मिनिटे आणि मोक्ष सांयकाळी ६ वाजून १९ मिनिटे आहे. (chandra grahan november 2022)3 / 9सन २०२२ वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण ८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण ग्रस्तोदय रूपात संपूर्ण भारतात दिसेल. त्याचबरोबर या चंद्रग्रहणामध्ये २०० वर्षांनंतर दोन प्रतिकूल योगही तयार होत आहेत. या योगामुळे काही राशीच्या व्यक्तींना हा काळ समस्याकारक, अडचणींचा ठरू शकतो. 4 / 9दुसरीकडे ज्योतिषशास्त्रानुसार १५ दिवसांत दोन ग्रहण लागणे, फारसे शुभ मानले जात नाही. ज्योतिष शास्त्रानुसार शनि आणि मंगळ समोरासमोर असल्यामुळे षडाष्टक योग, नीचभंग अशुभ योग तयार होत आहेत. त्याचबरोबर हा योग मेष आणि भरणी नक्षत्रात असेल. 5 / 9जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. आताच्या घडीला मेष राशीत राहु विराजमान आहे. या चंद्रग्रहणाला प्रतिकूल प्रभाव कोणत्या राशीच्या व्यक्तींवर पडू शकेल. कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी? ते जाणून घेऊया...6 / 9मेष राशीच्या व्यक्तींना चंद्रग्रहण संमिश्र ठरू शकेल. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण याच राशीत होणार आहे. या काळात तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कार्यालय, कार्यक्षेत्रातील वरिष्ठ किंवा इतर कोणाशीही तुमचा वाद होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होऊ शकतात. याशिवाय तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ योग्य नाही. भागीदारीच्या कामात काही नुकसान होऊ शकते.7 / 9तूळ राशीच्या व्यक्तींना हे चंद्रग्रहण संमिश्र ठरू शकते. तूळ राशीत केतु विराजमान आहे. आगामी काळात काही गोष्टी त्रासदायक ठरू शकतात. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. नोकरीत विविध अडथळे येऊ शकतात. व्यावसायिकांसाठी खूप आव्हानात्मक काळ ठरू शकतो. वाहने जपून चालवण्याचा सल्ला दिला जात आहे. 8 / 9धनु राशीच्या व्यक्तींसाठी हे चंद्रग्रहण संमिश्र ठरू शकते. तुम्हाला कुठलीतरी भीती सतावू शकते. कामाच्या ठिकाणी किंवा वैयक्तिक जीवनात एखाद्या गोष्टीबद्दल तणाव असू शकतो. जुने दुखणे उफाळून येऊ शकते. व्यवसायातील कोणताही मोठा करार अंतिम होईपर्यंत थांबू शकता. शनी साडेसातीचा प्रभावही धनु राशीवर सध्या सुरू आहे.9 / 9कार्तिकी एकादशी, तुळशी विवाह, देव दिवाळीसह अनेक सण उत्सव नोव्हेंबर महिन्यात साजरे केले जाणार असून, याच महिन्यात नवग्रहांपैकी ५ महत्त्वाचे ग्रह चलनबदल करणार आहेत. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात संबंधित तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.