शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

७ राशींवर कायम लक्ष्मी-कुबेर कृपा, पैसे कमीच पडत नाही; शुभ तेच घडते, तुमची रास आहे का यात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 13:52 IST

1 / 12
Lakshmi Devi And Kuber Favorite Rashi: सांस्कृतिक, धार्मिक यांसह नैसर्गिक आणि शास्त्रीय दृष्ट्‍याही भारतीय सणांचे महत्त्व अनन्य साधारण असेच आहे. लक्ष्मी हे सौंदर्याचे, प्रेमाचे व वैभवाचे प्रतीक आहे. लक्ष्मी ही संपत्तीची अधिष्ठात्री देवता. लक्ष्मी मनाच्या इच्छा पूर्ण करते. वैकुंठातील या लक्ष्मीस महालक्ष्मी अशी संज्ञा होती. या महालक्ष्मीने योगद्वारा नाना रूपे धारण केली.
2 / 12
शुक्रवार हा देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी विशेषतः शुभ मानला जातो. या दिवशी भक्त लक्ष्मीची पूजा करतात, उपवास करतात. घरात धन आणि समृद्धीची प्रार्थना करतात. असे मानले जाते की, जे लोक मनापासून देवी लक्ष्मीची पूजा करतात, त्यांच्यावर धनाचा वर्षाव होतो. त्यांना कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही, असे म्हटले जाते.
3 / 12
ज्योतिषशास्त्रानुसार, अशा काही राशी आहेत, ज्यांच्यावर लक्ष्मी देवी आणि कुबेर देवतेचे सदैव, कायम, कृपाशिर्वाद प्राप्त होतात, असे म्हटले जाते. काही राशींचे लोक त्यांच्या गुणांमुळे देवी लक्ष्मीच्या विशेष आशीर्वादास पात्र बनतात. त्यामुळे त्यांना जीवनात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही, असे म्हटले जाते. तुमची रास आहे का यात? जाणून घेऊया...
4 / 12
वृषभ: वृषभ राशीचे लोक देवी लक्ष्मीचे सर्वांत प्रिय मानले जातात. या राशीचा स्वामी शुक्र आहे, जो स्वतः संपत्ती आणि समृद्धीचा कारक आहे. हे लोक खूप मेहनती, व्यावहारिक असतात. ते कठोर परिश्रमाने सर्वत्र यश मिळवतात. व्यवसाय असो वा नोकरी, त्यांना नेहमीच फायदा होतो. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांच्या आयुष्यात पैशाची कमतरता नसते. कुटुंबासह सुख-सोयींनी भरलेले जीवन जगतात. वृषभ राशीच्या लोकांवर कुबेर देवाचा आशीर्वाद कायम राहतो. संपत्ती, समृद्धता मिळते.
5 / 12
कर्क: या राशीचा स्वामी चंद्र देव आहे. कर्क राशीच्या व्यक्ती मनमिळावू असतात. त्या लवकर लोकांमध्ये मिसळतात. कर्क राशीचे लोक कठोर परिश्रम करण्यास तयार असतात. लवकर पराभव स्वीकारत नाही. एखाद्या गोष्टीत यश मिळाले नाही, तर ते त्या गोष्टीच्या मागे लागतात आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. कर्क राशीच्या लोकांवर कुबेर देवाचा आशीर्वाद सदैव राहतो, असे मानले जाते. जीवनात चांगले स्थान प्राप्त करतात. आयुष्यात येणारी प्रत्येक लहान-मोठी संधी सोडत नाहीत, ज्यामुळे त्यांना भरपूर ज्ञान मिळते, असे म्हटले जाते.
6 / 12
सिंह: नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे. या राशीच्या लोकांमध्ये नेतृत्व, आत्मविश्वास आणि धैर्य असते. सिंह राशीचे लोक अतिशय आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. ते त्यांच्या निर्णयांमध्ये दृढ असतात. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे ते नेहमीच आर्थिक स्थैर्य, समाधान अनुभवतात. या व्यक्ती स्वतःहून यशाच्या शिखरावर पोहोचतात. लक्ष्मी कृपेमुळे या लोकांना कधीही पैसांची कमतरता भासत नाही.
7 / 12
कन्या: या राशीचा स्वामी बुध आहे. कन्या राशीचे लोक खूप व्यावहारिक, प्रामाणिक, निष्ठावान असतात. ते कठोर परिश्रमाला घाबरत नाहीत. ते त्यांच्या कारकिर्दीत लवकर मोठी उंची गाठतात. ते नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असतात. या स्वभावामुळे त्यांना देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद मिळतात. ते आर्थिक लाभ मिळविण्यात यशस्वी होतात.
8 / 12
तूळ: या राशीचा स्वामी शुक्र आहे. भौतिक सुखसोयींची कमतरता नसते. साधे जीवन जगण्यापेक्षा विलासी जीवन जगणे पसंत करतात. खूप मेहनत करतात. कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे देवी लक्ष्मी नेहमीच त्यांच्यावर प्रसन्न असते. या राशीच्या लोकांमध्ये संघर्ष हाताळण्याची कला असते. त्यांना त्यातून कसे बाहेर पडायचे हे माहिती असते. कुबेराच्या कृपेने या राशीच्या लोकांना पैशांशी संबंधित समस्यांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागत नाही, असे सांगितले जाते.
9 / 12
वृश्चिक: या राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ हा धैर्य आणि शौर्याचा कारक मानला जातो. या राशीच्या लोकांना देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो. त्यांच्या कठोर परिश्रमाने ते प्रत्येक ध्येय साध्य करतात. ते त्यांच्या कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवतात. या राशीच्या लोकांमध्ये प्रतिनिधित्व करण्याची प्रवृत्ती असते. ते प्रत्येक काम मोठ्या कौशल्याने करतात. कुबेर देवाच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही, असे म्हटले जाते.
10 / 12
मीन: देवी लक्ष्मीला मीन राशीच्या लोक खूप प्रिय असतात. या राशीचा स्वामी गुरू ग्रह आहे. गुरू ज्ञान आणि समृद्धीचा कारक आहे. मीन राशीचे लोक समर्पित आणि धार्मिक असतात. त्यांच्या कामावरील श्रद्धा आणि समर्पण नेहमीच देवी लक्ष्मीला प्रसन्न करते. काही वेळेस या लोकांना वडिलोपार्जित संपत्ती किंवा अनपेक्षित आर्थिक लाभ मिळतो. मीन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असते. जीवन आनंद आणि शांततेने भरलेले असते.
11 / 12
भारतीय प्राचीन संस्कृती आणि परंपरा यांमध्ये कुबेर देवाचे महत्त्व अनन्य साधारण असेच आहे. कुबेर हा यक्षांचा अधिपति समजला जातो. माता लक्ष्मीप्रमाणे कुबेराचे महत्त्व आहे. देवांचा खजिनदार, उत्तर दिशेचा अधिपती म्हणजे कुबेर देव. धनाची देवता म्हणूनही कुबेर देवाचे पूजन केले जाते. कुबेराची पूजा केली तर धनसंपत्ती प्राप्त होते असे म्हणतात. लक्ष्मी- कुबेर पूजन करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. देवी लक्ष्मी संपत्तीची प्रमुख देवता असून, कुबेर हा देवतांच्या संपत्तीचा रक्षक मानला जातो.
12 / 12
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिक